बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली. बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपत लोकशाहीचा अधिकार वापरण्याची संधी देण्यात आली आहे. नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल, असंही सुनील अरोरा म्हणाले.

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मतदानाचा हक्क बजवावा. हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू लागू होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार आहे. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल. सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे.


आदर्श आचारसंहिता लागू...

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं की, बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

मुख्य निवडणूक आयोगाच्या परिषदेतील प्रमुख मुद्दे....

  • बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार
  • पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी होणार मतदान यामध्ये नक्षलग्रस्त मतदान केंद्राचा ही होणार समावेश.
  • दुसऱ्या टप्प्यात 94 मतदान केंद्रावर होणार मतदान उर्वरित मतदान केंद्रावर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार
  • तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर होणार मतदान.


Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा