कोरोना महामारीमुळे यंदा उक्कडगाव रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव नाही
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव होणार नाही, त्यामुळे भाविकांनी मंदिर कार्यस्थळावर घटी बसण्यासाठी येऊ नये, तसेच प्रसाद साहित्य, खेळ साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते इत्यादी वस्तू विक्रेत्यांनी मंदिर यात्रा उत्सवासाठी येऊ नये, सर्व भाविकांनी घरच्या घरी नवरात्र उत्सव काळात आपल्या घरीच शासन नियम पाळून नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन रेणुकादेवी देवस्थान व उक्कडगाव ग्रामस्थांनी केले आहे. पोलीस प्रशासन, व तहसीलदार यांनी या काळात संपूर्णपणे बंदोबस्त ठेवून रेणुका देवी मंदिराच्या चारही बाजूंनी प्रवेशद्वारे बंद करावीत.
संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यातही त्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री हसन मुश्रीफ आदींनी नवरात्र उत्सवाचे नियम घालून दिले असून भाविकांच् आरोग्य चांगले राहावे यासाठी नवरात्र उत्सव काळात निर्बंध घातले आहेत, तेव्हा सालाबाद प्रमाणे यावर्षी भाविकांनी तसेच यात्रा काळात विविध खेळण्या खाद्यपदार्थ विक्रेते, प्रसाद साहित्य विक्री, व्यावसायिकांनी उक्कडगाव मंदिर कार्यस्थळावर विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा विनापरवाना जमाव करणार्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
Comments
Post a Comment