Posts

Showing posts from October, 2020

ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार - राज्यपाल कोश्यारी

Image
  मुंबई - समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेतली यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा काकासाहेब कुलकर्णी यानी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली असता मा राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले .         यावेळी  ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यानी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मा राज्यपाल याना सांगितले .   यावेळी मकरंद कुलकर्णी यानी राज्यसरकार शी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थीती कथन केली   यावेळी संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थीतीबाबत  अडचणी कथन केली .   तसेच  ॲड आरती सदावर्ते -  पुरंदरे यानी ब्राह्मण समजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या सरक्षंणसाठी कडक कायदे करावे  असेहि त्या म्हणाले  यावेळी  राज्यपाल महोदयानी सगळ्या अडचणी  एकून घेउन तसेच सकारात्मक चर्चा करून  राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले .

सॉर्टेड सिमेन स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याचा गोदावरी दूध संघाचा महत्वपूर्ण निर्णय - परजणे

Image
कोपरगांव (प्रतिनिधी) :  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व अतिवृष्टीमुळे पशुपालकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची दखल घेवून गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ व बायफ ( बी. आय. एस. एल. डी.) संस्थेच्या संयुक्त सहकार्याने दूध उत्पादक सभासदांसाठी ९०० रुपयांऐवजी आता ६०० रुपये दराने सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देण्याची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे  यांनी केली. या निर्णयामुळे पशुपालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.   गोदावरी खोरे  दूध संघ व बायफ मित्र ( नाशिक ) यांच्या संयुक्त सहकार्याने 'बायफ कामधेनू' योजनेचा शुभारंभ संघाच्या कार्यस्थळावर  झाला. त्याप्रसंगी श्री परजणे  बोलत होते. कार्यक्रमास बायफचे राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, बायफचे मुख्य कार्यक्रम समन्वयक डॉ. सुधीर वागळे,  संचालक राजेंद्र जाधव, नाशिक बायफ कार्यालयाच्या अधिकारी नीधी परमार, डॉ. निशिकांत भंगाळे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगलेकर, राष्ट्रीय डेअरी व

पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना विनम्र अभिवादन

Image
  कोपरगांव  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता  पार्टीच्या सचिव स्नेहलता  कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात  भारताचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन  करण्यात आले . याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष  शरद थोरात, विजय आढाव, शहराध्यक्ष  दत्ता काले,जिल्हा सचिव  कैलास खैरे, अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष  विनोद राक्षे, गोपी गायकवाड, फकीरमंहमद पहिलवान, सतिष रानोडे, जनार्दन वायसे, सतीष वायसे आदी उपस्थित होते

स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंती निमित्त स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अभ्यासू व्यक्तिमत्व व कणखर नेतृत्व स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंती निमित्त आज माजी आमदार .स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली  या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, जिल्हा सचिव कैलास खैरे, शहराध्यक्ष डी.आर.काले,दिपक जपे,पप्पू दिवेकर,खालिक कुरेशी,रवींद्र बागुल,शशिकांत दरपेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला

तज्ज्ञांची मदत घेवून नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा : आ.मोनिका राजळे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Image
नगर : पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात 3 मुलांचा बळी गेला आहे. यापार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडभ्ने कार्यवाही करून तालुक्यातील मृत्युचे सत्र थांबविण्याची मागणी आ.मोनिका राजळे यांनी केली आहे. आ.राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड, जि.प.सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, विष्णूपंत अकोलकर, सुनिल ओहोळ, सुनिल परदेशी, काकासाहेब शिंदे, एकनाथ आटकर, सुभाष केकाण शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते. तालुक्यातील मौजे केळवंडी, मढी, कासार पिंपळगाव, शिरापूर बुधवंत वस्ती या भागात बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. कासार पिंपळगाव, जवखेडे, तिसगाव, धामणगांव, रांजणी, केळवंडी, माणिक दौंडी , वृध्देश्वर डोंगर परिसर, मायंबा डोंगर परिसर या परिसरातही बिबट्याने शेतकर्‍यांकडील अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बिबट्या नरभक्षक बनल्याने नागरिकांमध्ये भितीचे व घबराटीचे वातावरण आहे. वन विभाग व प्रशास

नगरपरिषदेने घर पाणी पट्टी तसेच शॉपींग सेटरमधील गाळयांचे भाडे माफ करावे.: शहर भारतीय जनता पार्टीची मागणी

Image
\कोपरगाव (प्रतिनिधी) :नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांची पाणीपटटी, घरपटटी तसेच शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे माफ करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने  मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्व आर्थीक व्यवहार ठप्प झाले आहे. रोजगार,उदयोगधंदे बंद असल्याने छोटे व्यावसायिक, फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरीकांची रोजची जगण्याची धडपड सुरू आहे.  उदरनिर्वाहाची चिंता  आहे.जीवन मरणाशी संघर्ष करावा लागत असलेल्या या परिस्थितीत अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली. अशी वस्तुस्थिती असतांना नगरपालिकेकडून आकारण्यात येणारी घरपटटी आणि पाणीपटटी धंदे पाणी नसल्याने  व्यापाऱ्यांना शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे भरण्याची आर्थीक ताकत राहिली नाही  यापुर्वीही माहे एप्रिल व मे मध्ये शहर भाजपाच्या वतीने नगरपालिकेला वारंवार  विनंती केली आहे. आज पुन्हा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भेटून शहरातील नागरीकांची घरपटटी व पाणीपटटी आणि शॉपींग सेंटरमधील गाळे धारकांचे भाडे माफ करण्याची मागणी  मुख्याधिकारी

शहरात पोलिसांसमोर रस्त्यावर लाथाबुक्क्याने मारहाण

Image
बारा जना विरुद्ध गुन्हा दाखल   कोपरगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुभाषनगर भागात रोडवर आपापसात झुंज करून लाथाबुक्क्यांनी  मारहाण करत असल्या प्रकरणी 12 जणांविरोधात  शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि काल दि. 29 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास  सुभाषनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी यातील आरोपी  कृष्णा अमरसिंग राठोड,  जया जाधव, शाहरुख शेख,  शुभम जाधव,   विजय आऱख,  चावला ( पुर्ण नाव माहीत नाही )  खिजर मणीया,र  तन्वीर रंगरेज,  एजाज मणीयार,  हिना ( पुर्ण नाव माहीत नाही )  मीना जाधव,  ज्योती पगारे सर्व रा सुभाषनगर कोपरगाव  हे सर्वजन तोंडास मास्क न लावता एकत्रीत जमवुन पोलिंसांसमोर सार्वजनीक ठिकाणी रोडवर आपसात झुंज करुन लाथाबुक्याने मारहाण करीत होते व शिवीगाऴ करुन सार्वजनीक शांततेचा भंग करीत होते. त्यामुळे  पो. कॉ. सुरजकुमार  अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन रात्री उशिरा वरील 12 आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे  गु.रजि.नं व कलम : 801/2020 भादवी कलम  160,188 269 270   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र 01 व

एकशे पस्तीस दिव्यांग बांधवांना ओळखपत्राचे वाटप

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा समाज कल्याण  कार्यालय व येथील लायन्स मूक बधिर अपंग विद्यालयाच्या वतीने  135 दिव्यांगांना ओळखपत्राचे वाटप विश्वस्त सुजित रोहमारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण डुकरे यांनी वैश्विक ओळखपत्राची महत्व व उपयोग याविषयी मार्गदर्शन केले अध्यक्षपदावरून बोलताना रोहमारे म्हणाले ओळखपत्राच्या आधारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो आधार कार्ड प्रमाणेच ओळखपत्र लाही महत्त्व आहे या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अध्यक्ष अशोक रोहमारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे जिल्हा परिषद सदस्य प्रसाद साबळे स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीर डागा यांचे विशेष सहाय्य लाभले या कार्यक्रम प्रसंगी परमेश्वर कराळे जयवंत मरसाळे मुकुंद काळे योगेश गंगवाल शरद खिलारी प्रवीण भुजाडे बाळासाहेब लांडे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन नारायण डुकरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भास्कर गुरसळ यांनी मानले.

महिला बचत गटांकडून होणारी मायक्रोफायनान्स कंपनीचे वसुली थांबवावी.

Image
  कोपरगाव (प्रतिनिधी) :  कोरोना महामारीमुळे आर्थीक घडी विस्कटलेली असतांना मायक्रोफायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटाला  जास्तीच्या व्याज दराने दिलेल्या कर्जाची वसुली सक्तीने सुरू केली आहे. त्यामुळे महिलांना मोठया आर्थीक कसरतीचा सामना करावा लागत आहे, महिला बचत गटांकडून होणारी कर्जाची वसुली त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,  स्नेहलता कोल्हे यांनी  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचेकडे केली आहे. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागातील अशीक्षित महिलांना त्यांच्या आर्थीक विवंचनेतचा फायदा घेत जास्तीच्या दराने कर्ज वितरण केले आहे. घरगुती अडचणीच्या काळात अशा कंपन्यांकडून अनेक महिला बचत गटाच्या महिलांनी कर्ज घेतलेले आहे. या महिलांच्या आर्थीक अडचणींचा आणि अशीक्षित पणाचा गैरफायदा घेउन विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्ज वितरीत केले. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहारही विस्कळीत झाले. या महिलांनाही या परिस्थितीची झळ बसली. त्यांच्या हाताला काम नाही, मोलमजुरी करून पोट भरणा-या महिलांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असल्याने मा

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुलचा बोकटे येथिल विद्यार्थी अजिंक्य बाबासाहेब दाभाडे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Image
  कोपरगाव (प्रतिनिधी) : मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. १६ फेब्रुवारी २०२० रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीचे पाच विद्यार्थी व इयत्ता आठवीचे तीन विद्यार्थी असे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहे. बोकटे येथिल शेतकरी कुटुंबातील अजिंक्य बाबासाहेब दाभाडे या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. यां बद्दल त्याचे बोकटे गावात सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे. अजिंक्य बाबासाहेब दाभाडे यांसह इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अॅड.सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विलास गाडे, जीवन गाडे, डॉ.भागिनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे.त्याचप्रमाणे तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आदींनी अभिनंदन केले.

१ नोव्हेंबरपासून - सिलेंडर नवे नियम

Image
मुंबई :  घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करणार आहेत. ही सिस्टिम नेमकी कशी असेल, जाणून घ्या.. या नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होता. त्यामुळे आता केवळ बुकिंग करून सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल. तुम्ही डिलिव्हरी बॉयला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही.   एखाद्या ग्राहकानं वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ऍपच्या मदतीनं रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येईल.  नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते. तेल कंपन्या सर्वप्रथम नवी यंत्रणा १०० स्म

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी, मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

Image
मुंबई : राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे.  त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे.  मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून यामुळे  नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळेल. 

काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

Image
अहमदनगर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एमआयडीसीमध्ये कामगारांची स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू असून स्वाक्षरी मोहिमेला  कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या प्रसंगी कामगारांना संबोधित करताना काळे म्हणाले की, कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे थेट कामावरून काढून टाकण्याची मुभा केंद्र सरकारने केलेल्या नवीन कामगार कायद्यांमध्ये भांडवलदारांना देण्यात आली आहे.  त्यामुळे कामगारांवर अचानक पणे बेरोजगार  होण्याची नामुष्की निर्माण झाली आहे. पूर्वी २० कामगार जरी असले तरी त्यांना कामावरून काढण्यापूर्वी सरकारकडे तसा प्रस्ताव देत मान्यता घ्यावी लागायची. आता ३०० कामगार संख्या असणाऱ्या कंपन्यांना कोणताही प्रस्ताव न देता व पूर्वपरवानगी न घेता कामगारांना कामावरून काढून टाकण्याची मुभा नवीन कायद्याप्रमाणे देण्‍यात आली असल्याबद्दल काळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. या कायद्यांना काँग्रेस आणि कामगारांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस कार्यकर्ते प्रत्यक्ष कामगारांमध्ये जा

शेतकर्‍यालाही वर्क फ्रॉम होम करता यावे यासाठी संशोधन करा ः उद्धव ठाकरे

Image
मुंबई ः शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकर्‍यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का? काही बाबी त्याला ‘वर्क फ्रॉम होम’ करता येतील का, याचा विचार संशोधकांनी करावा. शेतीला पाणी देणे, सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करताना शेतकर्‍यांना घरी बसून  पिकांना पाणी देय्याची व्यवस्था विकसित करता येईल का, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न्ा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती 2020ची 48वी सभा अकोला येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रे बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते ते पूर्णतः खुले राहिले. शेतकर्‍यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा आधिकाधिक उपयोग करून बीज

राष्ट्रविरोधी विधान करणाऱ्या जम्मु-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीला देशद्रोही घोषीत करा

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :जम्मु काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी च्या वादग्रस्त नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतेच  "जोपर्यंत जम्मु काश्मीर मध्ये 370 वे कलम  रद्द होत नाही तोपर्यंत भारताचा तिरंगा  ध्वज फडकविणार नाही"  अशा प्रकारचे राष्ट्रविरोधी विधान करून या देशाचा व  घटनेचा अपमान केलेला आहे,अशा राष्ट्रद्रोही विधान करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल  करून देशाच्या विरोधात कोणताही पक्ष-संघटना-  व्यक्ती अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस करणार नाही .अशा प्रकारचे निवेदन कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने  तहसीलदार  योगेश चंद्रे  यांना दिले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,प्रा.सुभाष शिंदे,विनायक गायकवाड,चेतन खुबाणी, संजय कांबळे,किरण थोरात,विनीत वाडेकर,योगेश वाणी, प्रमोद पाटील आदि  उपस्थीत होते.  यावेळी बोलतांना  शिंदे म्हणाले की  देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली तरी  भारतात काही राष्टविरोधी विघातक शक्ती  कार्यरत आहेत अशा शक्तीचा मुळापासून बिमोड केला पाहिजे जेणे करून  भारत मातेचे लचके तोडणाऱ्या अंतर्गत व बाह्य शक्तींना चपराक बसेल. भारतीय सेना व  पोलीस दल हे करण्यास सक्

कोपरगांव नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेतेसाठींच्या पीएम स्वनिधी योजनेची अंमलबजावणी प्रगती पथावर

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेत्यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग- शासन निर्णय क्र.पीएमस्वनिधी -२०२०-/प्र.क्र.७७/ नवि-२०. दिनांक :- १७ जून २०२०.यानुसार उध्दभवलेल्या कोविडच्या परिस्थितीमुळे पथविक्रेते यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे. त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय  सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरी फेरीवाला / पथविक्रेता  यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १००००/- इतके  कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रमाणे

गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्या कामधेनू' योजनेचा शुभारंभ

Image
कोपरगांव (प्रतिनिधी) : कोरोना व अतिवृष्टीमुळे पशुपालकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची दखल घेवून गोदावरी खोरे नामदेवराव परजणे  तालुका सहकारी दूध संघ व बायफ मित्र संस्थेच्या संयुक्त सहकार्याने कामधेनू योजना सुरु करण्यात येणार असून या योजनेचा शुभारंभ शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता संघाच्या सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे  यांनी दिली. कामधेनू योजनेअंतर्गत प्रामुख्याने सॉर्टेड सिमेन ( कृत्रिम रेतन ) कमी दरात उपलब्ध करुन देणे, पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नोंदणी करणे, नोंदणीकृत पशुपालकांना अनुदानावर ९० टक्के कालवडींची हमी असणारे सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देणे, जनावरांच्या आहारामध्ये अत्यावश्यक असलेल्या बायफ संस्थेच्या गुणवत्तापूर्ण खनिज मिश्रणाचा पुरवठा करणे, पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये जनावरांचे रक्त, लघवी, दूध, शेण व इतर तपासण्यांचे दर कमी करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश असून या योजनेचा शुभारंभ शनिवारी करण्यात येणार आहे. याप्रसंगी बायफचे राज्य विभागीय संचालक डॉ. व्ही. बी. दयासा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, बायफचे मु

रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचल्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही

Image
कोपरगांव (प्रतिनिधी) :रेल्वेच्या लाईन खाली असलेले भुयारी रस्त्यात चौकी क्रमांक 68 व 69 मध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने या भागातील दळणवळण पुर्णपणे ठप्प झाले आहे सदरचे साचलेल्या पाणी काढुन रस्ता पुर्ववत सुरु करुन द्यावा किंवा पर्यायी व्यवस्था म्हणुन चौकीवरील गेट चालु करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव  स्नेहलता  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंचलगांव, ओगदी, बोलकी ,खिर्डी गणेश, करंजी, शिंगणापुर या परिसरातील ग्रामस्थांनी   स्टेशन मास्तर भैरवनाथ केशवाणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.   झालेल्या पावसामुळे मनमाड दौंड रेल्वे मार्गावर कोपरगांव रेल्वे स्टेशनपासुन 2 कि.मी. अंतरावर असलेली चांदरवस्ती जवळील चैकी नं 68 व कोपरगांव रेल्वे स्टेषन पासुन 3 कि.मी. अंतरावर असलेले गायकवाड वस्ती जवळील चौकी नं. 69 या दोन्ही रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे रस्ता बंद झाला असून शेतक-यांना शेती माल, दुध तसेच आजारी  नागरिकांना औषधोपचारासाठी दवाखान

कोपरगाव नगरपरिषद पुन्हा भ्रष्ट कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून जनतेने मला विधानसभेत पाठविले नाही : विजय वहाडणे

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मला कमी मते पडली, पराभव झाला तरी मी प्रत्येक प्रभागात राजकारण न करता विकासकामे करत आहे करणार आहे. लोकप्रिय ताईंच्या अतिलोकप्रिय पुत्राने आधी सांगावे, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? शेकडो कोटी रुपये निधी आणल्याचे सांगता, पण कुणाला किती कोटी रुपये कमिशन मिळाले हे का सांगत नाही. छातीठोकपणे सांगतो कि मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे मी नगराध्यक्ष झाल्यापासून साडेतीन वर्षात केलेली आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला ती कामे माहिती आहेत. तुम्ही आमदार असतांना मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही, कारभारात अडथळे आणले, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी दिल्लीपासून प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसवले हे ध्यानात घ्या. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले. कोपरगाचे हक्काचे क्रीडासंकुल पळविणारेच विचारतात क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्र

सुधाकर मुळे यांचे निधन

Image
  कोपरगाव (प्रतिनिधी) :येथील ब्राह्मण सभेचे जेष्ठ सभासद  सुधाकर नारायण मुळे वय 81 यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले तीन मुली पत्नी नातू असा परिवार आहे आहे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी के जे सोमय्या महाविद्यालय च्या वतीने व व ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा

Image
कोपरगांवपासून 23 कि.मी. वर अहमदनगर जिल्ह्याच्या (पूर्वीच्या कोपरगांव तालुक्यातील व आताच्या) राहता तालुक्यातील पुणतांबा गावाला हजारो वर्षांची धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. ही राजा विक्रमादित्याची राजधानी होती. गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा ताम्रनगरी असे होते. एक रात्रीत तांब्याची बनवलेली नगरी म्हणूनही या गावाला ताम्रनागरी म्हणत असावे. गाव गोदातीरी वसले असून पुणतांबा गावाला दक्षिणकाशी पण म्हणतात. येथेच नदी काठी यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे.श्री यज्ञसेनी देवी माता ही परिसरातील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.  देवीची आख्यायिका : शके १६८१ पूर्व काळामध्ये हरिशचन्द्र राजा येथे राज्य करीत होता, त्याच्या मुलास 'जलोदर' नावाचा आजार झाला. अनेक वैद्यांना दाखवूनही आजार बरा झाला नाही. राजास एका रात्री स्वप्न पडले राज्याच्या पश्चिमेला गोदावरी नदी काठी यज्ञ करून त्या यज्ञात १२ वर्षाच्या आतील लहान मुलाचा बळी दिल्यास रोग बरा होईल. राजाने राज्यात दवंडी पिटवली जो कोणी ब्राह्मण आपल्या मुलाला राज्याकडे देईल त्याला मुलाच्या वजनाइतके सोने दान करण्यात येईल. राज्याच्या जवळ पुरणगावात गोऱ्हे आडनावाचे

गोदावरी नदी स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :शहरातील गोदावरी नदी पात्राची एकीकडे सामाजिक कार्यकर्ते  गोदावरी नदी कशी स्वच्छ राहील यासाठी झटत आहे तर एकीकडे याच नदी पात्रात निर्माल्य प्लास्टिक पिशव्या अन्य कचरा टाकण्यासाठी नागरिक अथक परिश्रम घेत आहे मात्र या टाकलेल्या निर्माल्य प्लास्टिक कचरा यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत आहे याकडे नागरिक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदी स्वच्छ व सुंदर रहावी यासाठी गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष स्वछता दूत आदिनाथ ढाकणे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दर रविवारी नदी पात्रातील केर कचरा निर्माल्य फाटलेले कपडे, भंग झालेल्या देवाच्या मूर्ती फोटो नदी पत्रातून बाहेर काढून नदीपत्राची स्वछता करण्याचे व्रत हाती घेऊन हे अभियान राबवतात या अभियानाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचे देखील योगदान सतत लाभत असते मात्र दसरा सण झाला अन सणा निमित्त जमा झालेले फुल हार निर्माल्य स्थापन केलेले घट गोदावरी नदी पात्रात  विसर्जित करण्यासाठी कोपरगाव शहरातील नागरिक सकाळपासून येताना दिसत होते नदी काठाजवळ तयार करण्यात आलेल्या निर्माल्य संकलन कुंडाचा नागरिकांना विसर पडला नागरिकांनी

कोपरगाव शहरातील आठवडे बाजार पुर्वीप्रमाणेच एकाच ठिकाणी भरविण्यात यावा

Image
कोपरगाव - कोपरगाव शहरातील सोमवारचा आठवडे बाजार पुर्वीप्रमाणेच बाजारतळ येथील मैदानावर एकाच ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, व्यापारी संघर्ष समिती, भाजपा पदाधिकारी, नगरसेवक यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोपरगाव नगरपरिषद् हददीतील उपनगरांमध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विक्रेते, फळे व्यापारी, किराणा व्यापारी , तसेच कपडे व्यापारी, छोटे व्यवसाय करणारे रस्त्याच्या दुतर्फा बसुन व्यवसाय करीत आहे. त्यामुळे ओट्यावर बसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय समाधानकारक होत नसल्याने भाजीपाला व्यवसायिकांच्या मागणीचा विचार करून बाजारतळ येथे आठवडे बाजार भरविण्यात यावा, या मागणीचे निवदेन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी  मुख्याधिकारी यांना दिले.यावेळी श्री निखाडे यांचे समवेत गटनेते रविंद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, राजेंद्र सोनवणे, आरीफ कुरेशी, वैभव गिरमे, अकबर शेख, शरद त्रिभुवन आदी उपस्थित होते. जगासह, देशात प्रादुर्भाव हो

आज ऑनलाईन रोजगार मेळावा

Image
अहमदनगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर जिल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, अहमदनगर आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 27 ते 28 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.मुलाखती हया ऑनलाईन पध्दतीने जसे व्हॉट्सॲप कॉलिंग, स्काईप किंवा टेलिफोनवरुन घेण्यात येतील. उपलब्ध रिक्तपदांची संख्या 152 असून त्या पुढील प्रमाणे आहे. 1) उद्योजकाचे नाव श्री व्यकटेश मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अहमदनगर पदाचे नाव एच.आर व टेलिकॉलर शैक्षणीक पात्रता बी. कॉम, वयोमर्यादा 20 ते 45, पदांची संख्या 1, 2) उद्योजकाचे नाव अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी, अहमदनगर पदाचे नाव एजन्सी मॅनेजर. शैक्षणीक पात्रता बी. कॉम, वयोमर्यादा 25 ते 50, पदांची संख्या 3, 3) उद्योजकाचे नाव युरेका फोर्ब्स लि.प्लॉप नं. 301/302 प्रेरणा आर्केड तारकपूर बस स्टँड जवळ, अहमदनगर पदाचे नाव एच.आर. शैक्षणीक पात्रता मार्केटींग एक्झिक्युटिव्ह, वयोमर्यादा 15 ते 30, पदांची संख्या 25, 4) उद्योजकाचे नाव गोल इंजिन

संजीवनी अकॅडमीत सीबीएसई पॅटर्नचे इ. ११ वी, १२ वी वर्गांना मान्यता : सौ. मनाली कोल्हे

Image
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सायन्स व काॅमर्सचे प्रवेश  सुरू कोपरगांव (प्रतिनिधी) : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  अतंर्गत २००५ साली संजीवनी अकॅडमी या सीबीएसई पटर्नच्या स्कूलची स्थापना झाली असुन या शाळेतील  इ. 10 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात राज्य व देश  पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आणि   शाळेने  पालकांची विश्वासार्हता  प्राप्त केली आहे. आता पालकांच्या व विध्यार्थ्यांच्या  मागणी नुसार ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना  दर्जेदार शिक्षण  देण्यासाठी संजीवनी अकॅडमीला सीबीएसई कडून इ. ११वी आणि १२ वीचे सायन्य व काॅमर्स शाखेचे  वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली असुन इ. ११ वीची प्रवेश  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी  माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. संजीवनी अकॅडमीमध्ये सी.बी.एस.ई. पॅटर्न अंतर्गत इ. ११ वी व १२ वी सायन्स आणि काॅमर्स विद्या शाखांना  परवानगी मिळाल्याबध्दल आणि सिनिअर सेंकंडरी स्कूलचा दर्जा प्राप्त झाल्याबध्दल सकूलमध्ये नुकताच माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे आणि संजीवनी ग्रप

कोपरगांव शहराचा विकास करण्यात नगराध्यक्ष अपयशी : विवेक कोल्हे

Image
दोन तीन आठवड्यात खोकाशाॅपचा प्रश्न मार्गीलावा अन्यथा जनअंदोलन करु  कोपरगांव (प्रतिनिधी) :शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेत दोन महिन्यातुन एकदा सर्वसाधारण सभा होणे हे नगराध्यक्षांची जवाबदारी असतांना देखील त्यांनी केले नाही. 2016 मध्ये पालिकेची निवडणुक झाली पालिकेत 15 एप्रिल 2017 व 15 सप्टेंबर 2020 रोजी शेवटची सभा झाली आज अखेर एकुण 13 सर्वसाधारण सभा झाल्या आहेत कायद्यानुसार निवडणुक झाल्यापासुन आज अखेर 27 सभा होणे गरजेचे असतांना त्यांनी ते केले नाही पालिकेची निवडणुक होवुन चार वर्ष झाले त्यांनी केलेल्या कामाची पावती नगराध्यक्षांना 2019 च्या निवडणुकीत कोपरगांवकरांनी दाखवुन दिले. 17 ते 18 हजार मते मिळवले नगराध्यक्ष तीन वर्षात तेराशे मतावर आले. नौतिकतेची जवाबदारी म्हणुन त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन , युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. नुकतेच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेवक स्वप्नील निखाडे यांची बिनविरोध निवड झाली उपनगराध्यक्षपदाचा पदभार प्रसंगी विवेक कोल्हे बोलत होते.  पराग संधान अमृत संजीवनी, आप्पासा

लखीचंद कृष्णानी यांचे निधन

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : सिंधी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखीचंद मोटूमल कृष्णानी वय 59 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली पत्नी नातू पण तू असा परिवार आहे मनोहर  कृष्णानी यांचे ते चुलत बंधू होत.

रामदासी बाबांचे निस्सीम भक्त कचेश्वर जाधव यांचे निधन

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेले रामदासी बाबा भक्त मंडळाचे ज्येष्ठ  सदस्य कचेश्वर रामा जाधव वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यामागे दोन मुले मुलगी नातू असा परिवार आहे कोकमठाण येथे गोदावरी नदी तिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कै कचेश्वर जाधव कोकमठाण येथील रामदासी बाबा यांचे परमभक्त होते रामदासी बाबांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे रामायण तोंडपाठ होते श्रीराम जय राम जय जय राम हा मन्त्र ते कायम म्हणत कायम सायकलवरून प्रवास व सुतार की तिचा व्यवसाय ते करीत परमपूज्य रामदासी बाबांची महती ते चालता-बोलता कोणालाही सांगत असत साधी राहणी उच्च विचारसरणी असे व्यक्तिमत्व त्यांचे होते धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असे कै कचेश्वर जाधव यांना रामदासी भक्त मंडळाच्या वतीने व कोकमठाण ग्रामस्थांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

बालकवींना व्यक्तिमत्व विकासासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे : माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील

Image
कोपरगांव (प्रतिनिधी) : शालेय जीवनापासूनच व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी व्यासपीठ निर्माण करून दिल्यास  गुणात्मक विकास होण्यासाठी निश्चित मदत होऊ शकेल असे मत माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी संकल्पना फाउंडेशन च्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण छोटेखानी समारंभात व्यक्त केले तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजिक , शैक्षणिक,क्रीडा आणि कला सांस्कृतिक क्षेत्राला संबंधित विभागाने तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असेही ते  म्हणाले. याप्रसंगी मसूटा हा ज्वलंत सामाजिक विषय घेवून मराठी सिनेसृष्टीत  स्थान निर्माण करून देणारे चित्रपट निर्माते भरत मोरे यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाउल टाकल्यानंतर माझा हा पहिलाच सन्मान झाला त्यामुळे तो एखाद्या मानाच्या पुरस्कारापेक्षा कमी नाही . ज्या क्षेत्रात मी कार्यरत आहे तिथे शब्दांना असणारे महत्व आणि शब्दांच क

शेतकऱ्यांनी शेतीमाल निर्यात करण्यासाठी किसान स्पेशल एक्सप्रेसचा लाभ घ्यावा : कैलास ठोळे

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) :  कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने शेतीमाल पाठवण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकातून किसान स्पेशल एक्सप्रेस दर मंगळवार गुरुवार व शनिवार या आठवड्यातून  तीन वारी जाणार आहे अशी माहिती अशी माहिती रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर एच एल मीना यांनी दिली ते म्हणाले ही किसन स्पेशल एक्सप्रेस कोपरगाव होऊन दानापूर मुजफ्फरपुर बिहार येथे शेतीमाल घेऊन जात आहे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कोपरगाव रेल्वे स्थानकात बुकिंग करावा त्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी भाड्यामध्ये दिली जात आहे शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी असून त्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सध्या कोपरगाव रेल्वे स्थानकातून गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस, पुणे दानापुर एक्सप्रेस, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, हुबळी वाराणसी एक्सप्रेस, कर्नाटका बेंगलोर दिल्ली एक्सप्रेस व पुणे गोरखपुर एक्सप्रेस अशा सहा गाड्या दिवाळी सणाच्या प्रवासी सेवेसाठी सुरू झाल्या आहेत कोपरगाव रेल्वे स्थानक हे शिर्डीला जोडले गेल्याने येवला ते कोपरगाव अशी ड

शेती महामंडळाच्या जमिनी गांवठाण म्हणून घोषित करुन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा - परजणे

Image
कोपरगांव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मणवाडी, दशरथवाडी, रामवाडी व बिरोबा चौक या वाड्यांवरील जमिनी गांवठाण म्हणून घोषित करुन तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी सन १९९५ पासून आम्ही करीत आलेलो असून आता तरी या मागणीचा विचार होवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे  यांनी महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शेती महामंडळाच्या या जमिनीपैकी रामवाडी येथे ११ एकर, बिरोबा चौक येथे ३ एकर, लक्ष्मणवाडी येथे १५ एकर व दशरथवाडी येथे २१ एकर जमिनी असून गेल्या तीन ते चार पिढ्यांपासून कर्मचारी या जमिनींवर वास्तव्यास आहेत. कुटुंबातली कर्ती - सवरती माणसे मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबातले वारस उपजिविकेसाठी आजही या वाड्यांवर राहतात. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतःची घरे नसल्याने विस्तापित होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. जागेअभावी या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या घरकूल योजना, जागेचा उतारा, पाणी पु

डॉ. रामचंद्र साबळे त्यांचे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे हवामानाचे अंदाज : कारभारीभाऊ परजने

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्याचे हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी अतिशय चिकित्सक अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे हवामानाचे अंदाज गेल्या चार महिन्यापासून दिल्याने त्यांचे संवत्सर येथील माजी सभापती कारभारीभाऊ परजने  यांनी विशेष आभार मानले आहेत.  डॉ. रामचंद्र साबळे यांचे हवामान विषयक विश्लेषण अत्यंत योग्य आणि काटेकोर आहे.  त्यांच्या हवामान अंदाजाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात,  त्याचा शेतकरी बारकाईने अभ्यास करतात आणि त्याप्रमाणे आपल्या शेतातील पीक पाण्याचे नियोजन करत असतात. हवामान तज्ञ डॉ. साबळे यांनी चार महिने पाऊस राहणार असा अंदाज सुरुवातीलाच व्यक्त केला होता तो अतिशय तंतोतंत खरा ठरला.   त्यांच्या या चिकित्सक अभ्यासाचा अहमदनगर जिल्ह्यासह  राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.   डॉ.  साबळे हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने मित्र ठरले आहेत त्यांच्या भविष्यातील वाटचालीस एक शेतकरी म्हणून मी सदिच्छा व्यक्त करतो असेही कारभारीभाऊ परजने  यांनी शेवटी म्हटले आहे. 

वारंवार भेटी घेउन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करावी : साहेबराव रोहोम

Image
 कोपरगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेला बळीराजा सातत्याने आर्थीक चटके सहन करत आहे, अशा परिस्तिथीत शेतकऱ्याला सांत्वनाची नाही तर आर्थीक मदतीची गरज आहे, वारंवार भेटी घेउन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी  केली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाची तीव्रता प्रचंड असल्याने नागरीकांची घरे पडली, काही घरांची पत्रे उडाली. अनेक नागरीक बेघर झाली. फळबागांचे मोठे नुकसान झाले.शेतात असलेली उभ्या पिकांना या अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. उसाची पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थीक घडी विस्कटलेली असतांना पदरमोड करून शेतीमध्ये पीके उभी केली. वारंवार येणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे हातात येणारी पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. चोहोबाजुने आलेल्या या संकटामुळे बळीराजा आर्थीक झळ सहन करत आहे, सातत्याने येणा-या संकटामुळे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पदभार स्विकारला

Image
अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. क्षीरसागर यांची नुकतीच कोकण विभागातून नगरला बदली झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी क्षीरसागर यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, मिरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अजय फटांगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मंगला वराडे, सुनील कुमार राठी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, नगर जिल्ह्यात आपण यापूर्वीही काम केलेले आहे. नेवासा तहसीलदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, संगमनेर प्रांताधिकारी म्हणून काम केलेले आहे. मधल्या पंधरा वर्षात नगरशी संपर्क नसला तरी नगरमध्ये पुन्हा यायला मिळाले याचा आनंद आहे. नगर जिल्हा हा खूप प्रगतीशील विचारांचा आहे. अनेक चांगल्या योजना, उपक्रमांची मुहूर्तमेढ या जिल्ह्यात रोवली गेली आहे.  त्यामुळे सर्वांना सोबत घेवून जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न राहिल. यासाठी सर्व

नगर-मनमाड महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था

Image
कोपरगाव (प्रतिनिधी) : नगर-मनमाड महामार्गाची  मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे  या रस्त्यावर  पडले आहेत दररोज या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करतात शेकडो चालक  आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवित आहेत  सदरचा रस्ता  तातडीने  दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी  सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे  श्री काळे यांनी कोपरगाव कोल्हार प्रेक्षणीय पायवाटीचे पर्यटन करण्यासाठी  गेले होते. कोपरगाव शहर हद्दीतील केवळ कंबरा एवढ्या खड्ड्यात उभे राहून बसून त्यांनी या रस्त्याचे छायाचित्र काढले. महाराष्ट्र शासनाने पुर्वी ग्रामीण भागात रस्त्यावर लाकडी चाकाच्या बैलगाड्या जाऊन पडणाऱ्या आसाऱ्यांचा राज्य महामार्गावर  अनुभव दिला.. कोपरगाव ते कोल्हार शासनाच्या अवकृपेने असे अनेक प्रेक्षणीय खड्डे व त्याचे फोटोग्राफ श्री काळे यांनी काढून संबंधित विभागाला पाठवले आहेत. *भारतात ह्या मौत का कुआ रस्त़्यावर गाड्या चालवणारे dare devil drivers चालक मी आपणास दाखवणार आहे.. हे चालक ह्या रस्त्यावर प्रवास करताना बायकोच्या कपाळाचे कुंकु पुसुन प्रवास करतात.. त्याबाबत श्री काळे यांनी त्याचा निषे

गुरुवारी तालुक्यात तासभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Image
काढणीला आलेल्या पीकांची दानादान  दोन इंच पावसाची नोंद पिके चालली सडून कोपरगाव (प्रतिनिधी) : शहर व तालुक्याच्या परिसरात आज विजेच्या कडकडाटासह  मुसळधार पाऊस पडला त्यामुळे शेतांना व शहरात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तळी साठी होती परतीचा हा पाऊस प्रचंड नुकसानीचा ठरला हा पाऊस घट माळीत अडकला असल्याने शेतकरी व भाविक चिंतेत पडले आहेत जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर सुमारे 47 मिलिमीटर अंदाजे 2 इंच पाऊस पडल्याची माहिती प्रभारी हवामान निरीक्षण चेतन परे यांनी दिली रविवारीही पंचेचाळीस मिलिमीटर पाऊस पडला होता पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्याप्रमाणे रविवारी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी सुरू झालेला पाऊस  दोन वाजून ३६मिनिटांनी संपला. या पावसामुळे शेतात सोंगन्या अभावी उभ्या असलेल्या खरीप पिकांची पुन्हा एकदा वाट लागली आहे. अति पावसाचा  साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, आधीच कोरो ना महामारी मुळे सर्वजण मेटाकुटीला आले असून वरूनराजा आणखी बरसत राहिला

राज्य शासन खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Image
अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण करुन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना निश्चितपणे राज्य शासन दिलासा देईल. शेतकर्‍यांची दिवाळी गोड होईल, यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिला. आज त्यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील विविध गावांत जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली,. त्यावेळी नुकसानीची माहिती सांगणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देत राज्य शासन खंबीरपणे तुमच्या पाठिशी असल्याचा शब्द त्यांनी दिला. यावेळी अतिशय आस्थेवाईकपणे संवाद साधत चौकशी करणार्‍या मंत्रीमहोदयांना पाहून शेतकर्‍यांनीही त्यांच्या संवादास प्रतिसाद दिला. आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील करंजी, निपाणीजळगाव, फुंदे टाकळी, येळी, मुंगुसवाडे, आंतरवली, गोळेगाव, बोधेगाव, चापडगाव, करंजी आदी विविध गावातील भागाची पाहणी केली. तेथील शेतकरी वर्गाशी थेट शेतात जाऊन संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्