वर्तमान तरूणपिढीला मादक पदार्थांच्या सेवनापासून वाचविणार तरी कोण ?

  
युवक हे देशाचे आधारस्तंभ तर युवाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. ज्या देशातील युवक व्यसनाधिन असेल, अनेक व्याधीनी त्रस्त असेल तर त्या देशाची प्रगती अशक्य आहे.कोणतेही व्यसन आज शरीराला विघातक व चारित्र्याला बदनामकारक असते. आज व्यसन हेच फॅशन झाले आहे. आजचा तरुणवर्ग आज ड्रग्ज,चरस .ब्राउन शुगर, अफू, गांजा, यासारख्या अंमली पदार्थाच्या सेवनाच्या छायेखाली वावरत आहे. आज बिअर बार मध्ये जावून मद्य सेवन करने प्रतिष्ठेचे बनले आहे. दैनंदिन जीवन जगताना प्राथमिक गरजाकडे दुर्लक्ष करून भौतिक गरजांच्या आहारी गेल्याचे चित्र दुर्दैवाने सगळीकडे पहावयास मिळत आहे. मानसिक संघर्षाला तोंड देण्यासाठी गुन्हेगारी वृत्ती वाढल्याने व गरिबीला वैतागून गुन्हेगारी मार्गाने जाऊन श्रीमंतीचा ध्यास अनेकांनी घेतला आहे. आज मादक पथार्थांच्या सेवनाने तरुण पिढीचे आयुष्य बरबाद होत आहे. मादक पदार्थ सेवनावर कायमची बंदी असली पाहिजे. जो पर्यंत वर्तमान तरुण वर्ग निर्व्यसनी बनत नाही. तोपर्यंत जीवनाला काय अर्थ राहणार आहे? मादक पदार्थाच्या सेवनाच्या आहारी न जाता आपले जीवन निर्व्यसनी बनवण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. शारिरिक नुकसान हे मूख्यत्वेकरून किरकोळ किंवा मोठया अपघातामध्ये किंवा रोगामुळे होऊ शकते.नुकसान हे नैसर्गिक किंवा अन्य कारणापेक्षा जास्त करून आपल्या अज्ञानामुळे , निष्काळजीपणामुळे व आत्मसंयमाअभावी होत असते. सर्वात जास्त नुकसान आपण आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच होते.आरोग्य हीच संपत्ती असे आपणास अगदी लहानपणापासून शिकविले जाते. भारतात गरीबी, लोकसंख्यावाढ , बेकारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदि अनेक सामाजिक प्रश्न आहेत . यातच बहुव्यापी आरोग्य हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे . मोठे अपघात , कर्करोग किंवा ह्दयविकार इत्यादी गोष्टीवर आज वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. यकृत किंवा मुत्रपिंड,हृदय आदि इंद्रिये प्रत्यारोपित करता येतात . अन्न, पाणी व हवा यांचे प्रदुषण कमी करून रोगांना आपण आटोक्यात आणू शकतो. आरोग्याच्या उत्तम सवयी , विश्रांती, समतोल आहार आदि गोष्टींचे समतोलन साधने म्हणजे शारीरिक स्वास्थ्य टिकविणे होय. परंतु आज एड्स सारख्या रोगावर कोणताही औषध उपचार उपलब्ध नसल्यामुळे किंवा नजीकच्या काळात उपलब्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे एड्स ही एक जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे.एड्सग्रस्त होणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाणे होय. आपणच आपल्या शरीराचे रक्षक आहोत. महत्त्वाच्या व्यक्तिसाठी शरीररक्षक,अंगरक्षक असतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी सुरक्षा व्यवस्था असते. परंतु यापेक्षा आपण स्वतःच आपल्या शरीराचे रक्षक आहोत . परंतु त्यासाठी आत्मसंयमन हा महत्वाचा गुण आपल्याकडे असायला हवा .आरोग्य ही माणसाची निरोगी अवस्था होय.आरोग्य म्हणजेच शारिरिक, मानसिक, सामाजिक, आत्मिक दृष्ट्या  सुदृढ असणे होय .एकीकडे वैद्यकशास्त्र झपाटयाने प्रगत होत आहे. माञ लोकांची स्वतःविषयक जबाबदारी कमी झाल्याचे मनाला बोचत आहे. खरोखरच आरोग्यपूर्ण शरीर ही फार महत्त्वाची देणगी आहे. आपण नखापासून ते केसायर्यंत सर्वाची काळजी घेतली पाहिजे.आपल्या दैनंदिन जीवनाकडे योग्य रितीने लक्ष दिले पाहिजे. समतोल आहाराइतकेच नियमित व्यायामाला महत्व दिले पाहिजे.आहाराइतकेच विहाराला महत्त्व आहे. आपल्या शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे.असं म्हणतात"निरोगी शरीरात निरोगी मन वास करते,  आणि लठठ व्हा," म्हणजेच आपण नेहमी आनंदीत राहिले पाहिजे. मनात सत्य सुंदर , मंगलाची स्थापना करून ते निर्मळ, निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. निसर्गाने आपणास शरीर ही मौल्यवान देणगी दिली आहे. अशा प्रकारची देणगी फक्त एकदाच लाभते . म्हणून शरीराची सुरक्षितता महत्वाची ठरते. त्याचबरोबर   कोरोना व्हायरस या विषाणू पासून बचाव करण्यासाठी काही पथ्ये पाळावीत गर्दीची ठिकाणे टाळा, चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा, खोकला किंवा शिंक आल्यास तोंडावर रूमाल धरावा , ताप आणि खोकला असलेल्या रूग्णांचा सहवास टाळा, तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवा, भरपूर पाणी प्या. संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, यासारखी पथ्ये पाळा आणि कोरोना व्हायरस टाळा. तसेच घरात रहा बाहेर पडू नका, कोरोनाला भिऊ नका, पण सावधान रहा . जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुंटुबासाठी खास आहात हे विसरू नका.शेवटी  कोरोना व्हायरसपासून सुरक्षा हीच जीवनाची सुरक्षा . या बरोबरच  निर्व्यसनी जीवन हेच सुखी जीवन आहे, हेही लक्षात ठेवावे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते . मादक पदार्थ सेवन विरोधी दिनाच्य निमिाताने आपण सर्वानी आपल्या आरोग्याची, शरीराची काळजी घेतली पाहिजे . सध्या वर्तमान तरुणांनी सदैव निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करून मादक पदार्थ सेवन करु नका आपले अमूल्य जीवन बर्वाद करू नका तरी |   हयाकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. निर्व्यसनी जीवन हाच वर्तमान जीवनाचा महामंत्र् आहे हेही लक्षात ठेवावे मादक पदार्थ सेवनास कधीही विरोध करायलाच हवा. वर्तमान स्थिती फार भयानक रुप धारण करीत आहे. यासाठी आपण सर्वांनी सदैव निर्व्यसनी राहण्याचा निश्चय करायाला हवाच. तरच वर्तमान स्थिती सुधारेल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हे लक्षात ठेवायला हवे.एवढे लेखन  करून मी माझ्या लेखनीस पूर्णविराम देत आहे. उत्तम आरोग्य आणि आळस यापैकी एकाचीच निवड करा, आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा युवकांनी वेळीच सावधानता बाळगली पाहिजे . आजचे युवक यशासाठी प्रयत्न करणारे , अडचणीवर मात करणारे, अविरत परिश्रम घेणारे निव्यर्सनी , तळमळीचे , उत्साही बलशाली, नितीमान देशप्रेमी आणि संस्कारक्षम असणे ही काळाची गरज बनली आहे., हेही लक्षात ठेवा .        
  
        शेख सिराज स्तंभलेखक , ता. जि. बीड

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा