गोदावरी नदी स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा
कोपरगाव (प्रतिनिधी) :शहरातील गोदावरी नदी पात्राची एकीकडे सामाजिक कार्यकर्ते गोदावरी नदी कशी स्वच्छ राहील यासाठी झटत आहे तर एकीकडे याच नदी पात्रात निर्माल्य प्लास्टिक पिशव्या अन्य कचरा टाकण्यासाठी नागरिक अथक परिश्रम घेत आहे मात्र या टाकलेल्या निर्माल्य प्लास्टिक कचरा यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत आहे याकडे नागरिक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदी स्वच्छ व सुंदर रहावी यासाठी गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष स्वछता दूत आदिनाथ ढाकणे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दर रविवारी नदी पात्रातील केर कचरा निर्माल्य फाटलेले कपडे, भंग झालेल्या देवाच्या मूर्ती फोटो नदी पत्रातून बाहेर काढून नदीपत्राची स्वछता करण्याचे व्रत हाती घेऊन हे अभियान राबवतात या अभियानाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचे देखील योगदान सतत लाभत असते मात्र दसरा सण झाला अन सणा निमित्त जमा झालेले फुल हार निर्माल्य स्थापन केलेले घट गोदावरी नदी पात्रात विसर्जित करण्यासाठी कोपरगाव शहरातील नागरिक सकाळपासून येताना दिसत होते नदी काठाजवळ तयार करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन कुंडाचा नागरिकांना विसर पडला नागरिकांनी नदी पात्रात टाकलेल्या निर्माल्य प्लास्टिक पिशव्या कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होताना दिसत आहे यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता त्याचे खत तयार करा अन आपली गोदावरी नदी कशी स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन सामाजिक व व माहिती अधिकार कार्यकर्ते कार्यकर्ते संजय काळे गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले आहे
Comments
Post a Comment