गेल्या २४ तासांत देशात ७६,४७२ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७६ हजार ४७२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३४ लाख ६३ हजार ९७३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६२ हजार ५५० रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ५२ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू असून २६ लाख ४८ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात आतापर्यंत ४,०४,०६,६०९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गुरूवारी देशात ९ लाख २८ हजार ७६१ चाचण्या करण्याात आल्या आहेत.
Comments
Post a Comment