समताच्या श्रीरामपूर शाखेच्या ठेवी १००कोटीच्या पुढे : संदीप कोयटे
याबाबत अधिक माहिती देतांना श्री संदीप कोयटे म्हणाले कि, २००० साली श्रीरामपूर मध्ये केवळ २-३ नागरी सहकारी पतसंस्था तग धरून होत्या. कर्जदारांनी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्या अडचणीत आलेल्या होत्या. त्यामुळे श्रीरामपूर मध्ये सहकारी पतसंस्था काढण्याची कोणी हिंमत करीत नव्हते. त्या काळात समताचे संस्थापक श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी श्रीरामपूर येथे शाखा काढण्याचे जाहीर केले. या शाखेला श्रीरामपूरकरांनी साथ दिली व पहिल्याच वर्षात १ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. त्यानंतर पुढील ५ वर्षात म्हणजे २००५ साली या ठेवी ५ कोटी रुपया पर्यंन्त गेल्या. त्यापुढील ५ वर्षात म्हणजे २०१० साला पर्यंत या ठेवी २० कोटींच्या ठेवी पूर्ण झाल्या. त्या पुढील ५ वर्षात म्हणजे २०१५ साली या ठेवी ३५ कोटी रुपया पर्यंन्त गेल्या व काल ३० सप्टेंबर २०२० पर्यंत हा ठेवींचा आकडा १०० कोटी रुपयां पर्यंन्त गेला आहे.
समता पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्र प्रणाली वापरून पेपरलेस, व्हौचरलेस तसेच कॅशलेस बँकिंग कामकाज करण्याचा प्रयत्न केला आहे. समताचे ऑडीट कंट्रोल रूम तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
समताने गत ६ महीन्यांपासून सोने तारण कर्ज वाटपावर भर दिला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने सोने तारण कर्ज मिळाले पाहिजे या उद्देशाने समताने सोनेतारण कर्ज वाटपाच्या विवीध योजना जाहीर केलेल्या आहे. सोने तारणकर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदारांनी खाजगी वित्तीय संस्थांकडून फसव्या व्याजदराने सोने तारण कर्ज घेण्याऐवजी सहकारी पतसंस्थेकडून सोनेतारण कर्जाचा व्यवहार करावा. तसेच किरकोळ दुकानदारांसाठी ठोक व्यापाऱ्यांकडून रोखीने व कमी व्याजदरात कर्ज घेण्यासाठी शुअर सेल शुअर पेमेंट हि योजना देखील कार्यान्वित केली असल्याने त्यांचा देखील फायदा किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना संदीप कोयटे म्हणाले कि, श्रीरामपूर विषयी समताला नेहमीच प्रेमाची व मैत्रीची भावना होती. श्रीरामपूर हे आज ना उद्या जिल्ह्याचे ठिकाण होणार श्रीरामपूरला एम.आय.डी.सी. आहे, श्रीरामपूरला आर.टी.ओ. ऑफिस आहे, श्रीरामपूरला भव्य रस्ते आहे, श्रीरामपूरची बाजारपेठ साखरेमुळे भारतात नावाजलेली आहे. त्यामुळे श्रीरामपूरला उज्ज्वल भवितव्य आहे. श्रीरामपूरला राष्ट्रीयकृत बँका आहेत मात्र पतपेढ्यांना स्थान का नसावे या भावनेतून श्रीरामपूरातील सर्वच पतसंस्था कामकाज करीत आहे. सहकारी पतसंस्थांमध्ये गुंतविलेला पैसा स्थानिक व्यापार वृद्धीसाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मितीसाठी वापरला जातो तर राष्ट्रीयकृत बँकांमधील पैसा हा महानगरी मधल्या भांडवलदा रांसाठी वापरला जातो. हा फरक लक्षात घेऊन स्थानिक पतसंस्थांमध्येच आपले व्यवहार करण्याचे आवाहन या निमित्ताने संदीप कोयटे यांनी केले.
१०० कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण झाल्याने समताची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. अशा प्रसंगी समतावर विश्वास ठेऊन जो समताचा सन्मान केला आहे, त्या सन्मानास या पुढेही पात्र राहून श्रीरामपुराचे सेवेत अधिकाधिक जोमाने कार्यरत राहण्याची खात्री या निमित्ताने समता परिवाराच्या वतीने दिली.
Comments
Post a Comment