Posts

Showing posts from October, 2019

जान्हवी कपूर म्हणते, ‘लेडी कबीर सिंग’ व्हायला आवडेल!

Image
वेब टीम      मुंबई  अभिनेत्री जान्हवी कपूरला एकाच चित्रपटाचा अनुभव असला, तरी तिच्या हाती उत्तमोत्तम चित्रपट आहेत. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता, आपण आई श्रीदेवी यांनी दिलेल्या शिकवणीवरच प्रत्येक निर्णय घेत असल्याचं तिनं लाइव्ह गप्पांमध्ये सांगितलं. सध्याच्या काळात अभिनेत्रींसाठीही ‘लेडी कबीर सिंग’ प्रकारच्या भूमिका लिहिल्या जाव्यात, असं तिला वाटतं. ‘धडक’ ही केवळ सुरुवात आहे. मी चांगलं काम केलं की नाही हे सांगायला खूप लोक आहेत. मात्र माझा प्रवास हा आईच्या शिकवणीवरच सुरू आहे, असं  जान्हवी कपूर  सांगते. ‘तिला जितकी उत्तम अभिनेत्री व्हायचं आहे, त्यासाठी आधी तितकंच उत्तम व्यक्ती व्हावं लागेल,’ असा सल्ला आईनं दिल्याचं ती म्हणते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला जाहीर कार्यक्रमांमध्ये सातत्यानं आईशी असणाऱ्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. मात्र, एरवी फारसं न बोलणाऱ्या जान्हवीनं आईशी असणारं नातं आणि तिची शिकवण यावर या गप्पांमध्ये सविस्तर भाष्य केलं.

सिंधूची विजयी सलामी

Image
वेब टीम ओडेन्से (डेन्मार्क) - भारताच्या बी. साई प्रणीतने  डेन्मार्क ओपन  बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत चीनच्या लीन डॅनचे आव्हान परतवून लावले. त्याचबरोबर पी. व्ही. सिंधूनेही विजयी सलामी दिली, तर परुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्माला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत साई प्रणीतने लीन डॅनचे आव्हान २१-१४, २१-१७ असे परतवून लावले. ही लढत ३६ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत साई प्रणीत १२व्या स्थानावर असून, लिन डॅन १८व्या स्थानावर आहे. ऑलिंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या लिन डॅनने मागील दोन्ही लढतींत साई प्रणीतला नमविले होते. या वेळी मात्र साई प्रणीतने त्याच्यापेक्षा सरस खेळ केला. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. मात्र, 'ब्रेक'ला साई प्रणीतने ११-८ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर मात्र साई प्रणीतने लिन डॅनपेक्षा दोन पाऊले पुढेच राहिला. साई प्रणीतने १८-१४ अशा आघाडीनंतर सलग तीन गुण घेत पहिली गेम जिंकली. दुसरी गेम अतिशय अटितटीची झाली. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध आघाडी घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सेनेच्या ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक

Image
वेब टीम उस्मानाबाद - उस्मानाबादचे शिवसेनेचे  खासदार ओमराजे निंबाळकर  यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजेंना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते सुखरुप आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, पळून गेलेल्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली. ओमराजे निंबाळकर हे पडोळी नायगाव येथे प्रचार करत होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका तरुणाने हात मिळवत त्यांच्या पोटावर दुसऱ्या हाताने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण ओमराजे यांनी दुसरा हात मध्ये घालत हा चाकू हल्ला अडवला. यानंतर हल्ला करणारा तरुण पळून गेला. ओमराजेंच्या घड्याळावर चाकूचा वार बसल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. हल्ला करणारा तरुण हा कोण होता हे माहिती नाही. या घटनेने आपल्यालाही धक्का बसला आहे. आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झालीय. मात्र आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मी सुखरुप

पुणेकरांनो यावेळी तरी मतदान करा! १३ वर्षे मंत्री असूनही काही करता आले नाही, बांगड्या भरा- पवार

Image
वेब टीम अहमदनगर :  विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत.  श्रीगोंदा  विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री  बबनराव पाचपुते  यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पवार यांनी आज श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलं. 'पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केले. पण, पाचपुते रयत शिक्षण संस्थेत बसून राजकारण करायला लागले होते. पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले. १३ वर्षं मंत्रिपद दिले. इतकी वर्षे मंत्रिपद मिळूनही त्यांना काही करता आले नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत,' अशी जहरी टीका पवार यांनी केली. पाचपुतेंनी खासगी कारखाने काढून शेतकऱ्यांचे पैसे थकविले. वर्षांनुवर्षे ऊस उत्पादकांचे, कामगारांचे पैसे थकविले. ऊस उत्पादकांचे पैसे न देता उमेदवार म्हणून

पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार – नरेंद्र मोदी

Image
वेब टीम  हरियाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार असल्याचं म्हटलं आहे. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचं सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलमबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहनही केलं. “जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला धडा शिकवा,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आश्वासन देत, ‘आपलं सरकार पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार आणि तेच पाणी हरियाणाकडे वळवणार. हे आपल्या देशाचं आणि राज्यातील शेतकऱ्याचं हक्काचं पाण

झी मराठी अवॉर्ड्समध्ये 'अग्गंबाई सासूबाई'ची बाजी

Image
मुंबई - तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको ,अग्गंबाई सासूबाई या मालिका म्हणजे मराठी प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या मालिकांचा एक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो . मालिकेतील कलाकारांना त्यांच्या कामाची पावती आणि मजा-मस्ती असा मनोरंन करणारा हा सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कारांची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात. कोणता कलाकार काय सादर करणार... कोणत्या जोडीला प्रेक्षकांची वाह..वाह.. मिळाली, कोणती मालिका, सर्वोत्कृष्ट ठरेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. यंदा झी मराठी वाहिनीनं २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळं भव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वर्षीच्या सोहळ्यात दोन मालिकांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली मालिका 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेनं सर्वांत जास्त पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट सासू,सर्वोत्कृष्ट सून,सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट जोडी या एकूण नऊ प

विराट कोहली हा भारताचा गौरव!; गांगुलीने उधळली स्तुतीसुमने

Image
मुंबई - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या BCCI च्या अध्यक्षपदामुळे चर्चेत आहे. तशातच गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचे तोंडभरून कौतुक केले आहे. विराट कोहली हा भारताची शान आणि गौरव आहे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत व्यक्त केले. पुढील वर्षी भारतात टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारताकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच सर्वोत्तम संघ कसा असावा, याची चाचपणी सुरू आहे. भारताला विराटसारखा एक चांगला आणि निर्भिड कर्णधार लाभला आहे. तो भारताची शान, गौरव आणि अभिमान आहे. विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत कोणताही दबाव बाळगू नये. त्याने मनासारखे खेळावे. कारण सामना बैठकीत नाही, तर मैदानात जिंकला जातो, असे म्हणत गांगुलीने विराटचा स्तुती केली आणि त्याला BCCI चा पूर्णपणे पाठिंबा असेल असे संकेत दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभारच वांझोटा होता : राज ठाकरे

Image
मुंबई - पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली. जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हाच मी बोललो होतो की हे मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवली या ठिकाणी सभा होती. त्या सभेत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य कारभाराची खिल्ली उडवली.

सावरकरांना 'भारतरत्न': 'जाहीरनाम्यात उल्लेख का? थेट का नाही देत?', शरद पोंक्षे यांचा भाजपला सवाल

Image
मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपलं 'संकल्पपत्र' जाहीर केलंय. यात अनेक घोषणांशिवाय एका घोषणेची मोठीच चर्चा सुरू झालीये. ती म्हणजे- महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याविषयी पाठपुरावा करण्याचं आश्वासन. मात्र, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशी घोषणा करण्याच्या भाजपच्या 'टायमिंग'वर बोट ठेवलंय. २०१४पासून भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात असताना अनेकांना 'भारतरत्न' प्रदान करण्यात आले. त्याचवेळी, सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आले असते. त्यामुळे, आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनाम्यात निवडून आल्यास सावरकरांना 'भारतरत्न' देऊ, असं काही म्हणण्याची गरज नव्हती. असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी (भाजप) अनेकांना दिला तसाच सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आला असता. "...त्यामुळे हिंदुत्ववादी, सावरकरवादी मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी हे कुठेतरी आहे की काय, अशी शंका येते", अशी खरमरीत टीकाही पोंक्षे यांनी केली. मात्र, तरीही भाजपला सावरकरांना &

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला चौकशी

Image
मुंबई - वरळीच्या सीजे हाऊस इमारतीच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव प्रकरणात ईडीच्या रडारवर होतं, जे आता जाहीर झालं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचंही नाव आता या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याप्रकरणात जोडलं गेलं आहे. प्रफुल पटेलांनी संबंधित करार करताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं, ईडीची नोटीस जाहीर झाल्यानंतर पटेल यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. ही प्रॉपर्टी हजरा इकबाल मेमन यांची असल्याकारणाने याच्या व्यवहाराचा आमच्याशी संबंध नसल्याचं पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं. मेमन यांना 199 साली पासपोर्ट मिळाला आणि त्या युएईला जाऊनही आल्या, हा मुद्दा प्रफुल यांनी मांडला कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास पासपोर्ट आणि प्रवासात अडचणी येतात. मेमन यांची पार्श्वभूमीसुद्धा व्यवहारापूर्वी आम्ही तपासली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यवहार केल्याने कायद्याचं उल्लंघन होणार नाही ही खात्री आम्ही अगोदरच घेतली होती त्यानंतर कागदावर सह्या केल्या, त्यामुळे आता कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचा प्रश्न नाही, अ

'भारतरत्न' ही सरकारची निवडणुकीसाठीची चलाखी, सरकारला उशीरा जाग : सुप्रिया सुळे

Image
मुंबई - भारतीय जनता पक्षाने आज (15 ऑक्टोबर) त्यांचे संकल्पपत्र (जाहीरनामा) जाहीर केले असून यात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होतो. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही सुळे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलं. दरम्यान, महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.