Posts

Showing posts from September, 2019

निवडणूक आयोगाआधीच मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितली आचारसंहितेची तारीख!

Image
वेब टीम जालना -  महाराष्ट्र विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची तारीख सांगण्याची भाजप नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या १३ तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे जाहीर करून टाकले आहे. जालन्यात ओबीसी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आचारसंहितेची तारीख जाहीर केली. याअगोदर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल, असा अंदाज लावला होता. भाजप नेत्यांच्या आचारसंहितेच्या तारखा घोषित करणाऱ्यावर विरोधी पक्षांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे नेते तारखा कशा काय जाहीर करू शकतात? , असं विरोधी पक्षाने म्हटलेे आहे.

‘विधानसभेवर भाजपचाच झेंडा फडकवणार’, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर युतीवर प्रश्नचिन्ह

Image
वेेेब टीम लातूर - महाजनादेश यात्रेनिमित्त लातूर येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले असे दिसून आले. त्यांनी भाषणात एकदाही शिवसेना किंवा युतीचे सरकार याचाही उल्लेख केला नाही. उलट भाषणाच्या शेवटी विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार अशी घोषणा केली. त्यांनी केलेल्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) लातूर येथे दाखल झाली. रात्री भरपावसात त्यांची जाहीर सभा झाली. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या माहितीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरू असलेली वाटचाल याचीही जाणीव उपस्थितांना करवून दिली. मात्र अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात त्यांनी एकदाही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही किंवा युतीचे सरकार असेही म्हटले नाही. उलट भाषणाच्या अखेरीस लातूरकरांचा जनादेश मोदींना आहे का? मला आहे का? पालकमंत्री निलंगेकरांना आहे का? महापौरांना आहे का? असे प्रश्न उपस्थितांना विचारून होकार घे

ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्र्याकडून क्लिनचीट दिली जाईल; खडसेंचा घरचा आहेर

Image
वेब टीम मुंबई - भाजपमध्ये जे लोक प्रवेश करत आहेत ते साधुसंत नाहीत. अनेकांवर आरोप आहेत. मात्र नंतर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्र्याकडून क्लिनचीट दिली जाईल, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. ते पक्षात घेण्याआधी नेत्यांना धुवून घेतात. आमची पार्टी विथ डिफरन्स आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लोक चांगल्या लोकांना निवडून देतील, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. कोणीही विचार आणि तत्व पाहून पक्षात प्रवेश करत नाही त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. कोणालाही पदाची अपेक्षा असते. तर कोणाला सत्तेचे रक्षण पाहिजे असते. त्यामुळे पक्ष प्रवेश होत आहेत, असेही खडसेंनी म्हटले आहे. दरम्यान, गेले अनेक दिवस मी राणेंच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चा ऐकत आहे. शिवसेनेच्या दबावाखाली राणेंचा प्रवेश थांबवण्याची गरज नाही, असेे त्यांनी सांगितले.

पवारांची साथ सोडताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर

Image
वेब टीम उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला निरोप देताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर झाले. काळजावर दगड ठेवून आपण हा निर्णय घेत असल्याचे राणा जगजितसिंह यांनी सांगितले आहे. शरद पवार माझे दैवत होते, आहेत आणि तसेच राहतील. पक्ष सोडला तरी पवार कुटुंबीयांशी आपले चांगले संबंध असतील. अतिशय जड अंत:करणाने मी हा निर्णय घेत आहे, असे म्हणत जगजितसिंह भावूक झाले. जिल्ह्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आणि उस्मानाबादमध्ये हक्काचे पाणी आणणे, यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पवार चिडले पत्रकारावर अन् काँग्रेस-राष्ट्रवादी भिडले सोशल मीडियावर!

Image
वेब टीम मुंबई - नात्यागोत्यातली मंडळी राष्ट्रवादी सोडून जाण्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचा भर पत्रकार परिषदेतला संताप आख्ख्या महाराष्ट्राने पाहिला, मात्र पवारांच्या संतापाचा स्फोट जरी त्या पत्रकार परिषदेत झाला असला तरी यावरुन धूर आणि जाळ मात्र सोशल मीडियावर पसरतोय. इतका की चक्क आघाडी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरुन आपापली ट्विटरास्त्र परजली! खरं तर त्या प्रसंगानंतर हा विषय संपायला हवा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते डॉ. जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या निष्पक्षपातीपणावर ट्वीट करुन शेलक्या शब्दात टीका केली. या पत्रकाराचा माजी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत गाडीत बसलेला एका फोटो आव्हाडांनी ट्वीट केले. पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे! @TV9Marathi @News18lokmat @ndtv @SakalMediaNews @MySarkarnama @TOIIndiaNews pic.twitter.com/WqfqH9dytp — Dr.Jitendra Awhad (@Aw

हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची ; ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज?

Image
वेब टीम मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी  विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लागल्याने ही चर्चा अधिकच जोर धरु लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूच लढणार असल्याची घोषणा गट प्रमुखांच्या मेळाव्यात केल्याचे समोर आले होते. हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची या मथळ्याखाली वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स झळकले आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून वरळी विधानसभा क्षेत्रात फिरत आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या सूचना आणि इतर नेत्यांची वक्तव्य पाहिली तर आदित्य याठिकाणी निवडणूक लढू शकतात हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी ; उद्या प्रवेश होणार?

Image
वेब टीम मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. याआधी ही जेव्हा भुजबळांच्या शिवसेनेतील प्रवेशावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारण्यात आले तेव्हा वेळ येईल, तेव्हा सर्व कळेलच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासूनच भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे. छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. मात्र आता भुजबळ शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांशी शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंची खबलतं झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तब्बल 29 वर्षांनी भुजबळांची घरवापसीची शक्यता आहे.