Posts

Showing posts from August, 2020

बाप्पांना निरोप : प्रभागनिहाय विसर्जनाची व्यवस्था

Image
अहमदनगर : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची भाविकांच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे यावर्षी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय कृत्रिम तलाव निर्माण केलेत. भारत बेकरी चौक (बोल्हेगाव), मयूर कॉर्नर चौक (वडगाव गुप्ता),  नाना चौक (तपोवन रोड),  साईबाबा मंदिर (निर्मलनगर),  यशोदानगर विहीर व मोकळी जागा (पाईपलाईन रोड),  महालक्ष्मी उद्यान (बालिकाश्रम रोड), गंगा उद्यान (मिस्कीन मळा), बाळाजी बुवा विहीर (कल्याण रोड), नेप्तीनाका (कल्याण रोड), पुलाशेजारची खुली जागा (सारसनगर), साईनगर उद्यान (बुरुडगाव), लोखंडी पुलाशेजारी (स्टेशन रोड), क्रांती चौक (केडगाव लिंक रोड), बुद्धविहार शेजारी (केडगाव), केडगाव देवी मंदिर (केडगाव), फिरोदिया हायस्कूल पटांगण (वाडियापार्क समोर), सावेडी जॉगिंग ट्रॅक (प्रोफेसर चौक), हनुमान मंदिर (गोविंदपुरा), न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील खुली जागा, बारा इमाम कोठला परिसर या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आरोग्यज्ञान

Image
  मुळा   मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच , तसेच सांबार , आमटी , डाळ , कोशिंबीर , लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात .   जसे स्वयंपाकात मुळा वापरला जातो तसेच ह्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत . मुळा हा जमिनीखाली उगवतो . कोवळा मुळा हा गोड , कडू , तुरट व उष्ण असून कफवातनाशक व पित्तकर असतो तर जुन मुळा हा उष्ण व जड व त्रिदोषकर असतो . घरगुती उपचार : १ ) अजीर्ण झाले असता मुळ्याचे काप करून त्याला मीठ लावावे व मळून काही वेळ ठेवावे व नंतर त्याचा रस काढुन टाकावा हे काप खावे . २ ) मुळव्याध झाली असता मुळा कापून तुपात तळुन साखरे सोबत खावा . ३ ) चरबीची गाठ शरीरावर झाली असल्यास मुळ्याचा रस त्या गाठींवर चोळावा . ४ ) लहान मुलांना कृमिंचा त्रास होत असल्यास ४ चमचे मुळ्याचा रस + २ चमचे मध पाजावे व २ तासांनी २ चमचे एरंडेल तेल पाजावे . ५ ) भुक न लागणे , सर्दी , खोकला ह्यात मुळा व मुग एकत्र उकळून सूप करावे व त्यात

सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण

Image
मुंबई : अभिनेता सुबोध भावे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.  सुबोध भावे यांच्यासह पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हाला कोरोनाची लागण झाली आहे. उपचार घेत असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी घ्या अशी विनंती देखील केली आहे.  मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले... सुबोध भावेंनी काही दिवसांपूर्वी पुण्यात आपल्या कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव अतिशय साधेपद्धतीने साजरा करण्याच आवाहन केलं. तसेच बाप्पाचं विसर्जन हे घरच्या घरी करून गर्दी टाळण्यास सांगितलं होतं. घरच्या घरी बाप्पाचं विसर्जन करा, असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाचं पालन करत अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘गणपती विसर्जन.. त्याच उत्साहात, तो जाताना तीच हुरहूर, विसर

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपण विस्कटली

Image
पहिल्या तिमाहीत विकासदर उणे २३.९ टक्के नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपण विस्कटल्याचे स्पष्ट झाले. केंद्र सरकारने सोमवारी विकासदराची आकडेवारी GDP data जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते जून  या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने प्रमुख आठ घटकांच्या Core sector  वृद्वीची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यात या क्षेत्रांचा विकासदर अनुक्रमे उणे १२.९९ टक्के आणि उणे ९.६ टक्के इतका राहिला होता. गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये या आठ प्रमुख क्षेत्राचा वृद्धीदर २.६ टक्के होता. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे १९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आज आकडेवारी जाहीर झाल्यानंतर विक

वासन टोयोटा शोरुममध्ये 'यांच्या' हस्ते गणपतीची आरती

Image
अहमदनगर(प्रतिनिधी)- केडगाव जवळील वासन टोयोटा शोरूमला पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी भेट देऊन गणपतीची आरती केली. शोरुमच्यावतीने जनक आहुजा यांनी मिटके यांचे स्वागत केले. यावेळी हरजितसिंह वधवा, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, अनिश आहुजा, जतीन आहुजा, दिपक जोशी, अविनाश आदोलकर आदी उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन

Image
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांचं निधन झालं आहे. प्रणव मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.  प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आज तब्बल ७०० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Image
जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ८७६ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०९ टक्के आज नव्या २०७ बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०९१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, संगमनेर ०४, राहाता ०२, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ०३, जामखेड १२, कर्जत ०३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ७०० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २९७, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी २४, नगर ग्रा.५०, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा १४, श्रीगोंदा ३२, पारनेर १६, अकोले ३२, राहुरी ११, शेवगाव ०५,  कोपरगाव ४९, जामखेड

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास

Image
मुंबई : ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम सामन्यात भारतासह रशियाचीही संयुक्तपणे निवड झाली आहे. वास्तविक, इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहेत. रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहास रचला आहे. ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे. रशियासह भारताला संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहे. वास्तविक, रशियाविरुद्ध खेळला जाणारा अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमुळे पूर्ण होऊ शकला नाही. ज्यामुळे भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE ने प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यावेळी, भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रगगनानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करताना म्हटलं की, बुद्धिबळ ऑलिम्पियाड

देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्टचं कोरोना संसर्गामुळे निधन

Image
मुंबई : देशातील पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं निधन झालं. त्या १०३ वर्षांच्या होत्या. नॅशनल हार्ट इन्स्टीट्यूट अर्थात 'एनएचआय' यांच्यातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली. मागील ११ दिवसांपासून त्यांच्यावर एनएचआय येथे उपचार सुरु होते.  एका अधिकृत पत्रकाद्वारे एनएचआयकडून डॉ. पद्मावती यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. 'देशाच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. एस पद्मावती यांचं कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं २९ ऑगस्ट रोजी निधन झालं', असं या पत्रकात म्हटलं गेलं होतं.  अधिकृत माहितीनुसार कोरोना संसर्गामुळं त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शरीरात ताप असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाचा संसर्गही झाला. यातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालं.

मोहरमनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने 'यांच्या' हस्ते भाविकांना फळांचे वाटप

Image
नगर : सालाबाद प्रमाणे यावर्षी नगर शहरामध्ये मोहरम पार पडली. कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे प्रशासनाच्या आदेशावरून अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या मोहरमनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. नवीन टिळक रोडवरील इमाम बाड्यातील मस्जिदीसमोर प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून हे वाटप करण्यात आले. यावेळी दर्गाहचे प्रमुख विश्वस्त बब्बु भाई, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अज्जूभाई शेख, युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, रिजवान शेख, अन्वर सय्यद, डॉ. साहिल सादिक, शरीफ सय्यद, अभिजित वर्तले,  तौसीफ बागवान आदी उपस्थित होते. मौला अलींची प्रसिध्द असलेली सवारी (पंजे) सर्वधर्मीय बांधवांचे श्रद्धास्थान आहे. मोहरमनिमित्ताने येणारे भाविक येथे नवस मागतात. आलेल्या भाविकांची मनोकामना नक्कीच येथे पूर्ण होते असा नावलौकिक आहे. ही परंपरा गेली ७० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून चालत आलेली आहे. दर्गाहचे प्रमुख विश्वस्त बब्बु भाई यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना यावेळी या परंपरेबाबत संपूर्ण

चिमुरडी वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

Image
लातूर : लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येतेय. अवघ्या १३ दिवसांची चिमुकली सतत रडत असल्याने सख्ख्या मामाने पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  चाकूर तालुक्यातील झरी बुद्रूक ही घटना असून एक महिला बाळंतपणासाठी माहेरी आली होती. १३ दिवसांपूर्वी तिने एका चिमुकलीला जन्म दिला. घरात सर्वच जण आनंदी होते. मात्र चिमुकली रडत असल्याचा त्रास तिचा १९ वर्षीय मामा कृष्णा अंकुश शिंदे याला होत होता.  अवघ्या काही दिवसांची आपली भाची रडत असल्यामुळे मामा कृष्णा शिंदेची झोप खराब होत होती. त्यामुळे चिडून आरोपीने १३ दिवसांच्या चिमुकलीची गुपचूप ड्रम मध्ये बुडवून निर्दयीपणे हत्या केली आहे.  त्यानंतर चिमुकलीच्या आईसह सर्वच जण मुलीचा शोध घेऊ लागले. त्यावेळी घरातील ड्रममध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळुन आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर कुटुंबीयांनी चाकूर पोलीस ठाण्यात याची रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली.  त्यात १३ दिवसीय चिमुकली सतत रडत असल्यामुळे तिचा सख्खा मामा कृष्णा अंकुश शिंदे यांची झोप खराब होत अस

आज ४१९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Image
आतापर्यंत १७ हजार १७६ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६० टक्के आज नव्या ४६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर : जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५८४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३१, अँटीजेन चाचणीत १३९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, संगमनेर २४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०७, अकोले ०३, राहुरी ०२, शेवगाव १९ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १३९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०३, राहाता १५, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण १९,  श्रीरामपुर १८, नेवासा ३६,  श्रीग

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने रचला इतिहास

मुंबई : ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम सामन्यात भारतासह रशियाचीही संयुक्तपणे निवड झाली आहे. वास्तविक, इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहेत. रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहास रचला आहे. ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे. रशियासह भारताला संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहे. वास्तविक, रशियाविरुद्ध खेळला जाणारा अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमुळे पूर्ण होऊ शकला नाही. ज्यामुळे भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE ने प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यावेळी, भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रगगनानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी अभिनंदन करताना म्हटलं की, बुद्धिबळ ऑलिम्पियाड

झेप फाउंडेशनने टाळेबंदी व त्यानंतरच्या काळात केली 125000 जेवणांची व्यवस्था

Image
फिरोदिया प्रशालेच्या  1992 च्या विद्यार्थ्यांनी केली होती सामाजिक उपक्रमाची सुरुवात अहमदनगर : मार्च मध्ये करोना व्हायरसच्या साथीला रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाली आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलं. हे काम करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेच्या 1992च्या दहावीच्या वर्गातील मित्रमैत्रिणींनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून अशा परिस्थितीत मदत करण्याची कल्पना मांडली. याच वर्गात असणाऱ्या झेप फाउंडेशन या संस्थेचे रेश्मा सांबरे व प्रसाद झावरे आणि झावरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर झावरे यांनी या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले. सुरुवातीला काही मित्र मैत्रिणींनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावला आणि पाहता पाहता एक मोठे सामाजिक कार्य उभे राहिले. झेप फाउंडेशनने हाती घेतलेल्या या प्रकल्पात गेल्या चार महिन्यात तांदूळ, कणिक (आटा), गहू, डाळ, तेल, मसाला, भाजीपाला तसेच सुरक्षेसाठी मास्क इत्यादींचे वितरण समाजातील गरजू, उपेक्षित आणि पीडीत व्यक्तींना केले. स्थलांतरित कामगार, बेरोजगार, गरीब वसाहतीतील र

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

Image
३५ हजारहून अधिक जागांसाठी भरती  ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करु शकतात. नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. RRB NTPCने 35,208 जागांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात 24605 व्हॅकेन्सी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. तर 10603 जागा अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. या भरतीसाठी काही निवडक उमेदवारांना सातव्या वेतन आयोगअंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती घेऊ शकतात.  रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नल पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची आरोग्य तपासणीही होणार आहे. Traffic Assistant या पदासाठी वेग-वेगळ्या शिफ्टमध्ये कामं करावं लागणार आहे.  ट्रॅफिक असिस्टेंट (ग्रॅज्युएट पोस्ट) पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 7th CPC pay Matrix लेवल-04 नुसार, 35400 रुपये आणि ग्रेड पे देण्यात येणार आहे. बेसिक वेतनाव्यतिरिक्त निवड झालेल्यांना इतर DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउंस, पेन्शन स्कीम, मेडिकल बेनिफिट्स आणि अन्य स्पेशल सुविधाही देण्यात येणार आहेत.  या पदासाठी कमीत-कमी 18 आणि अधिकाधिक 33

1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल

Image
नवी दिल्ली : कोरोना काळात अनलॉक-4 अंतर्गत 1 सप्टेंबरपासून काही मोठे बदल होणार आहेत. ईएमआय, गॅस सिलेंडर, आधार कार्ड, जीएसटी यात काही बदल होणार असू याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो.  लोन मोराटोरियम   बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना आता, आपल्या कर्जाचे हप्ते नियमित भरावे लागणार असल्याची शक्यता आहे. कोरोना काळात देण्यात आलेली  EMI Moratorium सुविधा पुढे न वाढवण्याचा निर्णय आरबीआयकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळात कर्जाच्या हप्त्यांवर सहा महिन्यांची सूट देण्यात आली होती. हा कालावधी 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे.  Fastag 24 तासात कोणत्याही ठिकाणाहून परत आल्यास टोल टॅक्समध्ये केवळ Fastag असणाऱ्या गाड्यांनाच सूट मिळणार आहे.  आधारकार्ड यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, आता आधारकार्डमध्ये एक किंवा त्याहून अधिक अपडेट करण्यासाठीचे शुल्क 100 रुपये असणार आहे, ज्यात बायोमॅट्रिक्स अपडेटचाही समावेश आहे. आतापर्यंत आधारकार्डमध्ये डेमोग्राफिक डिटेल अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क होतं.  विमान प्रवास  नागरी उड्डाण मंत्रालयाने, 1 सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सुरक्षा श

येत्या चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा आम्ही मंदिरे उघडू : वसंत लोढा

Image
अहमदनगर : राज्यातील उद्धव सरकार झोपलेले आहे. निर्णय घेण्यास असमर्थ आहे. राज्यात आता सर्वकाही चालू झाले आहे. तर मग हिंदू धर्माचे शक्ती स्थान असलेले मंदिरे अजून का बंद ? या नाकर्त्या सरकारला जाग येण्यासाठी भाजप आता आंदोलन करत आहे. जर येत्या चार दिवसात राज्यातील व शहरातील सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्या, अन्यथा आम्ही मंदिरे उघडू. याचा जो परिणाम होईल त्यास सरकार जवाबदार राहील, असा इशारा भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शहर भाजपाच्यावतीने आज सकाळी ‘दार उघड उद्धवा... दार उघड...’ हे अभिनव घंटानाद आंदोलन शहरातील विविध मंदिरांच्या बाहेर केले. भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरा बाहेर घंटानाद आंदोलन करत राज्य सरकारला इशारा दिला. सोशल डीस्टंसिंग ठेऊन झालेल्या या आंदोलनात भाजपचे जेष्ठ नेते एल.जी. गायकवाड, मुकुंद वाळके, विलास नंदी, उमेश साठे, सागर शिंदे, उमाप आदि सह्भागी झाले होते.       या आधीही दीनदयाळ परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार पत्र पाठवून राज्यातील मंदिरे उघण्याची रीतसर विनंती आम्ही केली

सलमान खान आला खिद्रापूरकरांच्या मदतीला धावून

Image
कोल्हापूर : गेल्या वर्षी आलेल्या महापुराचा कोल्हापूरकरांना मोठा फटका बसला होता. हेमाडपंती कोपेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या खिद्रापूरकरांचं देखील प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे त्यांच्या मदतीला अभिनेता सलमान खान धावून आला आहे. गतवर्षी महापुरात पडझड झालेल्या ७० घरांचे बांधकाम तो करून देणार असून त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. महापुरामध्ये वाहून गेलेले घर परत मिळणार म्हणून येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.  'ऐलान' फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा शब्द दिला आणि या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच झाला. महापुरात नुकसान झालेल्या घरांसाठी राज्यसरकारने प्रत्येकी ९५ हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. बांधकामासाठी उर्वरित खर्चाची जबाबदारी सलमान खानने घेतली आहे. याबद्दल गावचे सरपंच हैदरखान मोकाशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, 'आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात असलेल्य

'हा' रस्ता दुरुस्तीबद्दल माजी नगरसेवक सुनील काळे यांचे आभार

Image
अहमदनगर : बुरुडगाव रोड, श्रीरामनगर रोड या भागातील खराब झालेला रस्ता माजी नगरसेवक सुनील काळे यांनी तक्रार केल्याबरोबर मुरुम आणून ताबडतोब दुरुस्त करून दिल्याबद्दल या भागात राहणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक बाबर व इतर रहिवाश्यांनी सुनील काळे यांचे आभार मानले आहेत. शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील श्रीरामनगर रोड वसाहतीतील रस्ता खड्डे पडल्यामुळे अत्यंत खराब झाला होता. येथील रहिवाश्यांसाठी हा रस्ता म्हणजे मोठी डोकेदुखी झाली होती. वाहने चालवताना येथील रहिवाश्यांना त्रास होत होता.पावसात या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठून त्यात येथील नागरिकांचा छोटा-मोठा अपघात होत होता. या खराब झालेल्या रस्त्याची तक्रार माजी नगरसेवक सुनील काळे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी ताबडतोब काही वेळेतच रस्त्यावर मुरुम आणून टाकला आणि रस्त्याचे काम सुंदर पद्धतीने करून दिल्याबद्दल या भागातील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक बाबर या इतरांनी माजी नगरसेवक सुनील काळे यांचे अभिनंदन केले व आभार मानले आहेत.

गेल्या २४ तासांत देशात ७६,४७२ नव्या रुग्णांची नोंद

Image
नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७६ हजार ४७२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३४ लाख ६३ हजार ९७३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ६२ हजार ५५० रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ५२ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू असून २६ लाख ४८ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.   जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात आतापर्यंत ४,०४,०६,६०९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गुरूवारी देशात ९ लाख २८ हजार ७६१ चाचण्या करण्याात आल्या आहेत. 

आता EMIवर सूट नाही : RBI

Image
नवी दिल्ली : सध्या देशाची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट बनली आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. कोरोना काळात दास यांनी १ मार्च पासून ते ३१ ऑगस्टपर्यंत कर्जाच्या हप्त्यांची वसूली स्थगित करण्याचा सल्ला इतर बँकांना दिला होता. मात्र आता बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांना आपल्या कर्जाचे हप्ते नियमित भरावे लागणार आहेत. याचा अर्थ कोरोना काळात देण्यात आलेली  EMI Moratorium सुविधा पुढे न वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.  दरम्यान कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत असल्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सर्व उद्योग ठप्प असल्यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे RBIने सर्व प्रकारच्या मुदत कर्जावर ऑगस्टपर्येत सूट अर्थात EMI Moratorium सुविधा दिली होती. परंतु आता ही सुविधा वाढवल्यामुळे रकमेच्या परतफेडीवर त्याचा परिणाम होवू शकतो अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.  त्याचप्रमाणे,  EMI Moratoriumचा कालावधी आणखी न वाढवण्याचा आग्रह एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संच

'खेल रत्न' पुरस्कारांची घोषणा, 'या' खेळाडूंसह ५ जणांचा सन्मान

Image
नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रोहित शर्मासह ५ खेळाडूंची देशाच्या सर्वोच्च खेळ पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. खेळ पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.  खेळ पुरस्कार-२०२० समितीने शुक्रवारी रोहित शर्मा, महिला पैलवान विनेश फोगट, महिला हॉकी टीमची कर्णधार राणी रामपाल, महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि पॅरा एथलिट मरियप्पन थेंगावेलू यांची घोषणा केली. २९ ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्ताने या खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार दिला जाईल.  रोहित शर्मा खेल रत्न पुरस्कार मिळणारा चौथा क्रिकेटपटू असेल. याआधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आङे. तसंच ईशांत शर्मासह २७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारांच्या अंतिम यादीमधून साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचं नाव हटवण्यात आलं आहे. या दोन्ही नावांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

Image
नवी दिल्ली : संपूर्ण देशात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी प्रत्येक सण अगदी साध्या पद्धतीत साजरे होताना दिसत. कोरोनाचं सावट फक्त भारतातचं नाही तर संपूर्ण जगावर आहे. आज घरा-घरांमध्ये गणरायाचं आगमन होत आहे. कोरोनाचं सावट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे. तर पंतप्रधान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ट्विट करत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा  दिल्या आहेत, 'तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा कायम राहो. गणपती बाप्पा मोरया..' असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा मोठा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करताना दिसत आहे. चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून

शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत

Image
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.  पाटील यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात आपण दोन कंपन्यांचे संचालक असल्याचे उत्तन्न लपवले तसेच केस मध्ये न्यायालयाने चार्ज फ्रेम केल्याचे लपवल्याने त्यांच्याविरोधत पुणे येथील JMFC कोर्टात दावा दखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायमूर्ती जान्हवी केळकर यानी पोलिसांना फौजदारी संहितेच्या 202 कलमांनुसार तपासचे आदेश केले असून १६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  कोथरुडच्या डॉ, अभिषेक हरिदास यांनी पाटील यांच्याविरोधात हा दावा केला होता. दरम्यान, आपल्यायवर करण्यात आलेले हे आरोप तथ्यहीन असल्याची स्पष्ट भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.  'बातम्यांच्या माध्यमातून आणि काही मित्रांकडून समजले की माझ्याविरुद्ध एक तक्रार न्यायालयात दाखल केली गेली आहे. अजून माझ्याकडे न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत आलेली नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही. पण, ही तक्रार संपू

'दिल्ली ते लंडन' बस प्रवास, लागणार एवढे पैसे आणि वेळ

Image
नवी दिल्ली : जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे. गुरगावमधली खासगी प्रवास कंपनीने १५ ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे. 'बस टू लंडन' असं या सेवेचं नाव आहे. या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकता. ७० दिवसांच्या दिल्ली ते लंडन या प्रवासात तुम्हाला १८ अन्य देशांमधून जावं लागेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स मधून युकेमध्ये पोहोचेल. दिल्लीचे रहिवासी असलेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने हा प्रवास केला होता. अशाच पद्धतीने यंदा २० जणांना सोबत घेऊन बसने प्रवास करण्याचा प्लान आहे.  'बस टू लंडन'च्या या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी खास बस

शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा

Image
अहमदनगर- शासनाने दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता करुन शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची मागणी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या यांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच शिक्षणमंत्री गायकवाड यांच्यापुढे शिक्षकांचे प्रश्‍न कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मांडले. यावेळी मोरे सर, मंगेश शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर राज्यातील 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना घोषित, अघोषित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे, पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी व 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळावे, जिल्हा शासन व शिक्षक समन्वय समिती नेमावी, जुनी पेन्शन योजना लागु करावी, निवृत्त शिक्षकांना पेन्शन अदा करावी, आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी, शिक्षकांचा कोरोना विमा काढावा, टीईटी ग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, संच मान्यता पोर्टल सुरु कर

पब्जीचा टास्क पूर्ण करु न शकल्याने युवकाची आत्महत्या

Image
चंद्रपूर : पब्जी खेळात टास्क पूर्ण करू न शकल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  भद्रावती तालुक्यातील माजरी कोळसा खाणीच्या गावातील ही घटना घडली. गौरव पाटेकर असं मृतक युवकाचे नाव आहे. लॉक डाऊनच्या काळात गौरवला पब्जी खेळण्याचे व्यसन जडले होते. मात्र एक टास्क पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा त्याने मित्राला फोन केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. माजरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

कोरोना योगदान : पोलीस दलाच्यावतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान

Image
  कोरोना योगदान : पोलीस दलाच्यावतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान अहमदनगर : कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना आधार देऊन पोलीस दलासमवेत केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा अहमदनगर पोलीस दलाच्यावतीने सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते भैय्या बॉक्सर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रविण लोखंडे उपस्थित होते. देशासह महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी व हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या टाळेबंदीत हातावर पोट असणारे, शहरात अडकलेले परप्रांतीय, आर्थिक दुर्बलघटक व सर्वसामान्य नागरिकांचे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत या घटकांना आधार देण्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्यावतीने त्यांना अन्न-धान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पशु-पक्ष्यांची देखील खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती. तसेच कर्तव्य बजाविणार्‍या पो

पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कर्मचाऱ्यांना कोरोना

Image
बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण झालीय. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज ही संख्या ४७३ झाली आहे. ५००च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गोविंद बागेतील जवळपास ५० कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी १२ कर्मचाऱ्यांना  कोरोना झाला होता.  दरम्यान, पवार नियमितपणे बारामती निवासस्थानी येत असतात, काही दिवसांपूर्वी त्यांच्या बारामतीत दौरा होता. मात्र तो अचानक रद्द झाला होता. सध्या प्रशासनाच्या वतीने प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ?, करता येतील ? त्याचा आढावा घेतला आहे.

ऊस पिकावरील पांढरी माशी किडीचे त्वरित नियंत्रण करून नुकसान टाळावे : बिपिनदादा कोल्हे

Image
  ऊस पिकावरील पांढरी माशी किडीचे त्वरित नियंत्रण करून नुकसान टाळावे : बिपिनदादा  कोल्हे  कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे ऊस पिकावर पांढरी माशी या रसशोषक किडीचा व कोएम ०२६५ या ऊसाच्या पानावर तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून त्यामुळे 80 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते, त्यासाठी त्यांचे वेळीच नियंत्रण करून नुकसान टाळावे, असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी केले आहे. ते म्हणाले, परिसरात सततचा पाऊस पडत असल्याने त्याचे पाणी जमिनीत साचून राहून, हवेतील आर्द्रता या पोषक हवामानामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पांढऱ्या माशीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेने शिफारस केलेल्या बीव्हिएम हे दोन लिटर जैविक कीटकनाशक चारशे लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे व ज्या ठिकाणी पांढरी माशी व तपकिरी ठिपके या दोन्हींचा प्रादुर्भाव आहे, तेथे डायथेन एम-45 व 100 मिली कॉन्फिडोर 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करून शेतकऱ्यांनी सदरचा प्रादुर्भाव कमी करण्