नगरपरिषदेने घर पाणी पट्टी तसेच शॉपींग सेटरमधील गाळयांचे भाडे माफ करावे.: शहर भारतीय जनता पार्टीची मागणी


\कोपरगाव (प्रतिनिधी) :नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांची पाणीपटटी, घरपटटी तसेच शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे माफ करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्व आर्थीक व्यवहार ठप्प झाले आहे. रोजगार,उदयोगधंदे बंद असल्याने छोटे व्यावसायिक, फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरीकांची रोजची जगण्याची धडपड सुरू आहे.  उदरनिर्वाहाची चिंता  आहे.जीवन मरणाशी संघर्ष करावा लागत असलेल्या या परिस्थितीत अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली. अशी वस्तुस्थिती असतांना नगरपालिकेकडून आकारण्यात येणारी घरपटटी आणि पाणीपटटी धंदे पाणी नसल्याने  व्यापाऱ्यांना शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे भरण्याची आर्थीक ताकत राहिली नाही  यापुर्वीही माहे एप्रिल व मे मध्ये शहर भाजपाच्या वतीने नगरपालिकेला वारंवार  विनंती केली आहे. आज पुन्हा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भेटून शहरातील नागरीकांची घरपटटी व पाणीपटटी आणि शॉपींग सेंटरमधील गाळे धारकांचे भाडे माफ करण्याची मागणी  मुख्याधिकारी यांना दिलेल्या  निवेदनातून केली आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा