कोरोना योगदान : पोलीस दलाच्यावतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान

 

कोरोना योगदान : पोलीस दलाच्यावतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान

अहमदनगर : कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आधार देऊन पोलीस दलासमवेत केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा अहमदनगर पोलीस दलाच्यावतीने सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते भैय्या बॉक्सर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रविण लोखंडे उपस्थित होते.

देशासह महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी व हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या टाळेबंदीत हातावर पोट असणारे, शहरात अडकलेले परप्रांतीय, आर्थिक दुर्बलघटक व सर्वसामान्य नागरिकांचे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत या घटकांना आधार देण्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्यावतीने त्यांना अन्न-धान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पशु-पक्ष्यांची देखील खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती. तसेच कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांसाठी दररोज चहा व नाष्टयाची सोय देखील करण्यात आली होती. फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम तीन ते चार महिन्यापासून टाळेबंदी काळात अहोरात्र सुरु होता. या कार्याची दखल घेत पोलीस दलाच्या वतीने हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा