माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम म्हणजे कोरोना ग्रस्तांच्या डोळ्यात धूळफेक करणारा


कोपरगाव (प्रतिनिधी) : एकीकडे आशा सेविकांची परवड आणि दुसरीकडे कोरोना महामारीचा हाहाकार सुरू असताना शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम म्हणजे चक्क कोरोना ग्रस्तांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, या आशा सेविकांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत त्यांच्याकडे ना धड वैद्यकीय उपकरणे आहेत, टीका सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानायचे माजी उपाध्यक्ष, संचालक संजय दौलतराव होन यांनी केली.

शासनाने अगोदर आशा सेविकांना योग्य सुविधा, पुरेशी उपकरणे उपलब्ध करून द्यावी मगच त्यांच्या खांद्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी अभिया नाची जबाबदारी टाकावीअसे ते म्हणाले.  श्री. संजय दौलतराव होन पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांनी कोरोना महामारीत शासनाची वाट न पाहता, तो रोखण्यासाठी ज्या ज्या उपाय योजना शक्य होते त्या त्या  उपाय योजना केल्या.   प्रत्येक आपत्तीत संजीवनी उद्योग समूहच अगोदर धावून आला आहे. आता सध्या कोरोना कहर वाढत असताना त्यावर पुरेशा वैद्यकीय सुविधा तालुका पातळीवर तसेच ग्रामीण भागात शासनाला उभ्या करता आल्या नाहीत त्यामुळे 31 रुग्ण दगiवले आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी राबवला आशा सेविकांची अगोदरच परवड असताना त्यांच्या माथी हे काम मारून त्यांची पायपीट वाढवली आहे. त्यांच्याकडे व्यवस्थित ना डिजिटल थर्मामीटर, ना ओक्सी मीटर व्यवस्थित. त्यामुळे रुग्ण संख्या नेमकी ओळखन्या  ऐवजी त्यात त्रुटी राहून त्याचा चांगल्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे, असेही ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा