शहर व विविध प्रभागांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट
कोपरगाव (प्रतिनिधी) : शहर व विविध प्रभागांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून निवारा परिसरात चार ते पाच जणांना जखमी केल्याची घटना नुकतीच घडली असून या गंभीर प्रश्नाबाबत पालिकेने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी प्रभाग क्रमांक दोनचे ज्येष्ठ नगरसेवक जनार्दन कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यात पुढे कदम यांनी म्हटले की नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आरोग्य विभाग प्रमुख यांना मागील गेल्या तीन महिन्यापासून प्रभाग 2 मध्ये मोकाट जनावरे. गाढवे व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याबाबत आरोग्य विभाग प्रमुख यांना वारंवार फोनवर व्हाट्सअप दारे फोटो टाकून याबाबतची कल्पना दिलेली होती त्याबाबत कुठलीही ठोस कार्यवाही पालिका प्रशासनाकडून झालेली नाही. मागील तीन दिवसांमध्ये याच मोकाट जनावरांना कडून आता नागरिकांवर प्राणघातक हल्ले सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी दोन नागरिक या मोकाट जनावरांच्या हल्ल्यातून जखमी झालेले आहे तसेच मागील आठवड्यात एका लहान मुलाला मोकाट कुत्रे कडून ओरबडण्याचा प्रयत्न झाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले, पालिका प्रशासनाकडून हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ह