क्षेत्र कोणतेही असो जिद्द आणि चिकाटी असल्यास यश हमखास मिळते : औताडे


कोपरगाव (प्रतिनिधी) : करिअर निर्माण करण्यासाठी अनेक पर्याय खुले असतात. ज्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना रस असतो ती साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्षेत्र कोणतेही असो अभ्यासामध्ये सातत्य, ध्येय आणि चिकाटी असल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी केले.

ते अहमदनगर जिल्हात यूपीएससी एनडीएच्या परीक्षेत एकमेव उत्तीर्ण झालेल्या प्रथमेश हासे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करताना बोलत होते.

यावेळी शारदा स्कूलचे प्राचार्य भारत सावंत, संजय हासे, गणेश हासे, सचिन घुगे, श्री. वसावे, पतसंस्थेचे व्यवस्थापक घेगडमल आदि उपस्थित होते.पोहेगाव मुजमुले वस्ती शाळेत पंधरा वर्षे आदर्श शिक्षक म्हणून काम केलेले व सध्या चांदगव्हाण प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या संजय हासे यांच्या मुलाने प्रथमेश स़ंजय हासे यांनी युपीएससी एनडीए परिक्षेत यश संपादन केले.देशात या परिक्षेसाठी 12 लाख विद्यार्थी आँनलाईन बसले होते.त्यापैकी 350 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.नगर जिल्हात प्रथमेश हासे हा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.पुणे येथे नँशनल डिफेन्स अकॅडमी येथे बिटेक डिग्री होणार असून तीन वर्षानंतर उच्च अधिकारी पदावर काम करण्याची संधी प्रथमेश हासे यांना मिळणार आहे.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला. शेवटी आभार पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश हेगडमळ यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा