शेतकर्‍यालाही वर्क फ्रॉम होम करता यावे यासाठी संशोधन करा ः उद्धव ठाकरे


मुंबई ः शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकर्‍यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का? काही बाबी त्याला ‘वर्क फ्रॉम होम’ करता येतील का, याचा विचार संशोधकांनी करावा. शेतीला पाणी देणे, सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करताना शेतकर्‍यांना घरी बसून  पिकांना पाणी देय्याची व्यवस्था विकसित करता येईल का, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न्ा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती 2020ची 48वी सभा अकोला येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रे बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते ते पूर्णतः खुले राहिले. शेतकर्‍यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा आधिकाधिक उपयोग करून बीज उत्पादनापासून ते मार्केटींगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी एकत्रितपणे तयार करून सरकाराल सादर करावा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

कृषि काद्याबाबात केंद्राने मते जाणून घ्यावीत

केंद्रिय कृषि कायद्यातील सुधारणा या शेतकरी हिताच्या असाव्यात ही आपली आग्रही भूमिका असून यासाठी केंद्र शासनाने राज्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घ्यावीत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, यामध्ये शेतकरी, कृषि क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, बाजारपेठ, क्षेत्रातील तज्ज्ञ यांचीही मते घ्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा