वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई दया : स्नेहलता कोल्हे


कोपरगाव (प्रतिनिधी) :  मतदार संघात वादळी पावसाचा मोठा तडाखा बसल्यामुळे प्रशासनाने 14 गावांसाठी पंचनाम्याचे आदेश दिले खरे परंतु वादळी पावसामुळे संपूर्ण मतदारंसघातील पिके नष्ट झाली असुन 14 गावांसाठी पारित केलेल्या पंचनाम्या आदेषा व्यतिरिक्त  इतर गावातील पिकांचेही देखील मोठया प्रमाणात नुकसान  झालेले आहे तरी याही नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,  स्नहेलता कोल्हे यांनी  मुख्यमंत्री, महसुलमंञी, कृपीमंत्री, पालकमंत्री यांचकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके, मका, कपाशी, बाजरी, सोयाबीन, कांदारोपे, या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेले पीके शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने सडून गेल्याने शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला आहे.

 यापुर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येवून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते, या संकटातून सावरतांनाच पुन्हा शेतक-यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. यासाठी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने  14 गावांसाठी पंचनाम्यांचे आदेश पारित केले त्यात अनेक गावांचा उल्लेख न झाल्याने अंजनापुर, बहादरपुर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, वेस, सोयेगांव, रांजणगांव देशमुख, काकडी मल्हारवाडी , डांगेवाडी, मनेगांव या भागातील शेतक-यांनी संपर्क कार्यालयात समक्ष येवुन नुकसान भरपाई मिळावी म्हणून लेखी मागणी केलेली आहे. काही दिवसातच या पिकांची काढणी होवुन शेतक-यांच्या दारात धान्याची रास पडली असती मात्र झालेल्या वादळी पावसाने शेतक-यांचे स्वप्नच उध्वस्त करुन टाकले आहे. शासन स्तरावरुन त्वरीत मतदारसंघातील सर्वच नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळवुन देण्यासाठी संबधित कार्यान्वीत यंत्रणेस आपले त्वरीत आदेश व्हावेत अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"