एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुलचा बोकटे येथिल विद्यार्थी अजिंक्य बाबासाहेब दाभाडे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कोपरगाव (प्रतिनिधी) : मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.
१६ फेब्रुवारी २०२० रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीचे पाच विद्यार्थी व इयत्ता आठवीचे तीन विद्यार्थी असे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहे.
बोकटे येथिल शेतकरी कुटुंबातील अजिंक्य बाबासाहेब दाभाडे या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. यां बद्दल त्याचे बोकटे गावात सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.
अजिंक्य बाबासाहेब दाभाडे यांसह इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अॅड.सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विलास गाडे, जीवन गाडे, डॉ.भागिनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे.त्याचप्रमाणे तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आदींनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment