रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचल्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही
कोपरगांव (प्रतिनिधी) :रेल्वेच्या लाईन खाली असलेले भुयारी रस्त्यात चौकी क्रमांक 68 व 69 मध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने या भागातील दळणवळण पुर्णपणे ठप्प झाले आहे सदरचे साचलेल्या पाणी काढुन रस्ता पुर्ववत सुरु करुन द्यावा किंवा पर्यायी व्यवस्था म्हणुन चौकीवरील गेट चालु करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंचलगांव, ओगदी, बोलकी ,खिर्डी गणेश, करंजी, शिंगणापुर या परिसरातील ग्रामस्थांनी स्टेशन मास्तर भैरवनाथ केशवाणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
झालेल्या पावसामुळे मनमाड दौंड रेल्वे मार्गावर कोपरगांव रेल्वे स्टेशनपासुन 2 कि.मी. अंतरावर असलेली चांदरवस्ती जवळील चैकी नं 68 व कोपरगांव रेल्वे स्टेषन पासुन 3 कि.मी. अंतरावर असलेले गायकवाड वस्ती जवळील चौकी नं. 69 या दोन्ही रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे रस्ता बंद झाला असून शेतक-यांना शेती माल, दुध तसेच आजारी नागरिकांना औषधोपचारासाठी दवाखान्यात येणे जाणेसाठी, शासकीय कामकाजासाठी जाण्या-येण्यासाठी अडथळा होत असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. नागरिकांना दूरवर जाऊन रस्ता क्रॉसिंग करून यावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे गावक-यांची झालेली गैरसोय दुर करण्यासाठी दोन्ही रेल्वे भुयारी मार्गावरील पाणी काढुन रस्ता मोकळा करुन द्यावा पर्यायी व्यवस्था म्हणुन चौकीवरील गेट पुर्ववत चालु करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या प्रसंगी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, संचालक भास्कर भिंगारे, संचालक प्रदीप नवले, नवनाथ आगवण, वाल्मीक भास्कर, चंद्रभान रोहोम, चंद्रकात चांदर, रविंद्र आगवण, वेणुनाथ बोळीज, सुभाष शिंदे, गणेश भिंगारे, रमेश शिंदे, भिमा संवत्सरकर, निलेश वराडे आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment