रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
३५ हजारहून अधिक जागांसाठी भरती
ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करु शकतात.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. RRB NTPCने 35,208 जागांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात 24605 व्हॅकेन्सी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. तर 10603 जागा अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. या भरतीसाठी काही निवडक उमेदवारांना सातव्या वेतन आयोगअंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती घेऊ शकतात.
रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नल पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची आरोग्य तपासणीही होणार आहे. Traffic Assistant या पदासाठी वेग-वेगळ्या शिफ्टमध्ये कामं करावं लागणार आहे.
ट्रॅफिक असिस्टेंट (ग्रॅज्युएट पोस्ट) पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 7th CPC pay Matrix लेवल-04 नुसार, 35400 रुपये आणि ग्रेड पे देण्यात येणार आहे. बेसिक वेतनाव्यतिरिक्त निवड झालेल्यांना इतर DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउंस, पेन्शन स्कीम, मेडिकल बेनिफिट्स आणि अन्य स्पेशल सुविधाही देण्यात येणार आहेत.
या पदासाठी कमीत-कमी 18 आणि अधिकाधिक 33 वयवर्ष असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अधिकाधिक वयोमर्यादेत 3 वर्षे आणि एससी, एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment