कोपरगाव नगरपालिका अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद
कोपरगाव (प्रतिनिधी) : शहर व व तालुक्यातील परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढतच आहे 23 मार्चच्या टाळे बंदीनंतर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होत रात्रंदिवस कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर कार्यरत आहेत आता पालिकेतही कोरोना चा शिरकाव झाल्याने दि १ ते ४ ऑक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पालिका कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
शहरातील कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी कामगार विविध उपाय योजना व त्याची अंमलबजावणी करत आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे स्वच्छतेची व विविध सेवा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे . या दरम्यान मोठ्या प्रमाणात विविध कारणामुळे अनेक व्यक्तींचा संपर्क येतो त्यातूनच नगरपरिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला आहे कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची तपासणी व स्वॅप नमुने घेण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नागरिकांनीही स्वतःची काळजी घ्यावी घराबाहेर कामाव्यतिरिक्त पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment