राज्यातील रेस्टॉरंट,बार सुरु करण्यास परवानगी



मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत. 

रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.

दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा