बालकवींना व्यक्तिमत्व विकासासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे : माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील

कोपरगांव (प्रतिनिधी) : शालेय जीवनापासूनच व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी व्यासपीठ निर्माण करून दिल्यास  गुणात्मक विकास होण्यासाठी निश्चित मदत होऊ शकेल असे मत माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी संकल्पना फाउंडेशन च्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण छोटेखानी समारंभात व्यक्त केले तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजिक , शैक्षणिक,क्रीडा आणि कला सांस्कृतिक क्षेत्राला संबंधित विभागाने तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असेही ते  म्हणाले.

याप्रसंगी मसूटा हा ज्वलंत सामाजिक विषय घेवून मराठी सिनेसृष्टीत  स्थान निर्माण करून देणारे चित्रपट निर्माते भरत मोरे यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाउल टाकल्यानंतर माझा हा पहिलाच सन्मान झाला त्यामुळे तो एखाद्या मानाच्या पुरस्कारापेक्षा कमी नाही .

ज्या क्षेत्रात मी कार्यरत आहे तिथे शब्दांना असणारे महत्व आणि शब्दांच काव्यात्मक पद्धतीने केलेले रुपांतर हे तितकेच सोपे नाही त्यामुळे बालकवींच्या काव्यरचनेचे विशेष कौतुक वाटते असे पत्रकार टेके म्हणाले

अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मयूर तिरमखे  होते.या प्रसंगी शालेय,महाविद्यालय,खुल्या गटातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन गवळी, रोहीत शिंदे, प्रा.गजानन पंडीत, वैभव बिडवे, कल्पना निंबाळकर,प्रा.मधुमिता निळेकर,प्रा.संदीप नलगे,आरती सोनवणे,शुभम आहेर, श्रीकांत साळुंके यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता सूर्यवंशी यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव गणेश सपकाळ यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा