गुरुवारी तालुक्यात तासभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

काढणीला आलेल्या पीकांची दानादान दोन इंच पावसाची नोंद पिके चालली सडून

कोपरगाव (प्रतिनिधी) : शहर व तालुक्याच्या परिसरात आज विजेच्या कडकडाटासह  मुसळधार पाऊस पडला त्यामुळे शेतांना व शहरात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तळी साठी होती परतीचा हा पाऊस प्रचंड नुकसानीचा ठरला हा पाऊस घट माळीत अडकला असल्याने शेतकरी व भाविक चिंतेत पडले आहेत जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर सुमारे 47 मिलिमीटर अंदाजे 2 इंच पाऊस पडल्याची माहिती प्रभारी हवामान निरीक्षण चेतन परे यांनी दिली रविवारीही पंचेचाळीस मिलिमीटर पाऊस पडला होता

पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्याप्रमाणे रविवारी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी सुरू झालेला पाऊस  दोन वाजून ३६मिनिटांनी संपला. या पावसामुळे शेतात सोंगन्या अभावी उभ्या असलेल्या खरीप पिकांची पुन्हा एकदा वाट लागली आहे. अति पावसाचा  साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, आधीच कोरो ना महामारी मुळे सर्वजण मेटाकुटीला आले असून वरूनराजा आणखी बरसत राहिला तर परिस्थिती हालाखीची होण्याचा संभव आहे.   नवरात्र घटस्थापना होऊन एक दिवस उलटला असताना पावसाने रविवारी कहरच केला.

यंदा खरीप पीक जोमात आले होते, पण सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत, पाऊस नको नको असे शेतकरी म्हणू लागले आहेत, तर काही जाणकारांचे म्हणणे आहे की, जेवढा पाऊस होईल, तेवढी पुढची पाच दहा वर्षाची निश्चिंती होईल. 

यंदाचे खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीकासाठी कुठल्याही प्रकारचे पाण्याचे बारे द्यावे लागले नाही, की खताची मात्रा देखील वाढवावी लागली नाही.   पावसाच्या स्वरूपातील  नायट्रोजन काही प्रमाणात मिळाल्याने जमिनीची भूक भागली आहे.   शेतकऱ्यांना आता अती पावसामुळ पिकांची चिंता लागली आहे. त्यातच साखर कारखान्यांचे गाळप हंगाम ऊस उपलब्धतेमुळे एक महिना अगोदर नोव्हेंबरमध्ये सुरू होत असल्याने व्यवस्थापनासमोर करून कोरो ना बरोबर ऊस तोडण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे निराकरण करावे लागणार आहे. रविवारी संततधार झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे तर शहरातील गटारी डबके, रस्ते स्वच्छ झाले आहेत. शिंगणापूर रेल्वे चौकीजवळ संवत्सर  कडे जाणारा रस्ता कच्चा  असल्यामुळे असंख्य वाहनधारकांना पाऊस पाण्याचा फटका बसला आहे.  पक्षांची घरटी अजूनही अपूर्णावस्थेत आहे त्यांनाही या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. जबर पाऊस झाल्याने यात्रिकीकरणा द्वारे  खरीप पिके सोंगणी करणाऱ्यांचे भाव चढे झाले आहे. शेतमजूर मिळणेही दुरापास्त होउ लागले आहे.                

पडलेल्या पावसाने रस्ते गटारी घराची छते स्वच्छ धुऊन गेली गोदावरी नदीवरील बंधारे फळ्या टाकल्याने पाणी अडवले गेले आहे त्यामुळे गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. 

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा