गोदावरी नदीपात्रात तरुणाची आत्महत्या


कोपरगांव (प्रतिनिधी) : शहरातील सुभाषनगर येथील वाल्मिक दगडू आवारे वय 34 या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली  त्या इसमाचा शहरानजीक   नदीकाठालगत असलेल्या दत्तपाराजवळ  मृतदेह आढळून आला. आत्महत्ये मागचे कारण कळु शकलेनाही. सदर तरुण हा नगरपरिषदेत कांही महिन्या पूर्वी आरोग्य विभागात कर्तव्यावर होता त्यामुळे नगरपरिषदेत कामावर असलेल्या कर्मचार्‍यांचा हा आठ महिन्यात तिसरा मृत्यू ठरला आहे. मयत आवारे हा दोन दिवसापासून बेपत्ता होता दि 24/9/2020 रोजी सकाळी 7.30 वा. नदीपात्रालगत तो मृतावस्थेत आढळला त्याचे मागे आर्इ, वडिल, पत्नी, भाऊ  तीन मुली  एक मुलगा असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पो.हे.कॉ एस एच गायमुखे पुढील तपास करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा