मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, Panipat चं पहिलं पोस्टर रिलीज


वेब टीम
मुंबई -  बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या बहुचर्चित ‘तानाजी’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. त्यानंतर आता आषुतोष गोवारिकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘पानीपत’चं पोस्टर रिलीज झालं आहे. याची टॅगलाइन आहे ‘एक लढाई, जिने इतिहास बदलला.’ पानीपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमात संजय दत्त अर्जुन कपूर आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत आहेत.

पानीपत सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असून हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली.

या सिनेमात अनेक लांब अ‍ॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अर्जुन कपूर आणि कृति सेनन या सिनेमासाठी खूप उत्साहित आहे. या सिनेमासाठी या दोघांनीही युद्ध कलांचं प्रशिक्षण घेतलं होतं. तर संजय दत्त भयंकर रुपात खलनायकाची भूमिका साकारत आहे. तो या सिनेमात अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा