सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेता सुबोध भावे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सुबोध भावे यांच्यासह पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हाला कोरोनाची लागण झाली आहे. उपचार घेत असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी घ्या अशी विनंती देखील केली आहे.
मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले...
सुबोध भावेंनी काही दिवसांपूर्वी पुण्यात आपल्या कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव अतिशय साधेपद्धतीने साजरा करण्याच आवाहन केलं. तसेच बाप्पाचं विसर्जन हे घरच्या घरी करून गर्दी टाळण्यास सांगितलं होतं.
घरच्या घरी बाप्पाचं विसर्जन करा, असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाचं पालन करत अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘गणपती विसर्जन.. त्याच उत्साहात, तो जाताना तीच हुरहूर, विसर्जनाची जागा बदलली म्हणून भावना नाही बदलली’, असं म्हणत त्याने चाहत्यांनाही विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्याचं आणि शक्यतो घरीच विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं.
Comments
Post a Comment