अहमदनगर : जिल्ह्यात ७० जणांना कोरोनाची लागण


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली.

त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ५, नेवासा तालुका २, राहाता ११, राहुरी ७,

कोपरगाव ३, नगर ग्रामीण ३, नगर शहर ११, पाथर्डी १, शेवगाव १, भिंगार १०, कर्जत २, अकोले तालुका १, नांदेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण: १३२७

बरे झालेले रुग्ण: १४८०

मृत्यू: ५१

एकूण रुग्ण संख्या:२८५८

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"