कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना
अबू धाबी : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात कोलकातानं एकहाती सांमना जिंकला. युवा फलंदाज शुभमन गिलनं 70 धावांची आक्रमक खेळी केली. गिलनं 62 चेंडूत 70 धावा केल्या. गिल आणि मॉर्गन यांनी 90 धावांची भागीदारी केली. हैदराबादनं दिलेल्या 143 धावांचे आव्हान कोलकातानं 12 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यासह हैदराबादनं सलग दुसरा सामना गमावला आहे. तरकोलकाता नाइट रायडर्सचा हा पहिला विजय आहे.
हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील नारायण केवळ शुन्यावर बाद झाला. तर नितीश राणानं 26 धावांची खेळी केली. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाला. त्यानंतर गिल आणि मॉर्गननं विजयी भागीदारी केली. मॉर्गनने 29 चेंडूत 42 धावा केल्या. हैदराबादकडून खलील अहमद, टी नजराजन आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
दरम्यान, हैदराबादनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादकडून मनीष पांडे वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. हैदराबादकडून मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. 38 चेंडूत पांडेने 51 धावा केल्या. कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेलनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नाही. वॉर्नर-बेअरस्टो यांनी 24 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बेअरस्टो 5 धावांवर बाद झाला. तर वॉर्नर 36 धावांवर बाद झाला. ऋद्धिमान साहा 30 धावा करत धावबाद झाला. हैदराबादकडून पांडेने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 चेंडूत 51 धावा केल्या.
Comments
Post a Comment