घोडके परिवाराचा कोविड योद्धा सुशांत
कोपरगाव (प्रतिनिधी) : सेवाव्रती, कोपरगांवकरांसोबत जिव्हाळा जपणारे स्वच्छतादूत, आपत्ती व्यवस्थापनचे समन्वयक, सूर्यतेज संस्थापक, अष्टपैलू व्यक्तीमत्व .सुशांत घोडके ज्यांचे विषयी लिखाण हाती घेतले तेव्हा शब्दही हात जोडून उभे राहिले.ज्यांच्या नियमित सहभागामुळे कोपरगांवकरांच्या सण-उत्सव-परंपरा जतन राहिल्या आहे.ज्यांचे अहोरात्र मेहनतीने शिवजयंती उत्सवासह अनेक राष्ट्रपुरुषांचे उत्सव आजही साजरे होण्यास मोलाचे सहकार्य लाभले.ज्यांचेमुळे श्रीगणेश सार्वजनिक उत्सवाला विविध स्पर्धांचे माध्यमातून विधायक कार्याला प्रेरणा मिळाली. ज्यांचे सूर्यतेज संस्थेमुळे अनेकांच्या जीवनातील अंधकार उजळला,ज्यांच्या कामामुळे स्वच्छतादूत, समन्वयक अशा पदांना प्रतिष्ठा आली. ज्यांच्या अथक प्रयत्नातून वृक्षारोपण चळवळीला आयाम मिळाला व कोपरगांव, राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात ५० हजारापेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व पालकत्व अभियान पाच वर्षात जोरदार राबविण्यात आले व यशस्वी झाले. ज्यांच्यामुळे कला व नाट्यसृष्टीला नवीन उर्जा मिळाली. ज्यांच्या निसर्गप्रेमाने वन्यजीव, पशू, पक्षी यांचे संवर्धनाचे मोल समजून पर्यावरणाची लोक चळवळ उभी राहिली. ज्यांच्या निलफलक व इतिहास संशोधकांनातून कोपरगावचा इतिहास भावी पिढीसमोर उजेडात आणण्यासाठी मोलाची मदत झाली. ज्यांच्या व्यंगचित्रांना अनेक दिग्गजयांनी दाद दिली. ज्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सेट पाहून अनेक थक्क झाले. ज्याच्या विविध सामाजिक संकल्पना व योजनांतील काही घटकांचा केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांना मदत झाली. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सुशांत व त्यांचे प्रामाणिक सहकारी यांनी गेल्या वीस वर्षांत करुन दाखवले.व आजही करत आहे. सुशांत म्हणजे कोपरगांवकरांचा संस्कृतीचा चालता-बोलता ईतिहासच आहे असे होते कोपरगाव हे पुस्तक ज्येष्ठ नेते काकासाहेब कोयटे यांनी करण्यासाठी हाती घेतली त्यावेळी सुशांत व पत्रकार महेश जोशी यांनी मोलाची मदत केली होती. डॉक्टर अजय गर्जे यांनी साई नगर भागात उभारलेल्या औषधी वनस्पती बागेतही त्याचा खारीचा वाटा आहे अगदी सर्वसामान्यांचा हक्काचा माणुस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या सर्व कामांची ओळख कोपरगांवकरांचे ठायीं होती.पण गेल्या सहा-सात महिण्यापासून कोपरगांव शहरासह तालुक्यातील वाड्या-वस्तीवरील ग्रामीण जनता जे अनुभवत आहे.ते त्यांचे काम आणि माणुसपण अगदी वेगळचं आहे. क्षणोक्षणी जीव धोक्यात घालून केलेल्या कार्यही शब्दापलीकडे आहे.या वर्षातील फेब्रुवारी महिणा असेल, कोरोना हा संसर्ग भारतात येवून ठेपला तेव्हा स्वताचे तोंडाला उपरणे बांधून लोकांनी तोंडाला मास्क नसेल तर किमान रुमाल तरी बांधा अशी जनजागृती मोहीम हाती घेतली.तेव्हा लोक गमतीने बघत होते.परंतु या विषयाचे गांभीर्य वेळोवेळी मिळणाऱ्या माहितीने जाणवत होते. नंतर मार्च मध्ये लाँकडाऊन सुरु झाले अन् नगर मनमाड हायवेवर पुणतांबा चौफुली ते येवला टोल नाका येथे प्रवासी जिल्हा हद्द शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत येत असल्याची जिल्हाप्रसानाकडून मिळाली.भर तळपत्या उन्हात लेकरंबाळांसह मोलमजुरी करणारे अनेक कुटुंब पायी येत होती. भर उन्हात या लोकांची माहिती घेवून त्यांना पुढील प्रवासासाठी गाईड म्हणून सुशांत व त्यांचे आपत्ती व्यवस्थापन सहकारी यांनी उत्तम काम केले.भिती पोटी मदतीचे मागे पडलेले हात त्यांचे धाडसामुळे सरसावले. कोपरगांवतून जो-तो त्यांना फोन करुन सांगायचा काही लागलेच तर आमच्याकडून खानेपिण्याचे वस्तू घेवून जा.त्यामुळेच पथकाने सुमारे अडीच हजाराचे लोक वेळेवर मिळालेले जेवण, नास्ता,पाणी गरज भागवून योग्य वाहनाद्वारे रवानगी केली. आपत्ती व्यवस्थापन मुळे त्यांचे राज्यात सुखरूप पोहोचले.कोपरगांवात या सुयोग्य नियोजनामुळे कुठलाही निर्वासित कँम्प लावावा लागला नाही.अहोरात्र हे काम सुरु राहिले.पुणा-चाकण मधून पायी निघालेली पायी माणसांना मोलाचा मदतीचा आणि आस्थेवाईकपणे चौकशीचा प्रामाणिक प्रयत्न परराज्यातील लोक या माणसामुळे कोपरगांवचे नाव घेत असतील. जिल्हाप्रशासनानेही समन्वयक म्हणून केलेल्या कामाची प्रशंसा केली.पुढे चालूच सूर्यतेजच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून गरजूंना किराणा,कोविड केअरला नास्ता, पाणी अशा अनेक गरजा भागविल्या.लाँकडाऊनच्या काळात तर अनेक स्वयंसेवी संस्था गरजुंना जेवण देत होत्या.अशा संस्थांचा समन्वय साधून कोणी उपाशीतर झोपला नाही ना.हा आढावा सुशांत स्वतः घेत . त्यानंतर रात्री कधी १२ तर कधी १ वाजता स्वताचे जेवण करत.कोपरगांव पहिला रुग्ण आढळल्यापासून आज सहामहिने झाले आजही लोकसेवेत बहुमोल वेळ देतोय .आजपर्यंत कोपरगांव तालुक्यात साधारण १४००-१५०० लोकांना कोरोनाची लागन झाली आहे. यातील अनेकांना धीर देण्याचे,योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आजही सुरु आहे.मध्यंतरी त्यांचा अपघात झाला पायाला गंभीर दुखापत झाली होती परंतु दोन तासांच्या उपचारानंतर ओल्या भळभळत्या जखमा बँडेज बांधुन हा माणूस लंगडत लोकसेवेत पुन्हा मैदानात उतरला.याच काळात अनेक दुर्घटना,वन्यजीव, पशू पक्षी संरक्षण कार्य सुरु ठेवले आहे. अखंड सेवाव्रती हाच शब्द सुशांत याला सार्थ ठरतो आहे.जनसामान्य संकटात असतांना कुठलीही मोठी शक्ती पाठीशी नसतांना,कुठलाही मोठा वारसा नसतांना संकटात सर्वांनी एकत्र यावे याविचाराने सर्वसामान्य कुटुंबातील सुशांत हा मोठा आदर्श तरुणांसह सर्वासमोर ठेवला. कोविड काळात एक माणुसकीचे वेगळेच रुप आम्हाला पहावयास मिळाले.एकाकी कडवीझुंज देणार्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्या प्रमाणे......... सुशांत घोडके या दिलदार मित्राला उदंड आयुष्य लाभो हीच जगदंबेचे चरणी प्रार्थना
*बच्चा बच्चा जाणता है,*
*सुशांत घोडके सच्चा है ।*
सुशांतने आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव पडला व त्याला साथ देणारे त्याचे मित्र - मंगेश भिडे, मिलिंद जोशी, आनंद टिळेकर, बंडुनाना चिंचपुरे, अँड.महेश भिडे, रविंद्र भगत, कल्पेश टोरपे, अनंत गोडसे, ओकार कोळपकर, अमोल पवार तसेच सूर्यतेज संस्था आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान,महाराष्ट्र हरित सेना, सदस्य व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Comments
Post a Comment