आणखी एका मंत्र्याला कोरोना
मुंबई : कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी कोणाच्या संपर्कात नव्हतो. मात्र, त्याआधी जे आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
गेले १० दिवस मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. मी स्वत: कोविड टेस्ट करुन घेतली आहे. रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले १० दिवस कोणाच्या संपर्कात नसल्याने संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तहीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईल, असे सामंत यांनी म्हटले आहे.
त्याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या कोरोनामुक्त झाल्या आहेत. दरम्यान, याधी आघाडी सरकारमधील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अशोक चव्हा, नितीन राऊत आदींना कोरोनाची लागण झाली होती. ते पूर्णपणे बरे झालेले आहेत.
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत बीएमसीनं झोपडपट्ट्यांवर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. झोपडपट्ट्यांमधील कंटेंनमेंट झोनमध्ये वाढ होऊ लागल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका कामाला लागली आहे.
Comments
Post a Comment