कोपरगाव शहरातील आठवडे बाजार पुर्वीप्रमाणेच एकाच ठिकाणी भरविण्यात यावा
कोपरगाव - कोपरगाव शहरातील सोमवारचा आठवडे बाजार पुर्वीप्रमाणेच बाजारतळ येथील मैदानावर एकाच ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, व्यापारी संघर्ष समिती, भाजपा पदाधिकारी, नगरसेवक यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव नगरपरिषद् हददीतील उपनगरांमध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विक्रेते, फळे व्यापारी, किराणा व्यापारी , तसेच कपडे व्यापारी, छोटे व्यवसाय करणारे रस्त्याच्या दुतर्फा बसुन व्यवसाय करीत आहे. त्यामुळे ओट्यावर बसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय समाधानकारक होत नसल्याने भाजीपाला व्यवसायिकांच्या मागणीचा विचार करून बाजारतळ येथे आठवडे बाजार भरविण्यात यावा, या मागणीचे निवदेन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी मुख्याधिकारी यांना दिले.यावेळी श्री निखाडे यांचे समवेत गटनेते रविंद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, राजेंद्र सोनवणे, आरीफ कुरेशी, वैभव गिरमे, अकबर शेख, शरद त्रिभुवन आदी उपस्थित होते.
जगासह, देशात प्रादुर्भाव होत असलेल्या कोरोना महामारीचे संकट टळलेले नाही. सोमवारचा आठवडे बाजार कै राधुजी भांगरे बाजार ओटयावर भरविण्यास नगरपरिषदेने परवानगी दिलेली आहे. परंतु तरीही छोटे मोठे व्यावसायिक, शेतकरी विक्रेते सोमवार बाजारच्या दिवशी देखील शहरातील इतरत्र भागात बसलेले आढळतात. त्यामुळे सोमवारच्या दिवशी शहरातील व्यापारी पेठेत नागरीकांची प्रचंड गर्दी होते, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पर्यायाने या कोरोना महामारीच्या संकटात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, तसेच मास्क लावणारांची संख्या कमी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या आठवडे बाजाराच्या दिवषी शहरात इतरत्र भाजीपाला भरत असल्याने नगरपरिपदेने नेमून दिलेल्या बाजार ओटयावर बसलेल्या व्यावसायिकांचे समाधानकारक व्यवसाय होत नाही. भाजीपाला व्यापारी यांची मागणी विचारात घेउन सोमवारचा आठवले बाजार बाजारतळ येथील मोकळया मैदानात भरविण्यात यावा, जेणेकरून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी नगरपरिषदेला उपाययोजना करणेही सोपे जाईल, त्यामुळे सोमवारचा आठवडे बाजार बाजारतळ येथे एका ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
Comments
Post a Comment