कोपरगावच्या तरुणाची धडपड ऋषिकेश कन्याकुमारीपर्यंत विकले हॅण्ड सॅनीटायझर डिस्पेंसर


कोपरगाव (प्रतिनिधी) : जगात कोरोनाची महामारी आली आणि अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. जगात 50 कोटी लोकांचे रोजगार गेले, पण कोपरगावच्या अभिजित वाघ या तरुणाने ही संधी मानून त्यावर काम केले आणि स्व:ताच्या बुद्धीने मेक इन इंडिया अंतर्गत कॉन्टॅक्ट लेन्स  हॅण्ड सॅनीटायझर डिस्पेंसर  तयार करून फ्लिपकार्टमार्फत त्याची ऋषिकेश ते कन्याकुमारीपर्यंत विक्रीही केली, त्याच्या या उपकरणाला सध्या तरी बऱ्यापैकी मागणी आहे.

कोपरगाव शहरातील गिरमे चाळ येथे राहणारा अभिजित वाघ हा बारावी आयटीआय उत्तीर्ण आहे. विद्युत तंत्रज्ञ क्षेत्रात त्याने अनेक नवनवीन उपकरणे तयार करत आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवली आहे. लॉकडाऊन ्चा काळ त्याच्यासाठी संधी ठरला आहे. कोरोना महामारीत सर्वसामान्यांपासून ते अतिउच्च व्यक्तींपर्यंत सॅनिटायझर सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अभिजित वाघ याने अनेक नवनवीन उपकरणे तयार केली covid-19 अंतर्गत त्याने कॉन्टॅक्ट लेन्स तयार केले त्याची फ्लिपकार्टवर जाहिरात केली आणि बघता बघता त्याच्या उपकरणाला ऋषिकेश पासून कन्याकुमारीपर्यंत मागणी येऊ लागली.   साईबाबांच्या शिर्डीत सध्या हॉटेल व्यवसाय मंदीत असतानाही त्याची पंधरा उपकरणे लागले आहेत, तर शासनाने ज्या ज्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात कोवि ड सेंटर उभारले त्यात ठाणे मुंबई येथे पंधरा-पंधरा डिस्पेंसर उपकरणे लागले आहेत. विविध सामाजिक संस्था सहकारी साखर कारखाने, छोटी-मोठी रुग्णालय, धार्मिक स्थळे आता या कॉन्टॅक्ट लेन्स हॅण्ड सॅनीटायझर डिस्पेंसरसाठी थसेंं  संपर्क करू लागले आहेत.  कोपरगावसारख्या ग्रामीण भागातून त्याने ऋषिकेशपर्यंत मारलेली मजल मजल कौतुकाचा विषय ठरत आहे. त्याने व्हिजन इंजिनियर्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, कोपरगाव, मोबाईल 7517591199 या नावाने उपकरण बाजारात आणले आहे. 


Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा