मोहरमनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने 'यांच्या' हस्ते भाविकांना फळांचे वाटप


नगर : सालाबाद प्रमाणे यावर्षी नगर शहरामध्ये मोहरम पार पडली. कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे प्रशासनाच्या आदेशावरून अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या मोहरमनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.

नवीन टिळक रोडवरील इमाम बाड्यातील मस्जिदीसमोर प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून हे वाटप करण्यात आले. यावेळी दर्गाहचे प्रमुख विश्वस्त बब्बु भाई, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अज्जूभाई शेख, युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, रिजवान शेख, अन्वर सय्यद, डॉ. साहिल सादिक, शरीफ सय्यद, अभिजित वर्तले,  तौसीफ बागवान आदी उपस्थित होते.

मौला अलींची प्रसिध्द असलेली सवारी (पंजे) सर्वधर्मीय बांधवांचे श्रद्धास्थान आहे. मोहरमनिमित्ताने येणारे भाविक येथे नवस मागतात. आलेल्या भाविकांची मनोकामना नक्कीच येथे पूर्ण होते असा नावलौकिक आहे. ही परंपरा गेली ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून चालत आलेली आहे. दर्गाहचे प्रमुख विश्वस्त बब्बु भाई यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना यावेळी या परंपरेबाबत संपूर्ण माहिती दिली. 

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले, अहमदनगरचा मोहरम हा देशात प्रसिद्द आहेत. तसेच हिंदू- मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्वधर्मीय बांधव दर्शनाला येत असतात. तसेच यावर्षी कोरोनामुळे या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जात आहे. त्याच बरोबर मास्क- सॅनिटायझरचा वापर करून सर्व नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करीत मोहरम पार पडत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा