Posts

Showing posts from November, 2020

नगराध्यक्ष वहाडणे यांनी दुटप्पी धोरण ठेवून विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नये - उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे

Image
कोपरगाव प्रतिनिधी शहरातील गेल्या 10 वर्षापासुन प्रलंबित राहिलेल्या विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी  व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या अं आंदोलनाला अपेक्षीत नसतांना शहरातील विस्थापितांसह, सर्वांनी पुढाकार घेतल्यामुळे नगराध्यक्षांची विस्थापितांच्या प्रश्नावर मोठी कोंडी झाल्याने विस्थापितांमध्ये संभ्रम निर्माण करुन दुटप्पी धोरण डोळयासमोर ठेवुन  विस्थापितांच्या भावनांचा खेळ मांडु नये अशी टीका  उपनगरध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी  केली आहे.  पत्रकातून त्यांनी म्हटले की शहरातील आरोग्य, पाणी, रस्ता यासह कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोणतेही राजकारण, विरोध न करता सभागृहातील सर्व विषयांना सहमती देवुन विषय मंजुर केले. विस्थापितांच्या प्रश्नावर सभागृहात नगराध्यक्षांनी षडयंत्र करुन विस्थापितांच्या विषयात  अडथळे आणले परंतु नगरसेवकांनी ते अडथळे बाजुला करुन विस्थापितांच्या प्रश्नाला मंजुरी दिली ठराव मंजूर केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले नगराध्यक्षच जनतेचे राहिलेले नाही, जनतेचे प्रश्न मार्गी न लागता जनतेची कशापध्दतीने

शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना - दत्ता काले

  कोपरगाव - प्रतिनिधी शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना गेल्या दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही, याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून  व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास पाठींबा आहे विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना असल्याचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी म्हंटले आहे  काले  म्हणाले ,  दहा वर्षापुर्वी शहरातील  अतिक्रमणे काढण्यात  आली होती, यामध्ये अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले,त्यामुळे अनेक कुटूंबाची उपासमार झाली,  अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला. त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या १५ एप्रिल२०१७ रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे , बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु   नगरपरिषदेने

निसर्गाची रम्य छटा

Image
  कोपरगाव प्रतिनिधी स्वच्छंद बागडणारी मोर लांडोर...... विविध पक्षी ....गुलाबी सर्द हवा... पहाटे पहाटे पडणारे दाट धुके .....अशा वातावरणात फिरण्याचा आनंद घेताहेत नागरिक यावर्षी झालेल्या पावसामुळे सर्वत्र शेत जमीन हिरवाईने  वनराई नटली गेली आहे निसर्गाचा अनोखा अविष्कार नागरिकांना पाहायला मिळत आहे गोड गुलाबी थंडीचा आस्वाद  घेत अनेक नागरिक तरुण  तरुणी  स्त्रिया सकाळी फिरण्याचा चालण्याचा सायकलवरून फिरण्याचा  आनंद घेत आहेत सर्वत्र हिरवे गालिचे गवत फुल झाडी फुलली असून त्याचा मोर लांडोर मुंगूस प्राणी पक्षी बगळे स्वच्छंद पणे बागडताना दिसत आहे दूरवरून हे दृश्य निश्चितच पाहणाऱ्याला सुखावणारे असते काहीजण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे द्रुष्य टिपताना दिसताहेत अधून मधून पडणारे धुके उन पळणारे पांढरेशुभ्र ढग हे दृश्य मनाला भावणारे वाटते सध्या गोदावरी नदी तुडुंब भरलेली आहे तसेच साखर कारखान्यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या बंधारा कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांच्या मालिकांमुळे बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले आहेत पिके पाण्याची स्थिती बरी आहे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे सर्वत्र डिंक लाडू बनवण्याची महिलाव

देवीच्या मंदिराचे कळसाचे कामास सुरुवात उक्कडगाव च्या रेणुका माता मंदिरा ला भाविकांनी भरीव मदत करा आवाहन

Image
  कोपरगाव प्रतिनिधी  त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर गेल्या सात-आठ वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिराचे काम संथ गतीने सुरू आहे मंदिराचे काम सुमारे चार कोटी रुपये खर्चाचे आहे  देवी मातेच्या कृपेने  मंदिराचे काम भाविक भक्तांच्या गावकऱ्यांच्या  व विविध नेत्यांच्या  खासदार आमदारांच्या सहकार्याने तसेच देश-विदेशातील राज्यातील परराज्यातील देवी भक्त आत्तापर्यंत  दिलेल्या  मदतीतून स्टील खडी सिमेंट वाळू व रोख स्वरूपात दिलेल्या रकमेतून काम प्रगतीपथावर आहे ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते व  नवसपूर्ती पावते अशी  ख्याती आहे या मंदिराची शनिवार दिनांक 28 पासून कामास सुरुवात करण्यात आली त्याचे पूजन वैजापूर येथील शिवभक्त दत्त गिरी महाराज यांच्या शुभहस्ते  करण्यात आले याप्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रेय खेमनर मंदिर बांधकाम करणारे  आर्किटेक्ट मोहित गंगवाल अध्यक्ष अशोक शिंदे उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे विश्वस्त  देविदास शिंदे सोपान शिंदे लक्ष्मण शिंदे नंदू शिंदे  रेवन निकम विधिज्ञ  दिलीप जोशी नबाब भाई मिस्तरी यांचे सह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते               कोरो

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार अंगीकारावेत –काका कोयटे

Image
  कोपरगाव कोपरगाव   शहरातील सुभद्रानगर परिसरात चैतन्य स्वरूप श्री विठ्ठल रुख्मिणी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती उत्सत्वानिमित्त श्री अभिषेक व महापुजा कार्यक्रम नासिक येथील सौ श्रद्धा व श्री कपिल सतीशराव जगताप यांच्या शुभ हस्ते २६ नोव्हेंबर २०२० रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील समस्त शिंपी समाजाच्या वतीने कै.द्वारकाबाई  व कै.ह.भ.प. दामोदर गोविंद निकुंभ यांच्या स्मरणार्थ कोपरगावचे सौ.मालती व  श्री.दत्तात्रय दामोधर निकुंभ  व नाशिक येथील सौ. श्रद्धा व श्री कपिल सतीशराव जगताप यांच्याकडून श्री विठ्ठल-रुख्मिणी व श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी कैवल्यधाम (ध्यान मंदिर ) चे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे  यांचे हस्ते करण्यात आले. तसेच त्या ध्यान मंदिराच्या कोनशीला अनावरण देखील करण्यात आले. श्री दत्तात्रय निकुंभ यांनी स्व.खर्चाने या ध्यान मंदिराचे काम पूर्णत्वास आणले आहे. या प्रसंगी काका कोयटे म्हणाले की, ‘कोपरगाव तालुक्यातील शिंपी समाज हा मोठ्या प्रमाणात असून धार्मिक क्षेत्रात चांगल्या

संविधान दिनाच्या निमित्ताने श्रमिकराज बांधकाम कामगार संघटनेच्या फलकाचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांच्या हस्ते अनावरण संपन्न

Image
  कोपरगाव प्रतिनिधी    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून   माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक गायकवाड यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार नोंदणी अभियान फलकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय सूर्यवंशी होते.      यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले श्रमिकराज कामगार संघटनेच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी अभियान सुरू केले जाणार  असून यामध्ये कष्टकरी व असंघटित कामगारांना याचा फायदा होणार आहे. मी  इंजिनिअर असून इमारत बांधकाम कामगारांचे  जवळून कष्ट बघितले आहे. त्यामुळे शासनाकडून यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्रमिकराज कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामध्ये कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात आपले नाव नोंदवावे .  संघटनेला काही अडचण आल्यास त्यावेळ

सॅनिटायझर संस्‍थानला देणगी

Image
  शिर्डी - राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.प्रवरानगर यांनी ५ हजार लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून  कोरोना विषाणुच्‍या   संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते.  राज्‍य शासनाच्‍या  आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या  दर्शनासाठी  काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात  खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे ,  थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था आदी उपाययोजना संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या आहेत. अशावेळी अधिक प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करावा लागणार असल्‍यामुळे शिर्डी लगतच्‍या  सॅनिटायझर उत्‍पादक साखर

को‍वीड सुरक्षा साहित्‍य संस्‍थानला देणगी

Image
  शिर्डी - ओडीसा राज्‍यातील भुवनेश्‍वर येथील श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सदाशिब दास यांनी ०१ लाख रुपये किंमतीचे को‍वीड सुरक्षा साहित्‍य व अन्‍नदानाकरीता रोख रक्‍कम ०१ लाख रुपये असे एकुण ०२ लाख रुपयांची देणगी संस्‍थानला दिली. सदरचे देणगी साहित्‍य हे संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍याकडे सुपुर्त केले.  ओडीसा राज्‍यातील भुवनेश्‍वर येथील श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सदाशिब दास यांनी ०१ लाख रुपये किंमतीचे को‍वीड सुरक्षा साहित्‍य संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असून यामध्‍ये ०५ हजार नग सर्जिकल मास्‍क ,  ०८ हजार ५०० नग हॅण्‍डग्‍लोज ,  ४०० नग फेस शिल्‍ड व १२५ लिटर सॅनिटायझर अशा साहित्‍यांचा समावेश आहे. तसेच अन्‍नदान फंड करीता रोख रक्‍कम ०१ लाख रुपये असे एकुण ०२ लाख रुपयांची देणगी संस्‍थानला दिली.

म्हशी चोरी प्रकरणात दीड लाखाच्या तीन म्हशीसह सह दोघांना पकडण्यात यश, एक फरार

Image
  कोपरगाव : कोपरगाव शहरातील  गोठ्यातील म्हशी चोरून   नेल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण मात्र  फरार झाला आहे.   याबाबत कोपरगाव शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की कोपरगाव शहरातील गोकुरबाबा गल्लीत राहणारे अजहर इस्माईल शेख यांच्या सव्वालाख  किमतीच्या दोन म्हशी मंगळवारी २४ रोजी रात्री ८ वाजेपासून ते बुधवारी २५ रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान दोन म्हशी आकाश संजय रोकडे हरीश चंद्रकांत कुऱ्हाडे  व सचिन गायकवाड सर्व राहणार खेडकर गल्ली कोपरगाव यांनी चोरून नेल्या असल्याची फिर्याद दिली होती. सदर  फिर्याद खरी असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बारसे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंड, पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल,पोना कोरेकर, पोका.शिंदे यांनी सापळा लावून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला तर आरोपी  सचिन गायकवाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आरोपी  याची झडती

भाजप कार्यालयात संविधान दिन. साजरा.

Image
  कोपरगाव प्रतिनिधी भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव  स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी.आर.काले, विजय आढाव,अनु.जाती.मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे,जिल्हा सचिव कैलास खैरे,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,युवा मोर्चा जिहा उपाध्यक्ष सुशांत खैरे,सतीश चव्हाण,महावीर दगडे,दिपक गायकवाड,अकबर शेख,अर्जुन मोरे,खालीक कुरेशी,फकीर महमंद पहिलवान,सलीम इंदोरी,अफजल मौलाना,शकील  पेंटर,गोरख देवडे,संदीप ढोमसे,शंकर बिऱ्हाडे,सतीश रानोडे,हमीद मन्सूरी आदींसह.भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..!!

संविधान दिना निमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना...

Image
  कोपरगाव प्रतिनिधी भारतीय संविधान दीना  निमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. व संविधान प्रतचे वाचन करण्यात आले* ............या वेळी *भन्ते आनंतसुमन सिरी , भन्ते कश्यप  , माजी.नगराध्यक्ष .मंगेश पाटील , विश्वकर्मा समाजाचे प्रदेश अध्यक्ष. संजय सुर्यवंशी , श्रमिकराज कामगार संघटनेचे अध्यक्ष. अजय विघे , आर.पी.आय महाराष्ट्र सचिव दीपकराव गायकवाड* , रंभाजी रणशूर, नितीन त्रिभुवन , राहुल धिवर, अडँ.सुरेश  मोकळं , अँड.नितीन पोळ  , गणेश पवार ,बुद्धिस्ट यंग फोर चे अध्यक्ष विजय  त्रिभुवन , विजय भातानकर , विलास गवळी, माजी.नगरसेवक.अरविंद विघे , मनोज त्रिभुवन , राजेंद्र पगारे , संभाजी रनशूर , गणेश पवार ,राजेंद्र उशीर ,  कैलास साळवे , भाऊसाहेब शिंदे , नितीन शिंदे  , कूनाल झाल्टे  ,सौ.सुनीता ताई पवार , सौ.सविता  साळवे , सौ.सविता  वाघ यांचे सह महिला , बांधव बाबासाहेब यांचे अनुयायी उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड कर्मचाऱ्याला मारहाण

Image
  कोपरगाव प्रतिनिधी: वीज वितरण कंपनीने वाढीव वीज बिल माफ करावे या मागणी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेत कोपरगाव शहरातील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयात घुसून कार्यालयात तोडफोड केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी मनसेच्या पाच जणांविरूद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. कोपरगाव वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे संतोष कांतीलाल गंगवाल, सुनील जनार्दन फंड, अनिल शिवाजीराव गायकवाड, रोहित बाळासाहेब एरंडे, योगेश नेमीचंद गंगवाल या मनसे  पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या वाढीव बिल माफ व्हावे प्रकरणी या मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत गुरुवारी (२६) रोजी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. भगवंत शंकर खराटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसा

ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या साठी व एक दिवसाचा देशव्यापी संप

Image
  कोपरगाव प्रतिनिधी तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांचा विविध  मागण्यासाठी एक दिवस देशव्यापी संप करण्यात आला  त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सरकारी कामाचा दर्जा मिळावा , तीन पदोन्नती मिळाव्यात, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी यासारख्या विविध प्रकारच्या मागण्या मान्य कराव्यात अशा मागण्या करीत देशाचे संघटनेचे सेक्रेटरी एस एस महादेवय्या व श्रीरामपूर विभागाचे नेते निवृत्ती जाधव, बाळासाहेब गोडगे यांचे मार्गदर्शनाखाली हा संप पुकारण्यात आला होता कोपरगाव तालुक्यातील सर्वग्रामीण टपाल कार्यालयासमोर जमून सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन हा संप शंभर टक्के यशस्वी केला यावेळी ज्ञानदेव पगारे दत्तात्रय गायकवाड राहुल आढाव दादाभाऊ साबळे,  मच्छिंद्र आव्हाड, हौशीराम भिंगारे, प्रियांका फले अंकिता अग्निहोत्री आदी कर्मचारी उपस्थित होते, प्रास्तविक संवत्सर चे दत्तात्रय गायकवाड यांनी केले तसेच ज्ञानदेव पगारे यांनी मागण्या मान्य न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .  आभार राहुल आढाव व दादाभाऊ साबळे यांनी मानले.

पोहेगाव नागरी पतसंस्थेतर्फे रेमडीसेवर लसी साठी एक लाख अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत...

Image
  कोपरगाव प्रतिनिधी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते रुग्ण कल्याण समितीकडे धनादेश सुपुर्द कोपरगाव प्रतिनिधी शिवसेनानेते नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने covid-19 ने  त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रेडमीसेवर लस उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण कल्याण समितीला तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांच्याकडे एक लाख अकरा हजार रूपयेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. नगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असलेल्या पतसंस्था चळवळीत नागरी पतसंस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये नेहमी सहभाग घेऊन समाजसेवेचे व्रत या पतसंस्थेने अंगीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोपरगाव तालुक्यातीलही गेल्या आठ दिवसात एक्टीव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व प्रशासन रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे. मात्र covid-19 च्य

लस लवकरयेऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्याचरणी साकडं

Image
  पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज श्री  विठ्ठलाच्या चरणी घातले.               उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले,  पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.               श्री. पवार म्हणाले, 'अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने

साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष , कंट्रोल रुम सुविधा २४ तास सुरु

Image
शिर्डी - दिनांक १६ नोव्‍हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून  कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर साईभक्‍तांना शिर्डीची वारी व श्रीं चे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष  (Helpline),  कंट्रोल रुम  (Control Room)  व  WhatsApp  ही सुविधा कायमस्‍वरुपी २४ तास सुरु करण्‍यात आलेली आहे. सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून  कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते.  दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त श्रीं च्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापुर्वी व आल्‍यानंतर निवास ,  भोजन ,  वैद्यकीय सेवा व दर्शनाची परि

साईंचे चरणी ३ कोटींची देणगी

Image
०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त शिर्डी - राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून  दिनांक १६ नोव्‍हेंबर ते दिनांक २४ नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईभक्‍तांकडून विविध प्रकारे ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे. सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून  कोरोना विषाणुच्‍या  संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते.  राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून दिनांक १६ नोव्‍हेंबर ते २४ नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस ,  जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे ६१ लाख ०४ हजार ६०० रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच या क

आत्मा मालिक 109 विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल स्थानी.

Image
  *राहुल कोकरे, ओमकार कोकरे, विजय कापडी, सौरभ थोरात, दुर्गेश चव्हाण यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड. *शहरी व ग्रामिण अशा दोन्ही विभागा मिळून सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान सलग तिस-या वर्षी आत्मा मालिकला. कोपरगांव ( ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या 109 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 28 तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 81 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये राज्यातील 24 हजार शाळांमधील विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यात सलग तिस-या वर्षी आत्मा मालिक माध्य. गुरुकुलाचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर द्वितीयस्थानी वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी हे आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पन आणि आत्मा मालिक पॅटर्न अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती असल्याची प

अल्फा ओमेगा ख्रिश्‍चन महासंघाच्या वतीने बुथ हॉस्पिटलला भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान

Image
कोरोनाच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटल गोर-गरीबांसाठी मोठा आधार ठरला -आशिष शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी) - अल्फा ओमेगा ख्रिश्‍चन महासंघ या देशव्यापी संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवेत उत्कृष्ट काम करणार्‍या शहरातील सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अमोल शिंदे, विल्यम चंदनशिव, दिनेश गोर्डे, नितीन गोर्डे, पास्टर सुधीर पाडळे, राजेश थोरात, किरण पवार, सतीश मिसाळ, प्रिया ढगे, प्रा.प्रफुल कसोटे आदि उपस्थित होते. दरवर्षी आरोग्य सेवेत उत्तम उल्लेखनीय कार्य करणार्‍या रुग्णालयाला अल्फा ओमेगा ख्रिश्‍चन महासंघाच्या वतीने भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी बुथ हॉस्पिटलने कोरोना महामारीच्या संकटकाळात योगदान देऊन अनेकांचे जीव वाचविले आहे. 1902 पासून सॅलवेशन आर्मीच्या माध्यमातून सुरु झालेले बुथ हॉस्पिटल गोर-गरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरला आहे. कोरोनासह इतर आजार असलेल्या रु

26 नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात जि.प.कर्मचारी महासंघ सहभागी होणार

Image
  अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी पुकारलेल्या 26 नोव्हेंबर रोजीच्या लाक्षणिक संपात जिल्हा परिषद कर्मचारी संवर्ग सहभागी होणार आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन दिले. अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी वर्गात अन्यायाची भावना आहे. त्याला वाट करून देण्यासाठी लाक्षणिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे व जिल्हा सरचिटणीस मंगेश पुंड यांनी दिली. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे, जिल्हा सरचिटणीस मंगेश पुंड, विभागीय संघटक बाळासाहेब आंबरे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पावसे, राज्य कौन्सिलर सुरेश मंडलिक, परिचर संघटनेचे अध्यक्ष अशोक काळापहाड, नर्सेस संघटनेच्या मंदा माने, पशुवैद्यकीय संघटनेचे डॉ.साळुंके, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघाच्या मनिषा शिंदे, मीना कालेकर, रमेश बांगर, सागर आगरकर, निलेश गाडेकर आदींच्या सह्या आहेत.

कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास शहर भारतीय जनता पार्टीचा पाठींबा

Image
कोपरगाव  (प्रतिनिधी) : शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना गेल्या दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही, याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास  शहर भारतीय जनता पार्टीचा पाठींबा असल्याचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी जाहीर केले.  याप्रश्नी जाहीर पाठींबा असल्याचे निवेदन तहसिलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले, यावेळी शहराध्यक्ष दत्ता काले, भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, कामगार आघाडीचे जिल्हा संयोजक सतीश चव्हाण, रविंद्र रोहमारे आदी उपस्थित होते. दत्ता काले यावेळी म्हणाले, सुमारे दहा वर्षापुर्वी शहरातील अतिक्रमण काढण्यात आले, यामध्ये अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले,त्यामुळे अनेक कुटूंबाची उपासमार झाली, तर अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला. त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या १५ एप्रिल२०१७ रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी

चासनळी ते दहिवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर रहिवासी यांनी मानले माजी आमदार कोल्हे यांचे आभार

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पश्चिम भागातील चासनळी ते दहिवाडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असुन या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबददल माजी आमदार स्नेहलता  कोल्हे यांचे आभार व्यक्त केले. नाशिक आणि नगर जिल्हयाला जोडला जाणारा चासनळी ते दहिवाडी या रस्त्याचे काम सुरू असुन प्रगतीपथावर आहे. काम पुर्ण झाल्यानंतर या भागातील नागरीकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माजी आमदार सौ कोल्हे यांनी मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी मोठया प्रमाणात निधी आणला. त्यामुळे अनेक रस्त्यांचे कामे मार्गी लागले. या परिसरातील नागरीकांना महत्वाचा असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी सौ कोल्हे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2017-18 या अंतर्गत 1 कोटी 4 लाख 47 हजाराचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सुमारे 2 किलोमीटर रस्त्याच्या कामास नुकतीच सुरूवात झाली असुन काम प्रगतीपथावर आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनेष गाडे, अशोक आहेर, उपसरपंच मनोज गाडे, राहुल चांदगुडे, चंद्रकांत चांदगुडे, विष्वासराव गाडे, सुनिल सुरभैया, राजेद्र गाडे, संतोष कदम , आबासाहेब गाडे यांनी या कामाची पहाणी केल

शिर्डी नगररस्त्यासाठी ४३० कोटी मंजूर होतात मात्र शिर्डी कोपरगाव मनमाड रस्त्याला एक छदामही दिला जात नाही हे मोठे दुर्दैव - सुखदीप सिंग उर्फ कुक्कु साहनी

Image
अतिमहत्त्वाच्या  रस्त्याच्या प्रश्नी आजी-माजी  खासदार आमदार गप्प  का ते झोपले आहेत का? असा केला सवाल कोपरगाव (प्रतिनिधी) जागरूक-खासदार आमदार यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १६०  या रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले, पण मग नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५२  जी या रस्त्याला आज पर्यंत एक छदामही मिळू शकला नाही  याचा अर्थ येथील  आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का?  ते का  उदासीन आहेत असा परखड सवाल शीख समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग उर्फ कुक्कूशेठ साहनी  यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात त्यांनी पुढे म्हटले की दरवर्षी पावसाळ्यात नगर-मनमाड ७५२ जी महामार्गावर हजारो खड्डे पडतात त्यात अनेक जणांचे एक्सीडेंट होऊन काही मयत होतात थातूरमातूर डागडुजी करून दरवर्षी तोच नेहमीचा खेळ खेळला जातो. खाचखळग्याचा मार्गातून वाट काढत कोपरगाववासीयां सह विविध प्रवाशांचा प्रवास सुरूच राहतो. आज मितीस कोपरगाव शिर्डी या पट्टय़ात महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे १४ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दिड ते दोन तासांचा अवधी लागतो आहे. खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरच

अबब...11 हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्णांची संख्या त्यातून पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितीत तब्बल अकरा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली त्यातून एक नंबर कांद्याला साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली.  ते पुढे म्हणाले कोरोणाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून त्यातून रुग्णांची संख्या देखील वाढत आहे .राज्यात काही ठिकाणी लॉक डाऊन करण्यात आले असून आपलेही तालुक्यात व परिसरात पुन्हा लॉक डाऊन होते की काय या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कांदा बाजार समिती आणला, त्यातच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसचे वातावरण निर्माण झाले आहे तर काही ठिकाणी हलकासा पाऊस देखील झाला आहे कांदा चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्री कडे मानसिकता झाली आहे .त्यातूनच आज कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांची वाहने कांदा विक्रीसाठी आली होती .त्यातून एकच गर्दी उडाली बाजार समिती आवारात

नगरपालिका निवडणूक शिवसेना लढणार धनुष्यबाण चिन्हावर - राजेंद्र झावरे

Image
कोपरगाव (प्रतिनिधी)  : कोणत्याही परिस्थिती आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे .  यापुढे कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात  कोणत्याही परिस्थिती आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका,  ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती  तसेच कृषी उत्पन्न बाजार निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेंव्हा कुठलेही गटातटाचे राजकारण मनात न ठेवता केवळ शिवसेना शिवसैनिक म्हणून  सर्व शिवसैनिकांनी एकीची वज्रमूठ बांधून निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे. येणार्‍या नगरपालिकांमध्ये बैठका घेणार आहेत. या दरम्यान स्थानिक उमेदवार व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे. जिल्हयात पक्षवाढीची संधी निवडणुकीच्या रुपाने मिळत असते शिवसेनेने चार वेळा खासदार तीन वेळा आमदार दिलेला आहे यापूर्वी कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेची कुठलीही ताकद नसताना शिवस

हे तर तीघाडी चे बिघाडी सरकार व त्यांचे चालक चलती का नाम गाडी

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :  सत्तेवर आल्यावर वीज बिले माफ करू असे  म्हणायचे सत्तेत बसल्यावर मात्र सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना खोटी बिले भरमसाठ बिले पाठवायची हे सरकार तिघाडीचे बिघाडी सरकार आहे व  त्यावर बसलेले चालक चलती का नाम गाडी  असल्याची टीका माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केली त्या भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या विज बिल विरोधात व  बिले जाळा आंदोलन प्रसंगी त्या बोलत होत्या  जनतेचा कौल नसलेले महाविकास आघाडी सरकार असून जनतेच्या प्रश्नंशी राज्यकर्तेंना काहीही देणेघेणे नसलेल्या सरकारला सामांन्य नागरीकांचे प्रश्न सोडवायचे नाही. महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ बिले देउन जनतेची चेष्टा चालविली आहे. विजबीले माफ करण्याचा शब्द फिरवुन जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे ही वाढीव बीले आम्ही भरणारच नाही.  सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरत असून या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडत असल्याचे  कोल्हे म्हणाल्या. नागरीकांना वाढीव विजबिलात सवलत मिळणार नाही, त्यांना ती भरावी लागतील असे राज्यातील उर्जामंत्री यांनी जाहीर केले.तर दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबीले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. याचा निषेध करण्यास

श्रीं च्‍या दर्शनाकरीता येतानी साईभक्‍तांनी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे

Image
शिर्डी -  राज्‍य शासनाच्‍या आदेशाने दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून  कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावामुळे  श्रीं च्‍या दर्शनाकरीता येतानी साईभक्‍तांनी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. तसेच  पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी घेऊन येण्‍याचे टाळावे. जगभरात ,   देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या   संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते . दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे गुरुवार ,  शनिवार ,  रविवार व सलगसुट्टयांच्‍या कालावधीत गर्दी होवु नये म्‍हणुन साईभक्‍तांनी शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्‍

