धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!
आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे. नाशिक जिल्ह्यात या धनगरी घोंगडीला "जिन" म्हणतात असे पुसटसे आठवतेय! सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ…! गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीव
Comments
Post a Comment