देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्टचं कोरोना संसर्गामुळे निधन

मुंबई : देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं निधन झालं. त्या १०३ वर्षांच्या होत्या. नॅशनल हार्ट इन्स्टीट्यूट अर्थात 'एनएचआय' यांच्यातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली. मागील ११ दिवसांपासून त्यांच्यावर एनएचआय येथे उपचार सुरु होते. 

एका अधिकृत पत्रकाद्वारे एनएचआयकडून डॉ. पद्मावती यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. 'देशाच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. एस पद्मावती यांचं कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं २९ ऑगस्ट रोजी निधन झालं', असं या पत्रकात म्हटलं गेलं होतं. 

अधिकृत माहितीनुसार कोरोना संसर्गामुळं त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शरीरात ताप असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाचा संसर्गही झाला. यातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालं.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"