शहरात पोलिसांसमोर रस्त्यावर लाथाबुक्क्याने मारहाण

बारा जना विरुद्ध गुन्हा दाखल  



कोपरगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुभाषनगर भागात रोडवर आपापसात झुंज करून लाथाबुक्क्यांनी  मारहाण करत असल्या प्रकरणी 12 जणांविरोधात  शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि काल दि. 29 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास  सुभाषनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी यातील आरोपी  कृष्णा अमरसिंग राठोड,  जया जाधव, शाहरुख शेख,  शुभम जाधव,   विजय आऱख,  चावला ( पुर्ण नाव माहीत नाही )  खिजर मणीया,र  तन्वीर रंगरेज,  एजाज मणीयार,  हिना ( पुर्ण नाव माहीत नाही )  मीना जाधव,  ज्योती पगारे सर्व रा सुभाषनगर कोपरगाव  हे सर्वजन तोंडास मास्क न लावता एकत्रीत जमवुन पोलिंसांसमोर सार्वजनीक ठिकाणी रोडवर आपसात झुंज करुन लाथाबुक्याने मारहाण करीत होते व शिवीगाऴ करुन सार्वजनीक शांततेचा भंग करीत होते. त्यामुळे  पो. कॉ. सुरजकुमार  अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन रात्री उशिरा वरील 12 आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे  गु.रजि.नं व कलम : 801/2020 भादवी कलम  160,188 269 270   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र 01 व 03 यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि. राकेश माणगावकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. आर पी पुंड हे करीत आहे.


Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"