विलास कोते यांचेमार्फत दिड हजार एन ९५ चे वाटप
महंत रमेशगिरी महाराज व अंबादास अंत्रे यांचे हस्ते वाटप
कोपरगाव : कोविड सोबत मुकाबला करण्यासाठी मास्क व हातांची वारंवार स्वच्छता या दोन बाबी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात. या काळात सकारात्मक दृष्टीकोन न टिकवुन ठेवण्यासाठी नामस्मरण व ध्यानधारना करावी, असे प्रतिपादन राष्ट्ररसंत जनार्दन स्वामी आ़श्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांनी केले.
आश्रमाचे विश्वस्त त व शिर्डीतील उद्योजक विलास (आबा) कोते यांच्यावतीने आश्रमातील संत मंडळी व भाविकांसाठी दिड हजार एन ९५ मास्क भेट देण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सचिव अंबादास अंत्रे उपस्थित होते.
महंत रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की शिर्डी येथिल कोते परीवार हा राष्ट्ररसंत जनार्दन स्वामी महाराचांचा शिष्य परीवार म्हणुन ओळखला जातो. तेथे चावडी कट्टा या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातुन विश्वस्त विलास (आबा) कोते व त्यांच्या सहकारी गरजुंना सातत्याने मदत करतात. असे उपक्रम प्रत्येक गावात सुरू करणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना अंबादास अंत्रे म्हणाले, आश्रमातील कर्मचारी व भक्त परीवाराने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कोविडचा संसर्ग रोखण्याची आज तरी आपल्याकडे तेचढाच पर्याय आहे.
Comments
Post a Comment