Posts

Showing posts from November, 2019

धोनीच्या भवितव्याबद्दल BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला….

Image
मुंबई  :  महेंद्रसिंह धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केलं आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजुन बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. याबाबतीत कोणताही संभ्रम नसल्याचं गांगुली म्हणाला. “महेंद्रसिंह धोनीबद्दल सर्व समिती सदस्य एकवाक्यता आहे. धोनीसारख्या खेळाडूंबद्दल निर्णय घेताना काही गोष्टी या बंद दाराआड ठरवाव्या लागतात. याबद्दल जाहीर निर्णय घेतला जाऊ शकत नाही.” सौरव गांगुली प्रसारमाध्यमांशी बोलत होता. मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये धोनी कसा खेळ करतो यावर भारतीय संघात त्याचं भवितव्य ठरेल असं म्हटलं होतं. धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. मात्र ऋषभ सतत अपयशी ठरत असल्यामुळे धोनीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी मध्यंतरीच्या काळात होत होती. त्यातच सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल

पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत डेव्हिड वॉर्नरचं त्रिशतक

Image
मुंबई : अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटीत सामन्यात वॉर्नरने त्रिशतक झळकावलं आहे. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना वॉर्नरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभा करुन दिला. कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. याचसोबत वॉर्नरने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे. अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५०० धावांचा टप्पा ओलांडला असून पाकिस्तानचा संघ आता या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले, भाजपानेही मैदानात उतरवला उमेदवार

Image
मुंबई : विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच उपमुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महाविकासआघाडीच्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह काँग्रेसकडून शुक्रवारी धरण्यात आला. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. आघाडीच्या बुधवारी रात्री झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते. शपथवि

गोव्यात राजकीय भूकंप करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका, म्हणाले…

Image
मुंबई  :  महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तर काँग्रेसनंच त्यांना मोठा दणका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचं गोवा काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. आमच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपलं असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असं संजय राऊत म्हटलं होतं. “महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फ्रंट उभा केला जात आहे. गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केलं आहे ते सर्वांना माहिती असून हे

आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजपा रिकामं होईल – नवाब मलिक

Image
मुंबई :  भाजपाचे काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक असून आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजपा रिकामं होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला आहे. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलता त्यांनी हा दावा केला. “भाजपा आपल्याकडे ११९ आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आज तशी परिस्थिती नाही,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “भाजपानं आव्हान स्वीकारलं पाहिजे. आधी आपले ११९ आमदार दाखवा मग धमक्या द्या. भाजपामध्ये असे अनेक आमदार आहेत. ज्यांना अमिष दाखवून नेलं. आता सत्ता नाही म्हणून ते चलबिचल झाले आहेत. आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही, पण जर केलं तर अख्ख भाजपा रिकामं होईल हे त्यांना कळलं पाहिजे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. तसंच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपा शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल असा टोला लगावला आहे. “अधिक न

झारखंड निवडणूक: नक्षलींनी उडवला पूल

Image
रांची :  झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आज १३ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, गुमला जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस उपायुक्त शशी रंजन म्हणाले की हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नसून मतदान अजूनही सुरू असल्याची माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा असल्याचे मानले जात आहे. या मुळे अशा बर्‍याच उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष या दोघांसाठी निवडणूक महत्त्वाची ही निवडणूक भाजप आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप जोरदार दबाव आणत असताना, रघुबर सरकारला मात देण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये झारखंडचे आरोग्यमंत्री रा
Image
मुंबईः  अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर अशी भन्नाट स्टारकास्ट असलेला 'गोलमालचा' पुढील भाग लवकरच पुन्हा प्रेक्षकांना हसवायला येत आहे. लवकरच दिग्दर्शक  रोहित शेट्टी  'गोलमाल' सिरीजमधील पाचव्या भागासाठी काम करण्यास सुरुवात करणार आहे. अजय देवगण  आणि रोहित शेट्टीकडं बॉलिवूडमधील डायरेक्टर आणि अभिनेत्याची यशस्वी जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत ११ चित्रपटांत काम केलं आहे. रोहितच्या 'सूर्यवंशी'मध्येही अजय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच, रोहित शेट्टीचा ' गोलमाल-५ 'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य : भाजप

Image
मुंबई -   महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे. 'या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,' अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. महाराष्ट्रात गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी शपथ ग्रहण केले. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कुणी त्यांच्या पक्ष प्रमुखांचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 'महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे,' अशी टिप्पणीही पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला

शरद पवारांनी चक्क या चिमुकलीला सांगितले 'त्या' दिवशी पावसात भिजण्यामागचे गुपित!!

Image
वेब टीम एंटरटेन्मेंट डेस्क -     झी युवा या वाहिनीवर प्रसारित होणा-या 'युवा सिंगर एक नंबर' या सांगितिक कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अलिकडेच बारामतीच्या गदिमा सभागृहात पार पडला. या महाअंतिम सोहळ्याला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते. या कार्यक्रमाच्या एका अॅक्टमध्ये राधिका पवार या बालगायिकेने शरद पवारांना ५ असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी तिला एक गुपित सांगितले. बारामतीमध्ये झालेल्या 'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बाल गायिका राधिका पवारने निवेदिका मृण्मयी देशपांडे हीला सांगितले की आज मी सुद्धा निवेदन करणार आहे आणि आज मी शरद पवारांना काही प्रश्न विचारणार आहे. शरद पवारांनाही या गोष्टीला संमती दिली आणि राधिका सरळ पवार बसले होते तिथे जाऊन तिने त्यांना प्रश्न विचारायला सुरु केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं नाव बरंच चर्चेत राहील होतं ते त्यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे. पाच दशकाह

हा आहे अशोक-निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनय नव्हे या हटके क्षेत्राची केली निवड

Image
वेब टीम सध्या छोट्या पडद्यावर 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका गाजत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर दर्शन घडले आहे. त्यांनी साकारलेली आसावरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेत त्या एका मुलाची आई आहेत. खासगी आयुष्यातही निवेदिता सराफ एका मुलाच्या आई आहेत. अनिकेत सराफ हे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव आहे. पण अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट चोखाळली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. https://www.instagram.com/nicksaraf/?utm_source=ig_embed     खरं तर अशोक सराफ यांचे जवळचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांची मुले अभिनय बेर्डे, श्रिया पिळगावकर आणि आदिनाथ कोठारे त्यांच्या वडिलांच्याच क्षेत्रात नाव कमावत आहेत. पण अनिकेत सराफ मात्र याला अपवाद ठरला आहे. विशेष म्हणजे हे वेगळे क्षेत्र निवडून त्याने आई निवेदिता सराफ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

इस्रायली तंत्रज्ञानाने व्हाॅट्सअॅपमध्ये घुसखोरी, भारतीय पत्रकारांसह १४०० जणांची हेरगिरी

Image
वेब टीम नवी दिल्ली -   व्हाॅट्सअॅपला खिंडार पाडून जगभरातील पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले असून यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हाॅट्सअॅपने स्पष्ट केले की, इस्रायली स्पायवेअर “पेगासस’च्या माध्यमातून चार उपखंडांतील सुमारे १४०० लोकांच्या फोनमध्ये घुसून राजकीय नेते, राजकीय असंतुष्ट, पत्रकार व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली. पेगासस हे स्पायवेअर देखरेख करणारी इस्रायली संस्था एनएसओने तयार केले. हे सर्व कारस्थान नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, भारतातील किती लोकांची हेरगिरी झाली तो आकडा देण्यास व्हाॅट्सअॅपने नकार दिला. कंपनीने म्हटले आहे की, मे महिन्यात मोठा सायबर हल्ला रोखण्यात आला होता. याच काळात भारतात लोकसभेची निवडणूक होती. यावर चिंता व्यक्त करून माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हाॅट्सअॅपकडून म्हणणे मागवले आहे. व्हाॅट्सअॅपच्या भारतातील प्रवक्त्यानुसार, अशा युजर्सशी याच आठवड्यात संपर्क साधण्यात आला. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींचे वकील निहालसिंह राठोड, सामाजिक का

संजय राऊतांना सेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही', संजय राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रसाद लाड यांचा पलटवार

Image
वेब टीम मुंबई-  मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नसल्याचे दिसत नाहीये, तर दुसरीकडे सेनाही मुख्यमंत्री पदावरुन अडून बसली आहे. या सगळ्यात सेनेचे खासदार संजय राऊत अनेकदा भाजपवर टीका करत असतात. त्यांच्या एका टीकेवर बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास अनुकूलता न दाखवल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यातच खासदार संजय राऊत मागील तीन दिवसांपासून भाजपवर उघडपणे टीका करत आहेत. ''भाजप दिलेला शब्द पाळत नसून आमच्यासमोर इतरही पर्याय उपलब्ध आहेत,'' असे म्हणत राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊत यांना सडेतोर उत्तर दिले आहे. प्रसाद लाड म्हणाले की, ''संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया नाही. त्यांना सेनेकडून अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाहीये. सत्ता स्थापनेविषयी चर्चा करण्याचा अधिकार आमच्याकडून मुख्यमंत्री देवें

दिल्ली-एनसीआरमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर; 5 नोव्हेंबरपर्यंत सर्वप्रकारचे बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश

Image
वेब टीम नवी दिल्ली -  सर्वोच्च न्यायालयाच्या एक पॅनलने वायु प्रदूषणाची स्थिती पाहता शुक्रवारी दिल्ली-एनसीआर मध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण (ईपीसीएल) च्या म्हणण्यानुसार दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. यामुळे सर्व प्रकारच्या बांधकाम कामांवर 9 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच, हिवाळ्यामध्ये फटाके जाळण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावेळी दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. ईपीसीएलचे अध्यक्ष भूरे लाला यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांनी लिहिलेल्या पत्रात या आणीबाणीचा उल्लेख केला आहे. याआधी ईपीसीएलने आदेश जारी करत थंडीच्या दिवसांत फटाखे उडवण्यास बंदी लागू केली आहे. दिल्ली-एनसीआरच्या बर्‍याच भागात गेल्या एक आठवड्यापासून वायू प्रदूषण (वायू गुणवत्ता निर्देशांक) 500 च्यावर पोहोचला आहे, ही एक गंभीर परिस्थिती मानली जाते. केजरीवाल यांनी लोकांना मास्क घालण्याचे केले आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी ट्वीट केले की, "शेजारच्या रा

शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो - संजय राऊत

Image
वेब टीम मुंबई -  शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करू शकतो असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटप हवे आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच शपथ घ्यायला काय हरकत आहे? ते यासाठी 8 दिवस का थांबले? भाजपने चर्चा का सुरू केली नाही. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा. परंतु शिवसेना मात्र स्थिर सरकारसाठी बहुमत सिद्ध करेल, असे म्हणून संजय राऊतांनी मोठा इशाराच भाजपला दिला. दरम्यान संयज राऊत यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. बळीराजाच्या प्रश्नावर आमच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आहे. राज्यात सध्या सरकार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच आम्ही पवारांशी चर्चा केली, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विस्फोटकांनी भरलेली बॅग सापडली, आरडीएक्स असल्याचा संशय

Image
वेब टीम नवी दिल्ली -  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री एक बेवारस बॅग आढळली. प्राथमिक तपासात बॅगमध्ये विस्फोटक असल्याचे समोर आले. दरम्यान, हे विस्फोटक आरडीएक्स आहे का आयईडी, हे स्पष्ट झाले नाही. विमानतळावरील काही प्रवाशांनी बॅगमधून वायर बाहेर आलेले पाहिले. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉडने बॅगला विमानतळाबाहेर नेले. मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची ही बॅग टर्मिनल-3 च्या अरायव्हल पॉइंटजवळ असल्याचे सीआयएसएपच्या जवानांना कळाले. वेबारस बॅग असल्याचे कळताच विमानतळ रिकामे करण्यात आले. त्यानंतर डॉग स्क्वॉड आणि एक्सप्लोसिव डिटेक्टरच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. टर्मिनल-3 मधून आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करतात अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी विमानतळाची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रवाशांना आत येऊ दिले. या सर्व घटनेदरम्यान विमानतळाबाहेरील रस्ताही बंद करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीच्या टर्मिनल 3 मधून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते.

राज्यात सद्यस्थितीत सत्तासमीकरणाच्या 'या' ६ शक्यता

Image
वेब टीम मुंबई -  राज्यात कुणाची सत्ता येणार ? भाजपासमोर काय आहेत पर्याय ? शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार ? नव्या सरकारमध्ये अपक्षांना किती महत्त्व राहील ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या राज्यात सगळेच जण शोधतायेत. निकालाला आठ दिवस उलटून गेले तरी भाजपा आणि शिवसेनेत अजून चर्चाच सुरु झालेली नाही. कालपर्यंत थोडी समन्वयाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेनं आता थेट भाजपाला आव्हान दिलंय. तर दुसरीकडे ५ किंवा ६ तारखेला फडणवीस सरकारचा शपथविधी करण्याची तयारी भाजपाच्या गोटात सुरु झाली आहे. त्यामुळे सत्ता समिकरणाच्या ६ शक्यता वर्तवल्या जात आहेत.  शक्यता क्रमांक 1  अमित शाह यांच्या मुंबई भेटीनंतर शिवसेना आणि भाजपातील तणाव निवळेल शक्यता क्रमांक २  सध्या १३ अपक्ष भाजपाच्या साथीला आहेत, तर ६ अपक्ष शिवसेनेकडे आहेत. सर्व अपक्ष एकत्र आले तरी भाजपा बहुमताच्या आकड्यापासून दूर  शक्यता क्रमांक ३  शिवसेनेतील आमदारांना फोडून भाजपा सत्ता स्थापन करेल. पण दोन तृतियांश आमदार फोडणे भाजपासाठी अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार राजीनामा देण्याची शक्यता.  शक्यता क्रमांक ४ शपथविधीनंतर राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा

सेने'सोबत' किंवा 'शिवाय'... भाजपाचा मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला

Image
वेब टीम मुंबई -   विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेचं गणित कोण जुळवून आणणार या प्रश्नावर भाजपानं आपल्या बाजुनंच उत्तर काढलंय. येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. शिवसेना पुढे आली तर सोबत नाहीतर शिवसेनेशिवाय भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडावा, अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्र्यांसहीत काही ठराविक मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी दिली.  आमदार प्रसाद लाड आणि प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे मंत्रीमंडळ तयारीची जबाबदारी देण्यात आलीय. २०१४ प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची तयारी भाजपानं केलेली दिसतेय. २०१४ साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या

राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण

Image
वेब टीम पुणे -  राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण कायम राहणार असून पुणे, कोकण गोवासह अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता पुणे हवामान विभागानं वर्तविली आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  3 नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होईल. मात्र पुन्हा 6 नोव्हेंबरनंतर महाचक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागेल. त्या दरम्यान पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. समुद्रावर निर्माण झालेलं क्यार वादळ पूर्णपणे शमलं आहे.  मात्र सध्या सक्रिय असलेल्या महाचक्रीवादळापाठोपाठ आणखी एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असल्यानं पाऊस नेमका कधी थांबणार याबद्दल सांगता येणं शक्य नसल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे.

आत्महत्त्येचे सत्र सुरूच.. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

Image
वेब टीम मनमाड - नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरू झाले असून नापिकी व डोक्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले. गुरुवारी (31ऑक्टोबर) एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी दिंडोरीच्या मोहाडे येथे विष प्रशन करून एकाने आत्महत्त्या केली. मालेगावच्या रोझे येथील भास्कर घुगे या शेतकऱ्याने शोतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते शिवाय त्यांनी मुलीच्या विवाहासाठी नातेवाईकांकडून उसणे पैसे घेतले होते. ते कसे फेडायचे या चिंतेतून भास्कर घुगे यांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, राज्यात होत असलेल्या मान्सूनोत्तर पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात कापणीसाठी आलेले पीक अक्षरशः कुजले आहे. सोयाबिन, बाजरी, ज्वारी, मका पिकाला कोंब फुटले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाऊसामुळे गमवावे लागले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक गणित बसवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावी, अशी शेतकऱ्या

जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

Image
वेब टीम जामखेड -  कर्जत-जामखेडमधून विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी विजयी मिरवणूक काढली. तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेडमध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत जेसीबी मिशिन्सच्या साह्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 28 जेसीबी मिशिन्स सर्व शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या. रोहित पवार असलेली गाडी जशी चौकात येत होती तसं कार्यकर्ते जेसीबीतला गुलाल उधळत होते. त्यामुळे सगळं शहर गुलालात माखलं गेलं होतं. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शरद पवारांचे नातू असल्याने रोहित यांच्या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. रोहित यांची ही पहिलीच निवडणूक होती तर शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जावून त्यांची भेटही घेतली होती. त्यांच्या या कृतीचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅलीसाठी जामखेडमध्ये आले होते. आज जामखेड मध्ये तर उद्या कर्जत मध्ये पुन्हा

India vs Bangladesh : ‘3 तासांच्या टी-20 सामन्यानं तुम्ही मरणार नाही’, दिल्ली प्रदूषणावरून प्रशिक्षकानं सुनावलं

Image
वेब टीम नवी दिल्ली - भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला य नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 3 नोव्हेंबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान दिल्लीतील सामन्यावरून सध्या वादंग सुरू आहेत. कारण दिल्लीत हवेतले पोल्युटंट प्रचंड वाढले आहेत. सध्या दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे हवेतल्या घातक कणांची संख्या 500च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे हे प्रमाण 0 ते 50 दरम्यान असेल तरच हवा चांगली असल्याचं मानलं जातं. दिल्लीची हवा हिवाळ्यात वाईट होते आणि AQI 400 च्या आसपास पोहोचतो. या वेळी तो 500च्यावर पोहोचल्यामुळे Emergency जाहीर केली आहे. त्यामुळं येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणूनच दिल्लीमध्ये सामना होऊ नये, अशी मागणी पर्यावरणमित्रांनी आणि खासदार गौतम गंभीर यांनी केली आहे. दिल्लीतील हवा दुषित असली तरी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) यांनी सामना ठरलेल्या वेळेनुसार आणि दिल्लीमध्येच होणार असल्याचे सांगितले. या सगळ्यात आता बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी प्रदूषणा

मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, Panipat चं पहिलं पोस्टर रिलीज

Image
वेब टीम मुंबई -   बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या बहुचर्चित ‘तानाजी’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. त्यानंतर आता आषुतोष गोवारिकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘पानीपत’चं पोस्टर रिलीज झालं आहे. याची टॅगलाइन आहे ‘एक लढाई, जिने इतिहास बदलला.’ पानीपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमात संजय दत्त अर्जुन कपूर आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत आहेत. पानीपत सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असून हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली. या सिनेमात अनेक लांब अ‍ॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अर्जुन कपूर आणि कृति सेनन या सिनेमासाठी खूप उत्साहित आहे. या सिनेमासाठी या दोघांनीही युद्ध कलांचं प्रशिक्षण घेतलं होतं. तर संजय दत्त भयंकर रुपात खलनायकाची

या कारणांमुळे सोनं झालं एवढं महाग, हे आहेत आजचे दर

Image
वेब टीम नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी आलीय. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झालीय. सोन्याचे भाव 115 रुपयांनी वाढून 39 हजार 17 रुपये प्रतितोळा झाले. 24 कॅरट सोन्याचे भाव बुधवारी 38 हजार 902 रुपये होते.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1500 डॉलर आणि चांदीचे भाव 18 डॉलर प्रतिऔंस झालं. चांदीला आली झळाळी चांदीचा भाव 95 रुपयांनी वाढून 47 हजार 490 रुपये प्रतिकिलो झाला.  HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, मजबूत ग्लोबल ट्रेंडमुळे गुरुवारी सोन्याचा भाव वाढला. रुपया कमजोर पडल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतींमुळेही सोन्याला उभारी मिळाली.

काँग्रेस नेत्यांची दिल्ली वारी फसली.. सोनिया गांधींनी भेट न देता पाठवले माघारी

Image
वेब टीम नवी दिल्ली - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले होते. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे पोहोचले. मात्र,काँग्रेस नेत्यांची दिल्ली वारी फसली. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट न देता सगळ्यांना माघारी पाठवल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत पोहोचतात काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींची वेळ मागितली होती. पण,सोनिया गांधींनी काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांची भेट घेण्याची आदेश दिला. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सर्व काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थितीत होते. काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यामुळेच भेट नाकारण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काढली खरडपट्टी... जर शिवसेनेसोबत जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिराच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी? काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या 370 कलम संदर्भात काय भूमिका घ्यावी? वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेसने काय भूमिका घ्यावी? असे सवाल करून वेणुगोपाल यांनी काँग्रेस नेत्यांची खरडपट्

7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार

Image
वेब टीम मुंबई  - 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं. पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.

शरद पवार पीडित शेतकऱ्यांच्या बांधावर, तर रोहित पवारांवर लाखोंच्या गुलालाची बरसात

Image
वेब टीम मुंबई - एकीकडे वयाच्या ऐंशीतही शरद पवार ओला दुष्काळामुळे पाहणी दौरा करत आहेत, तर दुसरीकडे नातू रोहित पवार मात्र विजयी मिरवणुकीत गुलाल उधळत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. अवकाळी पावसानं शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. संपूर्ण पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. काल सातारा दौरा केल्यानंतर आज शरद पवार नाशिक दौर्‍यावर होते. तिथे शेतकर्‍यांच्या भेटीगाठी करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर दुसरीकडे नातू रोहित पवारांची मात्र जामखेडमध्ये विजयी मिरवणूक झाली. यावेळी ढोल-ताशांचा गजरात 30 जेसीबी लावून गुलालाची उधळण करण्यात आली. विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी नवनिर्वाचित आमदारांना ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असा सल्ला दिला होता. या सल्ल्याचा विसर पवारांचे नातू रोहित पवारांनाच पडलेला दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने गुलाल उधळून रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. निवडून आल्यानंतर रोहित पवार आज पहिल्यांदा जामखेड शहरात आले होते. जन