पाट पाण्यासाठी सात नंबर फॉर्म

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :  सात नंबर फॉर्म भरण्या साठी मुदत वाढ.. ह्या मथळ्याच्या बातमीने माझे डोके गरगरायला लागले.. भविष्याची चिंता भेडसावू लागली... पुन्हा आम्ही वाळवंटात जाणार का? याला जबाबदार कोण? पुढच्या पिढीला आपण काय देणार?... *कोपरगार राहाता श्रीरामपूर वैजापूर भागात १८९९ मध्ये व त्या पुर्वी भयानक दुष्काळ पडत असे.. वित्त व जिवीत हाणी झाल्याची नोंद आहे.. म्हणून ब्रिटीशांनी दारणा धरण बांधून गोदावरी डावा व उजवा कालवा काढले... पाण्याने जमीनी उपळू लागल्या म्हणून चर काढले व ह्या दुष्काळी तालूक्यात ऊस शेती बहरली... तालुक्यात सात साखर कारखाने पुर्ण क्षमतेने चालू लागली... शेती पाण्या साठी ब्लॉक वाटप झाले* १९८५ पर्यंत सगळे आलबेल होते.. महाराष्ट्र शासनाला औद्योगिकरणाचे डोहाळे लागले .. हळूहळू बेकायदेशीर ब्लॉक नुतनीकरण बंद केले.. ब्लॉक बंद केल्याचा शासन निर्णय नाही पण ब्लॉक चे पाणी शासनाने औद्योगिकरणाला विकून टाकले... शेतीला पाणी पाहीजे असेल तर सात नंबर भरा किंवा काळ्या बाजाराने घ्या.. *कागदपत्र रंगवण्यापेक्षा काळा बाजार बहूतांनी स्विकारला... पाण्याची मागणी घटली..धरणातील पाणी औद्योगिकला विकायला सर

नाशिकच्या ओम महाजनचे संजीवनी युवा प्रतिष्ठान कडून अभिनंदन

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :  नाशिकच्या सतरा वर्षे ओम महाजन याने अत्यंत कमी वेळेत काश्मीर ते कन्याकुमारी हे 3800 किलोमीटरचे अंतर सायकल द्वारे पार करुन आकाशाला गवसणी घातली असून त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे, त्याबद्दल त्यांचे संजीवनी यूवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोपरगाव तालुका औद्योगीकचे अध्यक्ष विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.  त्याची ही कामगिरी क रोना योद्ध्यांना निश्चितच स्फूर्ती नायक आहे.  श्री. विवेक कोल्हे पुढे देवी म्हणाले की, सध्या लॉंकडाऊन कोरो ना सदृश्य परिस्थिती आहे.   शाळा महाविद्यालय सुरू नाही, त्यामुळे मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात, त्याही परिस्थितीत नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजन या तरुणाने अतुलनीय कामगिरी करत सायकल द्वारे आठ दिवस 7 तास 38 मिनिटात 3800 किलोमीटर अंतर पार करत काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास कमी वेळेत स्वतःच्या नावे नोंदवीला आहे. त्याच्या कामगिरीचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. सर्वजण दिवाळीचे अभ्यंगस्नान करत असताना या पठ्ठ्याने 13 नोव्हेंबर रोजी ही मोहिम हाती घेत पूर्ण केली, त्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने शाळा सुरु करण्याचा फेरविचार करावा - परजणे

Image
कोपरगांव (प्रतिनिधी )  सद्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालल्याने सोमवार दि. २३  नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा राज्य शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे प यांनी  शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. जागतिक आरोग्य संघटनांनी पुढील वर्षाच्या प्रारंभीच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केलेली आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत लोकांमध्ये गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी दिवाळीनंतर गेल्या चार पाच दिवसात शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु केल्यास अनर्थ ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन होईलच असे वाटत नाही. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या तपासण्या केल्या असता अनेक शिक्षक कोरोना बाधीत आढळून आलेले आहेत. या एकूण परिस्थितीमुळे पालक देखील हमीपत्र द्यायला तयार नाहीत, आणि ज्या