कोपरगाव भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात पंडीतजी दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी
कोपरगाव (प्रतिनिधी) : 25 सप्टेंबर 1916 रोजी जन्माला आलेले आदर्श थोर समाजसेवक, अर्थतज्ञ, पत्रकार शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे महापुरूष अशी ख्याती असलेले भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव पंडीतजी दिनदयाळ उपाध्याय होते.
प्रदेशसचिव व माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र बोरावके, शरद थोरात, संचालक बाळासाहेब नरोडे, तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, शहर अध्यक्ष कैलास खैरे, सुशांत खैरे, वैभव आढाव, नगरसेवक स्वप्नील निखाडे, बाळासाहेब केकाण, गोपी गायकवाड, सतीश रानोडे, जगदीश मोरे, रोहन दरपेल, दिनेश गाडेकर आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.
याप्रसंगी बोरावके म्हणाले पंडीत उपाध्याय यांची त्या काळातील प्रॉर्पटी म्हणजे फक्त दोन ड्रेस ते घरदार प्रपंच किंवा कोणत्याही नातेवाईकामध्ये गुरफटले नाही. त्या काळातील कम्युनिझम विचार, साम्यवाद, भांडवलदार शाहीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना होत असतांना उडी घेतली. आदर्श विचार मांडणे त्यांनी कधीही आमदार, खासदारकी चे स्वप्न पाहिले नाही. काही वर्ष रेल्वेस्टेशनवरच गेले. नेहरूंच्या काळात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते तेंव्हा गोरगरीबांचे हाल भ्रष्टाचार होत असतांना त्यांनी आवाज उठविला परंतू त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कॉग्रेस पदाचा राजीनामा देवुन यापुढे कॉग्रेस संपुष्टात आणल्या शिवाय मी स्वस्थ राहाणार नाही अशी शपथ घेतली. पहिले भाजपाचे अध्यक्ष म्हणुन शामाप्रसाद यांची वर्णी लागली. सरचिटणीस म्हणुन काम पाहिले. या थोर पुरूषामुळेच आज केंद्रामध्ये भाजपाची सत्ता पाहावयास मिळत आहे. शेवटच्या घटकापर्यत कामे व्हावे, प्रत्येकाला घर मिळावे, बँक खात्यावर पैसे मिळावे याची अंमलबजावणी पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. यावेळी साहेबराव रोहोम यांचे मनोगत झाले तर सुत्रसंचलन सुशांत खैरे यांनी तर कैलास खैरे यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment