टी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १ जागा'


हैदराबाद: पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीमच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत फक्त एकच जागा भरणे आवश्यक असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीस याने म्हटले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी संघात स्थान मिळवण्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे कोहलीच्या या वक्तव्यावरून सूचित होत आहे.

ही स्पर्धा एका जागेसाठी आहे आणि मला वाटते की तिन्ही खेळाडूंनी त्यांची जागा जवळपास पक्की केली आहे. ही निकोप स्पर्धा आहे. कोणाची निवड होईल हे पाहणे औत्सु्क्याचे ठरणार आहे, असे कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"