Posts

Showing posts from August, 2019

धोनीने आता निवृत्ती घ्यावी : 'या' खेळाडूची मागणी

Image
वेब टीम : दिल्ली नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर माजी कर्णधार एम एस धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याचबरोबर अनेकांनी धोनीच्या निवृत्तीची मागणीही केली होती. यामध्ये अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांचाही समावेश होता. आता यामध्ये बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज तिवारी याचीही भर पडली आहे. धोनीचे भारतासाठी योगदान मोठे आहे. मात्र, आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धोनीने निवृत्ती घ्यावी असे मनोज तिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. ‘धोनीनेे भारतीय क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले आहे. यात काही वाद नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून धोनीच्या फलंदाजीमध्ये घसरण झाली आहे. मात्र भारताला इथून पुढील स्पर्धा जिंकायच्या असतील तर सर्वोत्तम संघाला मैदानावर उतरवायला हवे. देशात सध्या अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. या तरुणांना आता संधी मिळायला हवी. भारतीय संघ कोणाची खाजगी संपत्ती नाही. हा देशाचा संघ आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’ असेही मनोज तिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. यापूर्वी सचिन तेंडुलकरनेही,

चांद्रयान २ ने पाठवले चंद्राचे पहिले छायाचित्र

Image
वेब टीम : दिल्ली चांद्रयान २ ने बुधवारी चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आज चांद्रयानाने चंद्राचे छायाचित्र पाठवले आहे. या मोहिमेतले हे पहिलेच छायाचित्र आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर उंचीवरुन बुधवारी हे छायाचित्र काढण्यात आले. या छायाचित्रात चंद्रावरचे ओरिएंटल व अपोलो हे खड्डे दिसत आहेत. येत्या ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

खुशखबर : गृहकर्जाचा हप्ता होणार कमी

Image
वेब टीम : दिल्ली एसबीआयने त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी आनंदाची घोषणा केली आहे. जुन्या कर्जधारकांना हा लाभ मिळणार असून आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा विचार बँक करत आहे. एसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.बँक जुन्या ग्राहकांना रेपो लिंक्ड लेंडिंग रेटवर कर्ज देऊ शकते. बँकेला आशा आहे की, सरकार सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपाय करत असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल. देशातील मोठ्या बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली होती. याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला होता. यातून बँकेच्या नव्या ग्राहकांना व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळत होता. यामुळे जुन्या ग्राहकांनाही व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळवून देण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

खुशखबर : सशस्त्र पोलीस दलाचे निवृत्ती वय आता ६० वर्षे

Image
वेब टीम : दिल्ली केंद्र सरकारने आता सर्व केंद्र सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचे निवृत्ती वय ६० केले आहे. ही माहिती केंद्रीय गृह खात्याने एका सरकारी पत्रकाद्वारे सोमवारी पीटीआयला दिली. केंद्रीय गृह खात्याने काढलेल्या या सरकारी पत्रात केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित केले आहे. या सरकारी आदेशामुळे कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्तीवय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे. याचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे. या चार दलांमधील उप महानिरीक्षक (डीआयजी) या पदापासून ते महासंचालक (डीजी) या पदापर्यंतच्या व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत.

टीडीपीच्या ६० नेत्यांचा भाजपात प्रवेश

Image
वेब टीम : विजयनगर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासमोरील अडचणी कमी होण्यास तयार नाहीत. दिवसेंदिवस नवीन अडचणी समोर येत आहेत. तेलुगू देसम पक्षाच्या जवळपास ६० नेत्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह रविवारी भाजपात प्रवेश केला असल्याचे वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यासंदर्भात बोलताना काही महिन्यांपूर्वी टीडीपी सोडून भाजपात सामील झालेले लंका दिनकर म्हणाले क ी, आमच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा शाखेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेलुगू देसम पार्टीतून आज जवळपास ६० नेत्यांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश पाहता लोकांमध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर असलेला राग प्रकट होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय नेते आहेत, तर काही जिल्हास्तरीय नेते आहेत..

संजुबाबा करणार राजकारणात प्रवेश; 'या' पक्षात जाण्याची शक्यता

Image
वेब टीम : मुंबई राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या वर्धापनदिनीच त्यांचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, असंही जानकर यांनी सांगितलं. त्यातच संजय दत्तने रासपला शुभेच्छा देणारा व्हिडिओ प्रसारित केल्याने तो रासपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जानकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या मेळाव्यात बोलताना जानकर यांनी संजय दत्त येत्या २५ सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला. अभिनेता संजय दत्तने रासपच्या वर्धापन दिनानिमित्त एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. जानकर हे माझ्या भावासारखे असून त्यांना मी शुभेच्छा देतो. मी इथे असतो तर नक्कीच त्यांच्या मेळाव्याला आलो असतो, असेही त्याने म्हणले आहे.

आयुषमानचा 'बाला' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टिझर रिलीज

Image
वेब टीम : मुंबई अभिनेता आयुषमान खुरानाची सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘अंधाधुन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारा बरोबरच ‘बधाई हो’तील कामासाठीही त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता त्याचा ‘बाला’ चित्रपट येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.आयुषमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बाला’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. नेहमीच हटके लुकमध्ये दिसणाऱ्या आयुषमाने या चित्रपटातही प्रेक्षकांना त्याच्या लुकने उत्सुक केले.टीझरमध्ये आयुषमान दुचाकीवर बसून आनंदात ‘कोई ना कोई चाहिए प्यार करन वाला’हे गाणे गाताना दिसतो. अचानक जोराचा वारा सुटतो आणि त्याच्या डोक्यावरची टोपी उडून जाते. अन् त्याचे टक्कल दिसते. त्यामुळे तो नाराज होतो आणि ‘रहने दो छोड़ो भी जाने दो यार’हे गाणे गाताना दिसतो. आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही सहज साधा विषय हाताळलेला दिसणार यात शंका नाही.हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आयुषमानसोबत दिसणार असून ती एका सावळ्या मुलीची व्यक्तीरेखा साकारात आहे.भूमी आणि आयुषमान या दोघांचा एकत्र हा तिसरा चित्रप

बालाकोट एअर स्ट्राईकवर येणार चित्रपट

Image
वेब टीम : मुंबई पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकवर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा बालाकोट एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आधारित असल्याची माहिती अभिनेता विवेक ओबेरॉय याने दिली. या चित्रपटाचे नाव ‘बालाकोट – द ट्रू स्टोरी’ असेल. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यातून सत्य घटना, भारतीय वायू सेनेचे शौर्य, रणनीती याची माहिती देण्यात येईल असे चित्रपट निर्मात्यांकडून सांगण्यात आले. या चित्रपटात विंग कमांडर अभिनंदन यांनी दिलेल्या लढ्यावर देखील प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली, आग्रा आणि जम्मू काश्मीरमध्ये यावर्षाच्या अखेरपर्यंत होणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या आधी पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारली होती.

‘नेटफ्लिक्स’वर प्रियांका चोप्रा होणार ‘सुपरहिरो’

Image
वेब टीम : मुंबई आता देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपले लक्ष वेब सीरिज दिशेने वळवले.प्रियांका नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजमध्ये सुपरहिरो अवतारात झळकणार आहे. हि मालिका विशेषत: लहान मुलांसाठी असून याचे नाव वी कॅन बी हिरोज असे आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील महागड्या दिग्दर्शकांपैकी एक रॉबर्ट रॉड्रिग्ज या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या मालिकेच्या संकल्पनेवर काम सुरु आहे. तसेच प्रियांका चोप्राच्या भूमिकेबाबत नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रियांका प्रथमच मायक्रो पडद्यावर दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांना याबाबत निश्चितच उत्सुकता लागून राहिली आहे.

प्रियांका चोप्राला पदावरून हटवा : पाकिस्तानी मंत्र्याची मागणी

Image
वेब टीम : लाहोर अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती केली. प्रियांका चोप्राने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले. प्रियांका चोप्राने युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेने लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोप्राला ढोंगी म्हटले होते. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रियांक चोप्राने टि्वट करुन “जय हिंद” म्हटले होते.आयशा मलिकने त्या टि्वट त्यासंदर्भात प्रियांकाला ढोंगी म्हटले होते.त्यावर प्रियांकाने “मी भारतीय असून माझे बरेच मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावे असे वाटत नाही. पण मी देश

नवख्या सुमितवर फेडररची स्तुतिसुमने

Image
वेब टीम : न्यूयॉर्क टेनिस कोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररने भारतीय टेनिसपटू सुमित नागलवर स्तुतिसुमने उधळली आहेत. सध्या सुरु असलेल्या यूएस ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सुमितची गाठ फेडररशी पडली होती. या सामन्यात सुमितचा प्रभाव झाला असला तरी त्याने फेडररला पहिल्याच सेटमध्ये ६-४ अशी मात दिली होती. खुद्द फेडररनेच सुमितचं कौतुक केलं आहे. सुमित बद्दल बोलताना फेडरर म्हणाला, ‘सुमितने आज चांगलाच खेळ केला. तो टेनिस कोर्टावर काय कमाल करू शकतो, हे त्याला चांगलं माहित आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. पण या खेळात मोठे सरप्राईज नसतात. इथे सातत्य असणं महत्त्वाचं आहे. ‘ पहिल्या सेटबद्दल विचारले असता, ‘तो माझ्यासाठी खरंच कठीण सेट होता. सुमित फारच चांगल्या प्रकारे खेळला. त्यामुळे त्या सेटचं श्रेय त्यालाच द्यायला हवं.’ असं तो म्हणाला.

पी. व्ही. सिंधू झाली वर्ल्ड चॅम्पियन

Image
वेब टीम : बासेल भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. जपानी खेळाडू नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा पराभव करत तिने अंतिम सामना जिंकला. हा किताब जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत सिंधू पाचव्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या नोझोमीचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

इंग्लंडचा डाव गडगडला : ६७ धावांत ऑलआउट

Image
वेब टीम : मेलबर्न ॲशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा अवघ्या ६७ धावांवर खुर्दा उडाला आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर गडगडला. ही इंग्लंडची १९४८ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची नीचांकी धावसंख्या ठरली. लीड्स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या तिखट माऱ्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाचा डाव १७९ धावांवर रोखता आला होता. आज दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. इंग्लंडच्या संघाला केवळ २९ षटकांचाच सामना करता आला. जो डेनलीच्या १२ धावा वगळता कुठल्याच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जोश हॅझलवूडने ५ बळी घेत इंग्लिश फलंदाजीची हवाच काढुन घेतली. कमिन्सने ३ तर पॅटीसनने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावासाठी ११२ धावांची आघाडी मिळाली.

भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

Image
वेब टीम : दिल्ली ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने न्यूझीलंडवर 5-0 असा मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने केलेल्या पराभवाचा वचपा काढला. न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाच्या मध्यरेषेवर खेळ खेळण्यावर अधिक भर दिला होता. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयश आले. मात्र कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. लगेचच शमशेर सिंगने 18 व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात झटपट 3 गोल झाले. निलकांत शर्माने 22 व्या मिनिटाला, गुरसाहबजीत सिंगने 26 व्या मिनिटाला आणि मनदीप सिंगने 27 व्या मिनिटाला गोल करून भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली आणि ती आघाडी शेवटपर्यंत टिकवली. राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने भारताला 2-1 ने पराभूत केले होते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा - मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार

Image
वेब टीम : दिल्ली क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली. यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर तीन ज्येष्ठ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत . तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला ‘मौलाना अबूल कलाम आझाद चषक’ जाहीर झाला आहे. गेल्या चार दशकांपासून गरीब मुलांना हॉकीचे नि:शुल्क प्रशिक्षण देताहेत मर्झबान पटेल हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुर्झबान पटेल हे गेल्या चार दशका

चक्रीवादळावर अणुबॉम्ब टाकण्याचा ट्रम्प यांचा अजब सल्ला

Image
वेब टीम : न्यूयॉर्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. यात आणखी के भर टाकणारे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पुन्हा केले. अमेरिकेच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळांना थांबवण्यासाठी ही चक्रीवादळे किनारपट्टीला धडकण्याआधीच त्यावर अणुबॉम्ब टाकण्याचा अजब सल्ला ट्रम्प यांनी दिला. ‘वादळांच्या केंद्रभागी अणुबॉम्ब टाकून अफ्रीका खंडाजवळच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची निर्मिती थांबवता येईल का?’ अशी विचारणा ट्रम्प यांनी केल्याचे एका अमेरिकन संकेतस्थळाने दिले. त्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी चक्रीवादळांची निर्मिती थांबवण्यासाठी अणुबॉम्ब वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर काय मत व्यक्त करणार असा विचार सर्वचजण करत होते असे यात म्हटले आहे. चक्रीवादळे थांबवण्यासाठी अशा प्रकारचा जगावेगळा उपाय सुचवण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी २०१७ मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ‘चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्या पूर्वी त्यावर अणुबॉम्ब टाकता य

काश्मीरच्या निर्णयावर ट्रम्प यांनी केले मोदींचे कौतुक

Image
वेब टीम : बियारीट्झ जी ७ परिषदे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय आहेत आणि कोणत्याही देशाला यासाठी कष्ट घेण्याची गरज नाही. काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात आहे. ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांना मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. मोदी म्हणाले,”भारत आणि पाकिस्तान दरम्यान बरेच द्विपक्षीय मुद्दे आहेत.पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना मी फोन करून शुभेच्छा देताना सांगितले होते की, पाकिस्तानला आरोग्य, गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर लढायला हवे. दोन्ही देश मिळून या विरोधात लढूया.दोन्ही देश जनतेच्या भल्यासाठी काम करतील.’ यावर ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही काल रात्री काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मला आशा आहे की ते चांगले काम करण्यात यशस्वी होतील. भारत आणि पाकिस्तान समस्येवर एकत्रित तोडगा काढतील.’ सात विकसित श्रीमंत देशांच्या या जी-७ सम

कुतुहूल प्राचीन ममीच्या शाबूत केसांचे

Image
वेब टीम : मॉस्को तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका ममीच्या डोक्यावर अजूनही केस अस्तित्वात आहेत. इतकी वर्षे हे केस कसे टिकून राहिले असतील याचे संशोधकांना कुतुहल वाटत होते. आता त्यांना असे दिसून आले आहे की पिस्त्याचे तेल व देवदार वृक्षाचे डिंक आदी काही नैसर्गिक साधनांनी ते सुरक्षित करण्यात आले होते. याबाबत मॉस्कोमधील कुर्चतोव्ह इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी संशोधन केले. प्राचीन इजिप्तमधील तीन ममींचा यासाठी अभ्यास करण्यात आला. हजारो वर्षांपूर्वीच्या ममींच्या केसांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. या ममींच्या केसांवर देवदार वृक्षाच्या डिंकापासून बनवलेल्या एका रसायनाचा वापर झाला होता असे त्यांना दिसले. संशोधकांनी या केसांचे इन्ङ्ग्रारेड स्पेक्ट्रमच्या सहाय्याने निरीक्षण केले. त्यांना असे दिसले की केसांना लावलेल्या या रसायनात गुरांची चरबी, पिस्त्याचे तेल आणि मधमाश्यांच्या पोळ्यातील मेणाचा वापर केला आहे. त्यामुळे हजारो वर्षांनंतरही हे केस अद्यापही सुरक्षित आहेत! त्या काळात मृतदेहांना सुरक्षित ठेवण्यासाठी मृतदेहासाठी एक लेप आणि केसांसाठी वेगळा लेप बनवला जात असे.

आम्ही शेवट करु, पाकिस्तानची पुन्हा धमकी

Image
वेब टीम : इस्लामाबाद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारणा संबंधीच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाचा पोकळ धमकी दिली. भारताने आमच्यावर युद्ध लादले तर पाकिस्तान त्याचा शेवट करेल असे फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली. काहीही झाले तरी पाकिस्तान युद्ध पुकारणार नाही.आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पण युद्धासारखी स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक पाकिस्तानी आपल्या सैन्यासोबत लढेल असे फिरदौस आशिक अवान राज्यपाल भवनात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाल्या. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.

अमेरिकेला चीनची गरज नाही : ट्रम्प

Image
वेब टीम : वॉशिंग्टन चीनने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला.यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत चीनमधील अमेरिकन कंपन्यांना आपला व्यवसाय गुंडाळण्याचे आदेश दिले. “आम्ही चीनसोबत व्यवहार करून अब्जावधी डॉलर्स गमावले आहेत. चीन आमच्या बौद्धीक संपदेचा वापर करून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहे. परंतु आता आम्ही तसे होऊ देणार नाही. आता आम्हाला चीनची गरज नाही. चीनशिवाय आम्ही उत्तम स्थितीत राहू,” असे ट्रम्प यांनी ट्विटरवरून म्हटले. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार चार तासांमध्ये तीन टक्क्यांपर्यंत कोसळला होता. “चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी आपला व्यवसाय पुन्हा अमेरिकेत आणावा, असे आदेश मी देत आहे. त्यांनी तात्काळ अन्य देशांचा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही मोठी संधी आहे. फेडेक्स,ऍमेझॉन,यूपीएस या कंपन्यांनी चीनमधून येणाऱ्या फेंटानिल औषधांची डिलिव्हरी बंद करावी.यामुळे दरवर्षी एक लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होत आहे,” असेही ते म्हणाले.

मोदींच्या विरोधात टाकली फेसबुक पोस्ट; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Image
वेब टीम : भद्रोही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्ट लिहिणे उत्तर प्रदेशातील एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले. प्राथमिक चौकशीनंतर या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस दलातून निलंबित केले गेले. भगवान प्रसाद असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो अँटी सबोटाज टीममध्ये होती. फेसबुकवर तो वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहित असल्याच्या तक्रारी पोलीस खात्याकडे आल्या होत्या. पोलीस दलातील सोशल मीडिया सेलचेही त्याच्याकडे लक्ष होते. सोशल मीडिया सेलनेही त्याच्याविरोधात एसपी राम बदन सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. सिंह यांनी स्वत: भगवान प्रसाद यांचे फेसबुक खाते पाहिले होते. त्यात त्याने मोदींविरोधात लिखाण केल्याचे आढळले.तसेच मोदीं विरोधातील कोणताही मजकूर तो लाइक आणि शेअर करत असल्याचे ही दिसले. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या त्याला दोषी धरून निलंबित केले असून त्याच्या सखोल चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. चौकशी झाल्यानंतर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे.

काश्मीरमध्ये आता फडकतोय फक्त तिरंगा

Image
वेब टीम : श्रीनगर केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे. याआधी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असल्याने त्यांचा स्वतंत्र झेंडाही होता. जम्मू काश्मीरच्या नागरी सचिवालयावर आधी राज्याचा ध्वज व राष्ट्रीय ध्वज फडकत असे. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच सचिवालयावरुन राज्याचा झेंडा काढण्यात आला आहे. सचिवालयावर सध्या फक्त भारताचा राष्ट्रध्वज फडकत आहे.

किती काळ जनतेची मुस्कटदाबी करणार ? : प्रियांका गांधी

Image
वेब टीम : दिल्ली कलम ३७० रद्द करण्यावरुन काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. पण त्यांना विमानतळावरुनच माघारी पाठवण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी केंद्राचा निर्णय हा देशविरोधी आहे, असं ट्विटरच्या माध्यमातुन म्हणाल्या आहेत. काश्मीरमध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली सरकारची दडपशाही सुरू आहे. किती काळ सरकार जनतेची मुस्कटदाबी करणार? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे केला आहे. या ट्विटसोबतच त्यांनी विमानातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काश्मीरमधील एक महिला राहुल गांधींकडे आपल्या व्यथा मांडताना दिसत आहे.

चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

Image
वेब टीम : दिल्ली माजी केंद्रीय अर्थमंत्री नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.त्यांना ३० ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चिदंबरम यांना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राउज ऍव्हेन्यू न्यायालयात हजर केले.यावेळी सीबीआयचे अधिकारी आणि दिल्ली पोलीस उपस्थित होते. त्यावेळी चिदंबरम यांची अधिक चौकशी करायची असल्याने पाच दिवसांची रिमांड देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाला केली. त्यावेळी गेल्या चार दिवसांत तुम्ही काय चौकशी केली? असा सवाल न्यायालयाने सीबीआयला केला. त्यावर गेल्या चार दिवसांत आम्ही चिदंबरम यांना सर्व कागदपत्रे दाखवली. त्याचे रेकॉर्डिंगही केले. तसेच या प्रकरणातील एका आरोपीला आजच त्यांच्यासमोर हजर केले. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आणखी एक-दोन आरोपींना त्यांच्यासमोर हजर करून काही प्रश्न विचारायचे असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.

मोदींची केली स्तुती, शशी थरूर यांना काँग्रेसकडून नोटीस

Image
वेब टीम : दिल्ली पं तप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना महागात पडले. या प्रकरणी केरळ काँग्रेसने थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. तर,तुम्ही सहमत नसला तरी माझ्या मतांचा आदर करा, अशा शब्दांत थरूर यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिले. शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणे योग्य नसून त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुकही केले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य केले. त्याआधी काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू संघवी यांनीही असं ए मत व्यक्त केले होते. थरूर यांच्या या वक्तव्याची केरळ काँग्रेस कमिटीने गंभीर दखल घेतली असून मोदींची स्तुती केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले. तसेच याबाबत थरूर यांची हायकमांडकडे तक्रार करण्याचा निर्णयही केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे. थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याचे केपीसीसी अध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी सांगितले.

आता तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच ईडीकडे तक्रार

Image
वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेतले आणि त्यांची पत्नी काम करत असलेल्या अ‌ॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संबंधित प्रकरणी तक्रारदाराने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझे राजकीय गुरू, त्यांना अंगठा देण्यासही तयार : पंकजा मुंडे

Image
वेब टीम : बीड ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ‘तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा’ अशा शुभेच्छाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. महाजानदेश यात्रेतील सभेत त्या म्हणाल्या, तुमचा गुरु कोण असा प्रश्न मला कायम विचारला जातो. साहजिकच माझे वडील माझे गुरु असल्याचं मी सांगते. पण आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात देवेंद्र फडणवीस माझे गुरु आहेत. अर्जून हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य होता. अर्जुनापेक्षा कुणी मोठं होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता. गुरुसाठी अंगठा कापून देण्याची आपली परंपरा आहे. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही.

राज्यातील सर्व मतदारसंघात मनसे देणार उमेदवार?

Image
वेब टीम : मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीच म्हटले नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीला लागण्याचा संदेशही पक्षाध्यक्षांकडून देण्यात आल्याचा दावा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी केला. मनसेची राज्यातील २८८ मतदारसंघांत विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगत मनसे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट करीत अंतिमत: किती जागा लढवायच्या, याबाबतचा निर्णय खुद्द पक्षाध्यक्षच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आली असतानाही मनसेच्या गोटात शातंतता पसरली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीसंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर होत नसल्याने राज्यासह नाशिकमधील कार्यकर्तेही सैरभैर झाले होते. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये येऊन पक्षाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसोबतही

सरकारने भरमसाठ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली : बाळासाहेब थोरात

Image
वेब टीम : संगमनेर देशातील वाहन, वस्त्रोद्योगात मंदी आली आहे. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरीही नाडला गेला आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. सरकारने भरमसाठ खोटी आश्‍वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. दरम्यान ना. विखे पाटिल यांच्यावर सडकून टिका केली, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या 12 शेतकऱ्यांचा आ. थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माझ्यावर सध्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यानिमित्तानं मी राज्यभर दौरे करीत आहे. ज्या कॉंग्रेस पक्षाने मला ताकद दिली, मान सन्मानाची पदे दिली, त्या पक्षाला अडचणीच्या काळात सोडून मी पळून गेलो नाही, तर ठामपणे उभा राहिलो, असं सांगताना मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असल्याचे आ. थोरात

अण्णा धनुष्य उचलू नका, बरगड्या तुटतील : संदीप क्षीरसागरांचा हल्लाबोल

Image
वेब टीम : बीड अण्णा या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या तुटतील अशा शब्दात संदीप क्षीरसागरांनी शिवस्वराज्य यात्रेतून काकांवर हल्लाबोल केला. ते शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. बीडच्या सिद्धीविनायक कॉम्प्लेक्समध्ये शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेला बीड शहरासह मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती. संदीप क्षीरसागरांचे नियोजन हे भारदस्त दिसून आले तर शहरातून काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली ही अभूतपूर्वच होती. तर संदीप क्षीरसागर नावाचा नारा देणारे हजारो तरणे ताठे आणि राष्ट्रवादीचे अबालवृद्ध कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. संदीप क्षीरसागरांनी रात्री आपल्या भाषणाला अधिकच धार दिली आणि ना.जयदत्त क्षीरसागरांवर कडाडून हल्ला चढवला. आमच्या काकांनी ५० कोटी रुपये देवून मंत्रीपद घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. युवकांची ताकद आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळे आता आपल्याला कोनीही रोखू शकत नाही. बीड शहरात आम्ही घरोघरी जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेतले. लोकांचा प्रचंड रोष आहे. मात्र ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याने लोकांनी राष्ट्रवादी कॉंग्र