अहमदनगर शहरात जनता कर्फ्यु लागू होणार...? वाचा काय आहे सत्य...


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यासंबंधी ‘तो’ मेसेज ‘फेक’; मेसेज ग्रुपवर सेंड/ फॉरवर्ड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अहमदनगर सायबर पोलिसांकडून प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. फेक मेसेज ग्रुप वर सेंड करणारे इसमावर लक्ष असून फेक मेसेज सेंड / फॉरवर्ड करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे.

आज दुपार नंतर खालील प्रमाणे फेक मेसेज फॉरवर्ड होत आहे…

महत्वाचा मेसेज मित्रांनो,

आज दुपारी बारा वाजता आयबी बंगल्यावर सोळा तारखेपासून नगर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यासंबंधी मीटिंग आयोजित करण्यात आली होती, त्या मिटिंग मध्ये मा. आमदार संग्राम भैया जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे  यांनी मिटींगसाठी मलाही बोलावले होते, सदर मिटींगला मनपा गटनेता, विरोधी पक्षनेता,मनपा आयुक्त, पोलीस प्रमुख, व मनपा अभियंते उपस्थित होते, सुमारे दोन तास चाललेल्या या मिटींगमध्ये असा ठराव पुढे शासनाला पाठवायचे ठरले आहे की दिनांक १६ जुलै पासून सात दिवस व त्या परीस्थितीमध्ये फरक न झाल्यास त्याही पुढील सात दिवस, अहमदनगर शहरांमध्ये कडक लाॅक डाऊन अर्थात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येईल, त्यासाठी आपल्या सभासदांना अगोदरच पूर्वसूचना म्हणून सदरचा मेसेज मी करत आहे, की येत्या एक दोन दिवसात महत्त्वाची कामे घरातील कमी-अधिक सामान,औषधे भाजी याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, कारण सात दिवस रस्त्यावर २४ तास कडक कर्फ्यु असणार आहे, कुणालाही मेडीकल इमर्जन्सी व्यतिरिक्त फिरणे शक्य नाही, याची सर्वांनी नोंद घेऊन योग्य ती उपाययोजना करावी,सुरक्षित रहा घरीच रहा. कारण आताच्या मीटिंगमध्ये मला जी वास्तवता समजली आहे ती कल्पनेच्या पलीकडे भयानक असून आपण सर्वांनी आपली व कुटुंबियांची सुरक्षितता पाळायला हवी,

वरील प्रमाणे खोटे मेसेज हे अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना त्याचे व्हाट्सअप ग्रुप वर खोटा मेसेज फॉरवर्ड होत आहे.

तरी असे लोकांवर सायबर पोलिसांचे लक्ष असून त्याचेवर कारवाई करण्यात येत आहे तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व वरील प्रमाणे खोटे मेसेज दुसऱ्या कोणालाही व्हाॅट्सअप ग्रुप ला सेंड करू नका व अफवा पसरू नका तसे केल्यास त्याचेवर कारवाई करण्यात येईल.



Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा