Posts

Showing posts from July, 2020

अहमदनगर : जिल्ह्यात ७० जणांना कोरोनाची लागण

Image
वेब टीम : अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ५, नेवासा तालुका २, राहाता ११, राहुरी ७, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ३, नगर शहर ११, पाथर्डी १, शेवगाव १, भिंगार १०, कर्जत २, अकोले तालुका १, नांदेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेले रुग्ण: १३२७ बरे झालेले रुग्ण: १४८० मृत्यू: ५१ एकूण रुग्ण संख्या:२८५८

तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही, आणि हे एकदा होऊन जाऊ द्या...

Image
वेब टीम : पुणे तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊ द्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत”, असं म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी आज पुणे महानगरपालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं आहे. महापौरांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला भाजपच्या नेत्यांचा सत्कार

Image
वेब टीम : अहमदनगर  राज्यात जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधक भाजपावर टीका केली असेल, परंतु अहमदनगर येथे राजकीय चित्र उलटे आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून अहमदनगरचे प्रा.भानुदास बेरड यांची निवड झाल्याने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. या विरोधाभास असणाऱ्या घटनेमुळे अहमदनगर शहरात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, नगरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. पण यापूर्वीही महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर झाला आहे, हेही विसरून चालणार नाही. अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या छाट्याखानी कार्यक्रमानिमित्त आमदार संग्राम जगताप व भाजपचे प्रा. भानुदास बेरड हे एकत्र आले होते. या दरम्यान, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणुन प्रा. बेरड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, स

माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणतात... आमदार नसलो म्हणून काय झालं, विकासपर्व सुरूच राहील

Image
वेब टीम : अहमदनगर बुर्‍हाणनगरचा सरपंच असल्यापासून लोकांचे प्रश्‍न सोडविणे, गावाचा, परिसराचा विकास करणे ध्येय ठेवून त्याची पुर्तता केल्याने सर्वसामान्य जनतेने गेली 25 वर्षे कामाची पावती म्हणून मला आमदारकी बहाल केली होती. आता जरी विधानसभेचा आमदार नसलो तरी सर्वसामान्य जनतेचा मनात मी आमदार राहिल्याने विकासकामे करणे हे कर्तव्य समजून हे विकास पर्व सुरुच राहील, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाडीचे लोकार्पण श्री.कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बुर्‍हाणनगरचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाराम कर्डिले, श्रीधर पानसरे, रावसाहेब कर्डिले, तात्या कर्डिले, किशोर कर्डिेले, तसेच नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, शिवाजी पालवे, डॉ.दरंदले, रामदास काकडे आदि उपस्थित होते. माजी आ.कर्डिले पुढे म्हणाले, गेली 25 वर्षे जनतेने मला जेवढे प्रेम दिले, त्या जनतेच्या पाठिंब्यावरच मंत्रीपद मिळाले होते. त्याचा उपयोग मी जनतेचे  प्रश्‍न सोडविण्यासाठी केला, आजही जनतेच

अहमदनगर शहरात जनता कर्फ्यु लागू होणार...? वाचा काय आहे सत्य...

Image
वेब टीम : अहमदनगर अहमदनगर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यासंबंधी ‘तो’ मेसेज ‘फेक’; मेसेज ग्रुपवर सेंड/ फॉरवर्ड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अहमदनगर सायबर पोलिसांकडून प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. फेक मेसेज ग्रुप वर सेंड करणारे इसमावर लक्ष असून फेक मेसेज सेंड / फॉरवर्ड करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे. आज दुपार नंतर खालील प्रमाणे फेक मेसेज फॉरवर्ड होत आहे… महत्वाचा मेसेज मित्रांनो, आज दुपारी बारा वाजता आयबी बंगल्यावर सोळा तारखेपासून नगर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यासंबंधी मीटिंग आयोजित करण्यात आली होती, त्या मिटिंग मध्ये मा. आमदार संग्राम भैया जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे  यांनी मिटींगसाठी मलाही बोलावले होते, सदर मिटींगला मनपा गटनेता, विरोधी पक्षनेता,मनपा आयुक्त, पोलीस प्रमुख, व मनपा अभियंते उपस्थित होते, सुमारे दोन तास चाललेल्या या मिटींगमध्ये असा ठराव पुढे शासनाला पाठवायचे ठरले आहे की दिनांक १६ जुलै पासून सात दिवस व त्या परीस्थितीमध्ये फरक न झाल्यास त्याही पुढील सात दिवस, अहमदनगर शहरांमध्ये कडक लाॅक डा