राष्ट्रविरोधी विधान करणाऱ्या जम्मु-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीला देशद्रोही घोषीत करा


कोपरगाव (प्रतिनिधी) :जम्मु काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी च्या वादग्रस्त नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतेच  "जोपर्यंत जम्मु काश्मीर मध्ये 370 वे कलम  रद्द होत नाही तोपर्यंत भारताचा तिरंगा  ध्वज फडकविणार नाही"  अशा प्रकारचे राष्ट्रविरोधी विधान करून या देशाचा व  घटनेचा अपमान केलेला आहे,अशा राष्ट्रद्रोही विधान करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल  करून देशाच्या विरोधात कोणताही पक्ष-संघटना-  व्यक्ती अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस करणार नाही .अशा प्रकारचे निवेदन कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने  तहसीलदार  योगेश चंद्रे  यांना दिले.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,प्रा.सुभाष शिंदे,विनायक गायकवाड,चेतन खुबाणी, संजय कांबळे,किरण थोरात,विनीत वाडेकर,योगेश वाणी, प्रमोद पाटील आदि  उपस्थीत होते.

 यावेळी बोलतांना  शिंदे म्हणाले की  देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली तरी  भारतात काही राष्टविरोधी विघातक शक्ती  कार्यरत आहेत अशा शक्तीचा मुळापासून बिमोड केला पाहिजे जेणे करून  भारत मातेचे लचके तोडणाऱ्या अंतर्गत व बाह्य शक्तींना चपराक बसेल.

भारतीय सेना व  पोलीस दल हे करण्यास सक्षम आहे परंतु भारत हा शांतता प्रिय देश म्हणून ओळखला जातो  त्यामुळे  अशा राष्ट्रद्रोही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेतात केंद्रसरकारने या देशद्रोही शक्ती विरोधात तातडीने पावले उचलावी  व सर्व राजकिय पक्षांनी याप्रश्नी राष्ट्रीय मुद्यावर एकत्र यावे असे आवाहन करून या घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा