जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पदभार स्विकारला


अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. क्षीरसागर यांची नुकतीच कोकण विभागातून नगरला बदली झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी क्षीरसागर यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, मिरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अजय फटांगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मंगला वराडे, सुनील कुमार राठी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, नगर जिल्ह्यात आपण यापूर्वीही काम केलेले आहे. नेवासा तहसीलदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, संगमनेर प्रांताधिकारी म्हणून काम केलेले आहे. मधल्या पंधरा वर्षात नगरशी संपर्क नसला तरी नगरमध्ये पुन्हा यायला मिळाले याचा आनंद आहे. नगर जिल्हा हा खूप प्रगतीशील विचारांचा आहे. अनेक चांगल्या योजना, उपक्रमांची मुहूर्तमेढ या जिल्ह्यात रोवली गेली आहे.  त्यामुळे सर्वांना सोबत घेवून जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न राहिल. यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा