Posts

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

Image
  कोपरगांव प्रतिनिधी कोपरगांव तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी नदीलगत असलेल्या बेट भागातील संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन जागृत धार्मिक ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेले ग्रामदैवत श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिराचे गाभार्‍याचे वरील भागात 12 बाय 12 या आकाराचे ध्यानमंदिर आढळून आले आहे ते पहाण्यासाठी भाविकभक्त, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या श्री गुरुशुक्राचार्य महाराज पुरातन मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यावेळेस काम करतांना तीन आठवडे पूर्वी हे ध्यान मंदिर आढळून आले आहे. त्याबाबत आज  मंदिर  प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या जगातील एकमेव  मंदिर  असलेल्या श्री गुरुशुक्राचार्य महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. श्रावण महिन्या निमित्त  मंदि रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परम सदगुरु श्री गुरुशुक्राचार्य  मंदिर  गाभाऱ्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम नासिक येथील उद्योगपती यांचे मदतीने व सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे. गाभारा दुरुस्ती समोरील सभामंडपाच्या व

आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

अहमदनगर : आजी ,  माजी सैनिकांचे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालय ,  पाथर्डी येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै ,  २०२४ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  ज्या आजी ,  माजी सैनिकांचे जमिनी ,  अतिक्रमण ,  निवृत्तीवेतन ,  कुटुंबियावरील अन्यायाबाबत काही प्रश्न ,  अडीअडचणी असतील त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे.    आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरूपात दोन प्रतीत अर्ज सादर करावा ,  असे    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,  अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर

अहमदनगर :   वाळू डेपोपासून ते ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात वाळू पोहोचविण्यासाठी    वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुधारित भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण त्रिस्तरीय समितीने अहमदनगर जिल्ह्यासाठी हे सुधारित दर निश्चित केले आहेत. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी    विनोद सगरे यांनी दिली आहे.                               जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीत सदस्य पोलीस अधीक्षक व सचिव म्हणून  प्रादेशिक परिवहन अधिकारी हे कार्यरत आहेत. या समितीने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन प्रकारानुसार प्रतिकिलो मीटरनुसार दर ठरविले आहेत. सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत.    हलके मालवाहू वाहन (१.५ टन पर्यंत) - ३१ रूपये , ( १.५ टन ते ३.५ टन पर्यंत)- ३५.५ रूपये , ( ३.५ ते ७.५ टनपर्यंत) - ३८ रूपये दर आहे.  तर  मध्यम मालवाहू वाहन (७.५ टन ते १३ टनपर्यंत) - ४८ रूपये ,  जड मालवाहू वाहन (१३ टन ते १८.५ टन पर्यंत )  –  ५६ रूपये ,  जड मालवाहू वाहन (१८.५ टन ते २८ टन पर्यंत)-६४ रूपये व जड मालवाहू वाहन (२८

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  मुंबई:   राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पुढील ३ महिन्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, विविध महाविद्यालयांकडून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर पुढील महिन्यापासून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

Image
कोपरगाव प्रतिनिधी आषाढी एकादशीचे पर्वावर वारीसाठी आलेल्या वारकरी भक्तांना श्री क्षेत्र पंढरपूर शाखे व्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला, तसेच वारी निमित्त आलेल्या ४९ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ४६ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङमयाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक फिरते रूग्णालयाचे माध्यमातून ३० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री आलेल्या आलेल्या २० हजार २० गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. अशा रितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने श्री संस्थानकडून वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे. श्रींचे पालखीचे आषाढ शु. १५ रविवार दि. २१ जुलै, २०२४ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगांव करीता प्रस्थान होईल, श्रींची पालखी करकंब, भगवान बार्शी, बीड, गे

आयवोमी इलेक्ट्रिक स्कूटरच्यावतीने ग्राहकांसाठी अनेक योजना 15 ऑगस्टच्या पहिल्या लकी सोडतीत

Image
 नगरमधील विकास वाघ यांना बक्षीस अहमदनगर : इलेक्ट्रिक स्कूटरमधील प्रथितयश असलेली भारतातील नामांकित कंपनी आयवोमीतर्फे ग्राहकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील नुकत्याच झालेल्या पहिल्या भाग्यवान ग्राहक सोडतीत येथील विकास भाऊसाहेब वाघ यांना एका गाडीवर दुसरी गाडी (जीत-एक्स मॉडेल) तसेच दुसर्‍या एका ग्राहकास एक्स शो-रुम 100% कॅशबॅक योजनेचा लाभ मिळाला, अशी माहिती सुदोहा शोरुमचे संचालक श्री. नंदकुमार सुपेकर यांनी दिली. 15 ऑगस्ट रोजी सावेडी रस्त्यावरील सुदोहा सेल्स कॉर्पोरेशन या आयवोमी स्कूटर विक्री दालनात भाग्यवान विजेता सोडत काढण्यात आली. त्यात वरील भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे मिळाली. या कंपनीच्यावतीने आता दुसरी सोडत येत्या 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्राहकांनी या सोडतीत सहभागी होण्यासाठी या दालनास जरूर भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर गाड्यांमध्ये आयवोमी कंपनी एक नामांकित असून या गाड्यांना ग्राहकांची प्रथम पसंती आहे. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून या कंपनीचे सावेडीमध्ये दालन असून आतापर्यंत सुमारे 500 गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या असून या

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"

Image
  शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार" शालेय स्पर्धेवर होणार परीणाम, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी ऑगष्ट मध्ये सुरु होत असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन - नियोजनास सहकार्य न करण्याचा एकमुखी निर्णय न्यू आर्टस कॉलेज, अहमदनगर येथे नगर, पारनेर व राहुरी तालुक्याच्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला.     शालेय स्पर्धा आयोजन नियोजना संदर्भात क्रीडा कार्यालयाकडून आज नगर येथे क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ चा शालेय स्पर्धा आयोजनाचा न मिळालेला निधी,  खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र न मिळणे, सिंथेटिक ट्रॅक नसल्याने खेळाडूंचे होत असलेले नुकसान, शालेय स्पर्धेत साहित्य व सुविधांची वानवा,  क्रीडा अनुदान प्रकरणे न मंजुर करणे, क्रीडा अनुदान वाटपात अपहार, तुटपुंजे पंच मानधन, निधी कपात, सुविधेच्या नावाखाली आकारली जाणारी ऑनलाईन कॉन्व्हेनीयन्स फी, ऑनलाईन मधील त्रुटी, क्रीडा स्पर्धेनंतर तालुका प्रमुखांना व शिक्षकांना मिळणारी वागणूक या संदर्भात शारीरिक शिक्षक व पदाधिकारी फारच आक्रमक झाले होते. मिटींगच्य

जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड

Image
  जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड विद्यार्थ्यांनी स्विकारली संवर्धनाची जबाबदारी  वृक्षांनी शाळेचा परिसर हिरवाईने फुलून विद्यार्थ्यांना सावली मिळणार -नूतन मिश्रा अहमदनगर - जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दोनशे झाडांची लागवड केली. पावसाळा सुरु झाला असताना फाऊंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी जिल्हाभर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या पार्श्‍वभूमीवर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी शालेय विद्यार्थ्यांनी स्विकारली आहे. आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नूतन मिश्रा, निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे, लेफ्टनंट कर्नल सोमेश्‍वर गायकवाड यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, एकनाथ माने, सतीष पालवे, बाजीराव गोपाळघरे, दिनानाथ तांदळे, विनायक मोराळे, यश फाउंडेशनचे संजय डोंगरे, नवनाथ वारे, कौडेश्‍वर सैनिक फाउंडेशनचे अशोक मुठे, दादाभाऊ बोरकर, गणेश भांबे, त्रिदल संघटनेचे बाळासाहेब आंधळे, हरिभाऊ चितळे, बिभीषण पवार, थ्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नीलक्रांती चौक मित्र मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाच्याच्या वतीने अभिवादन

Image
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नीलक्रांती चौक मित्र मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाच्याच्या वतीने वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी नगरसेवक अजय साळवे समवेत अनिकेत विधाते, अविनाश शिंदे, प्रशांत भोसले, रोहित अल्हाट, मोहम्मद सय्यद, दादू मगर, भारत ठोंबरे, प्रदीप साळवे, विकी साळवे, रविराज साळवे, ऋतिक साळवे, भैरव पंडागळे, यश साळवे, निखिल साळवे, राहुल साळवे आदी उपस्थित होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन.

Image
  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अभिवादन.  अण्णाभाऊ साठे यांचा शहरात पूर्ण कृती पुतळा उभारण्याची मागणी- सुरेश बनसोडे.    अहमदनगर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रा.माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, संजय लोखंडे, सिद्धार्थ आढाव, पप्पू पाटील, सोमा शिंदे, समिर भिंगारदिवे, वैभव जाधव, सतिश साळवे, येशूदास वाघमारे, सुभाष वाघमारे, राजा जयस्वाल, मतीन शेख, दिपक लिपाने, जय कदम, लोखंडे सर आधी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       या वेळी प्रा.माणिक विधाते म्हणाले की, ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या महापुरुषांचे जयंती साजरी करणे गरजेचे असून अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे असून ग्रामीण भागातील जनतेला जनजागृती करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसा भाग घेता येईल या पद्धतीने त्यांनी कार्य केलेले असून अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कलेपासून देखील लोकांना जनजागृती केले असल्याचे सांगितले व सुरेश बनसोडे म्हणाले की नगर शहरातील महापु